पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नुसत्या उडदाच्या डाळीचे वडे करते.
उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवायची मग वाटून त्यात मिठ घालायचे. वाटल्यास थोडे खोबर्‍याचे तुकडे, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून मिक्स करायचे आणि वडे तळायचे.

उडीद डाळीबरोबर थोडी मुगडाळ व चणाडाळही घालतात.

आम्ही आलं मिरची पेस्ट टाकतो पिठात. नाही तर मिरेपुड.

पिठ आंबवायचं नाही अजीबात ह्या वड्यांना आणि तळुन झालेले वडे ताकात (मिठ जिरेपुड घातलेल्या) बुडवुन ठेवायचे.
सर्व करताना वडे पिळुन काढायचे अन मग दही घालुन खायचे.
असे न केल्यास एक कोरडेपणा जाणवतो, वडे मौ लागत नाहीत .. लग्नातल्या सारखे! Wink

ह्यावर चिंचेची गोड चटणी अन शेव.. वाटल्यास डाळिंबाचे दाणे घालुन सजवुन खायचे. जबरी दिसतात!

अननस सरबताची कृती माहीत आहे का कुणाला?

नाशिकला रविवार कारंजावर 'समर्थ ज्यूस' वाल्यांकडे लय म्हणजे लय भारी अननस सरबत मिळते. त्याची आठवण आली म्हणून आज करून बघितले. छान झाले होते पण काहीतरी कमी होते.
वेनिला आइसक्रीम मध्ये थोड़ी साखर, अननसाच्या फोडी, थोड़े दूध आणि थोड़े अननस जूस घालून ब्लेंडर ला फिरवले. ग्लासमध्ये एक स्कूप वैनिला आइसक्रीम घालून त्यावर ब्लेंड केलेला शेक घातला. वरुन बारीक चिरलेल्या अननसाच्या फोड़ी घातल्या.
अजुन काही घालावे का?
अननस सिरप असे काही मिळते का? असल्यास कुठे?

सिरप नाही पण पायनापल फ्लेवर मिळेल. तुझ्या रेसीपीत व्हॅनिला आइस्क्रीम जास्त प्रमाणात झाल्याने त्याचे पायनापल पण झाकोळले असेल, ते कमी करून बघ. शेवटाचा स्कूप नको घालायला. माझ्याकडे पाच सहा प्रकारचे फ्लेवर आहेत पायनापल मध्ये.

वत्सला, 'होममेड' ब्रँडचे पायनॅपल सिरप ठाणे-मुंबईत मिळते. त्यांचे सगळेच फ्लेवर मस्त आहेत पण त्यातही बटरस्कॉच आणि लेमनपुदिना हे फ्लेवर आमच्याकडे हिट आहेत.

पण तू त्यात आईसक्रिम+दूध घातलंस ते तुला सरबत करायचं होतं की मिल्कशेक/ मस्तानी? Wink

एकूणच अननस दुधाबरोबर/ दुग्धजन्य पदार्थांबरोबर एकत्र करू नये असं माझं मत.

धन्यवाद अमा आणि मंजुडी.
अमा, वैनिला आइसक्रीम कमी वापरून करते एकदा.

अननस आणि दुध>>> हो बरोबर आहे म्हणूनच करून बघितले नव्हते आधी. पण आज फार उन्हाळा असल्याने फार आठवण आली त्या सरबताची. सरबत म्हटल तरी मिल्कशेक प्रकारातच मोडते. rather मिल्कशेक च आहे!

बर उद्याही भयंकर उन्ह आहे. कुणाला पुण्यात मिळ णाऱ्या फेमस मस्तानी ची रेसिपी माहीत आहे का?

नाशिकला रविवार कारंजावर 'समर्थ ज्यूस' वाल्यांकडे लय म्हणजे लय भारी अननस सरबत मिळते. >>>> त्याला काही तरी विशिष्ठ नाव आहे ना? 'थंडाई' टाइप्स. फार भारी असतं ते प्रकरण. लोणीला आमच्या कॉलेजबाहेर पण साधारण तसं ड्रिंक मिळायचं.

नाही गं. त्यांच्या सरबताच्या गाडीवर पण अननस सरबत असेच लिहिलेले असायचे... कुणालातरी विचारते.
मस्तानीची पाककृती 'आम्ही सारे खव्वय्ये' वर यु ट्यूब वर सापडली. पण त्यासाठी कुल्फी करावी लागेल त्यामुळे आजचा ३५ ते ४० डी चा दिवस खर तर दुपार पिनाकोलाडा (अल्कोहल न घालता) पिऊन घालवली.

दिनेशदा, हो तसच केल मी. पायनापल जूस (गोल्डन circle) + कैन मधले ना दू + बर्फ+ फ्रेश अननस असं सगळ अंदाजे घेऊन मिक्स केलं. एकच ग्लास केल्याने ब्लेंडर मधून काढल नाही. जास्त लोकांसाठी करताना मात्र अन्नसाच्या फोड़ी न घालता एकदा ब्लेंडर मधून फिरवुन घेते. वेळेवर अननस वरुन घालते.

वत्सला, अननसाचा ज्यूस (यात थोडं सिरप पण असतं) + बर्फ + अननसाच्या फोडी + आइस क्रीम एवढाच माल त्या ग्लासात असतो. ताजं अननस, सिरप आणि बर्फ एकत्र करून मिक्सर/ब्लेंडरमध्ये फिरवून घ्यायचं. सर्व्ह करताना ग्लासमध्ये आधी ज्यूस मग अननसाच्या फोडी आणि वरून आइसक्रीमचा स्कूप घालून द्यायचं. त्या स्कूपच्या टाळक्यावर एखादी फोड आणि चमचाभर ज्यूस ओतायचा. - इति आमची विश्वसनीय सुत्र Happy

वत्सला! चान्दिच्या गणपतिजवळ जी अननस सरबताची गाडी लागते ती सुधा समर्थ ज्युस सेन्टरचीच आहे,त्या.न्ची सुरवात तिच होती मग हळूहळू लोकप्रियता मिळाल्यावर समर्थ सुरू झाले, पण गाडि अजुनही चालते तेवढिच कारण आरके वर भरणारा बाजार.

सिंडरेलाची रेसी पी बरोबर वाटते आहे कारण व्हॅनिला आइस्क्रीम नंतर घातले आहे. त्यामुळे त्या दोन्ही फ्लेवर मधील वेगळे पण जपून राहून त्या दोन्ही चवी वेगवेग ळ्या चाखता येउन खुमारी वाढेल. पायना पल इज द हीरो हिअर आणि व्हॅनिला बