Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुट्टू म्हणजे काय? कुठल्याही
कुट्टू म्हणजे काय?
कुठल्याही पिठांमधे कां टो ति मी वगैरे ढकलून थालिपीठासारखे लावता येते.
कुट्टू म्हणजे बकव्हिट. त्याचा
कुट्टू म्हणजे बकव्हिट. त्याचा पॅनकेक होतो म्हणजे बहुतेक थालीपीठ पण जमेल.
खापाचे दही कसे करतात?
खापाचे दही कसे करतात?
सिमंतिनी मी इतकी अडाणी आहे की
सिमंतिनी मी इतकी अडाणी आहे की बकव्हिट म्हणजे काय ते ही माहित नाही.
काही मराठी नाव आहे का? की कुट्टु हेच मराठी आहे?
कुट्टु बहुतेक गुजराथी शब्द
कुट्टु बहुतेक गुजराथी शब्द असावा. कुट्टु मुंबई-पुण्यात दिसले नाही. त्रिकोणी गहू सारख दिसत. थोडफार दलिया सारख लागत शिजवल्यावर. किमंत (निदान परदेशात) जरा बर्यापैकी असते, तेव्हा म्या पामरास परवडत नाही. (कुट्टुची माहिती करुन घे, श्रिमंतात गणली जाशील
जसे अल्फा अल्फा खाणारे उगीच हिप्पी गणले जातात
)
अरे कुट्टुबददल माहिती खूप
अरे कुट्टुबददल माहिती खूप दिलीत, जरा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.
दही विरजणे, साय विरजणे, ताक
दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा, बाफ...
http://www.maayboli.com/node/38476
स्वाती २ आभार शोधून
स्वाती २
आभार शोधून दिल्याबद्दल.
धन्यवाद, sonalisl धागा शोधुन
धन्यवाद, sonalisl धागा शोधुन दिल्याबद्दल
धन्यवाद सर्वांना. कुट्टु महाग
धन्यवाद सर्वांना. कुट्टु महाग आहे का? मला तरी साबा आणून देतात.
त्यात बटाटा वगैरे घालून नॉर्थ लोकं करतात.
इथे मीच मुष्कीलीने चपाती करते रोज. त्यात सकाळी कुट्टु रोटी वगैरे..
तिला अॅलर्जी आहे गहू वगैरे. दलिया(गहू), थालीपीठ(तांदूळ) बाद. आणि तांदूळ का खात नाही माहिती नाही. त्यामुळे इडली, डोसे बाद.
नुसती नाचणीचे डोसे होतील का? बेसनाचे पोळी आणि भाकरी(लाटून ?) करून पहायला हवी.
नुसती नाचणीचे डोसे होतील
नुसती नाचणीचे डोसे होतील का?>>>>>१. नाचणी + उडीदडाळीचे डोसे मस्त होतात.(पीठ आंबवलेले वापरले होते.)
२.मुगाची डाळ वाटून मिर्ची+कांदा+ कोथिंबीर+ बारीक चिरलेले आले ,घालून पोळे मस्त लागतात.नुसत्या मुगडाळीचेही चांगले लागतात.
३.मिश्रडाळीचे डोसे.,आप्पे
४ थालिपीठ
थालीपीठ(तांदूळ) बाद.
थालीपीठ(तांदूळ) बाद. <<
नाचणीच्या, ज्वारीच्या पिठांमधे वस्तू ढकलून उत्तम होतात थालिपीठे. त्याला इतर काही नाव असेल तर माहित नाही.
कुट्टू नॉर्थमध्ये फार खातात.
कुट्टू नॉर्थमध्ये फार खातात. पौष्टीक असते का? २ वर्षाखालच्या मुलांना देऊ शकतो का?
कुट्टु का आटा म्हणजे
कुट्टु का आटा म्हणजे शिंगाड्याचं पीठ ना?
अमि, पौष्टिकतेचा जास्त ध्यास नको
लहान बाळांना शक्यतो आपण जिथे राहतो तिथे सहज उपलब्ध होणारे ताजे आणि चांगल्या प्रतिचे अन्नपदार्थ देणेच जास्त योग्य.
बकव्हिट बद्दल वाचलं. दादर-
बकव्हिट बद्दल वाचलं. दादर- परळ मधे कुठे मिळतील??
मंजुडी खरं आहे. विसरूनच जातो
मंजुडी
खरं आहे. विसरूनच जातो आपण बर्याचदा. मुलांना पौष्टीक आणि पौष्टिकच मिळावे असा अन्कोंशस माईडमध्ये ध्यासच लागला आहे. थोडा कमी करायला हवा. खरय.
शिंगाडा आणि कुट्टू वेगवेगळे
शिंगाडा आणि कुट्टू वेगवेगळे असतात. मराठी लोक कुट्टु खात नाहीत बहुतेक.
वरई व साबुदाण्याचीही लोक
वरई व साबुदाण्याचीही लोक थालिपीठे, डोसे, उत्ताप्पे करतात. नेटवर कृती मिळतील. राजगिरा पीठाचेही डोसे, थालिपीठे करतात. उपासाची भाजणी वापरून पदार्थ बनवता येतील.
बकव्हीट चालत असेल तर किन्वापण
बकव्हीट चालत असेल तर किन्वापण चालेल.
आमच्या एका मैत्रिणीला गहू, तांदूळ, सूर्यफुलाचे तेल अशा अनेक बेसिक गोष्टी चालत नाहीत. तेव्हा तिच्यासाठी कायम किन्वा बेस्ड पदार्थ. अर्थात त्याची पोळी बिळी नाही होणार.
बकव्हिट मुद्दामहून पौष्टीक
बकव्हिट मुद्दामहून पौष्टीक म्हाणून द्यायची गरज नाही. नेहमीच्या धान्याची अॅलर्जी वगैरे असेल तर गोष्ट वेगळी.
झंपी,
राजगिरा चालत असेल तर मिक्सर मधून काढून त्या पिठात उकडलेला बटाटा घालून झटपट थालिपिठ होते. कुट्टूचेही तसेच करतात.
@वीणा सुरु- कटाच्या आमटीचा
@वीणा सुरु-
कटाच्या आमटीचा झणझणीत (तिखटजाळ) मसाला -
२ मध्यम कांदे, ¼ वाटी सुके खोबरे, 1 गड्डा लसूण, 2 पेर आल, 4 लवंग, 4 मिरे, 2-3 टे. स्पुन धने, असल्यास प्रत्येकी 1 टे. स्पुन खसखस आणि तीळ, 1-2 तमालपत्र.
हे सर्व साहित्य अगदी थोड्या तेलावर परतुन घ्यायचे आणि कोमट असतानाच अंदाजाने पाणी टाकुन एकदम स्मूथ वाटावे.
आमटी करताना हा मसाला तेलात मंद गॅस वर परतावा आणि मसाला छान परतला गेला की तिखट आणि कांदा लसुन मसाला घालुन डाळीचे पाणी घालावे.
खान्देशात खापरावरच्या पुरणपोळी आब्याचा रस आणि हा रस्सा.
पिंकि वेगळ्या धाग्यावर ही
पिंकि वेगळ्या धाग्यावर ही कृति लिहिणार का?
माझ्याकडे आत्ता फोटो नाहीत पण
माझ्याकडे आत्ता फोटो नाहीत पण आमटी साठी.
४-५ दिवसांत करते आणि टाकते फोटोसहित.
ऊन्धियो चि रेसेपी - कोनो
ऊन्धियो चि रेसेपी - कोनो लिन्क पाथ्वेल का ? पुनयात ह्या भाज्या कोथे मिल्तात ?
सुरती उंधियो
सुरती उंधियो
ध्न्यावाद.योकु.
ध्न्यावाद.योकु.
घाईगडबडीत मसूर समजोन मी कुळीथ
घाईगडबडीत मसूर समजोन मी कुळीथ आणले. १ किलो कुळीथ अक्कलखाती जमा झालेत. काय करता येइल बरे? रेसिपी सान्गा. इकडे चक्की नाही तर पीठ करून काहीही करणे शक्य नाही.
कुळथाची उसळ. भयंकर आवडते.
कुळथाची उसळ. भयंकर आवडते. भिजवून करता येईल किंवा झटपट भाजूनपण बरी लागते.
भिजवून केलीत तर चहाड काढायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24993
http://www.maayboli.com/node/46057
http://www.maayboli.com/node/5772
चहाड्या करणे बरं नव्हे.
धानी, भारतमधून आणलं असशील तर
धानी, भारतमधून आणलं असशील तर बदलून देतील ते..
Pages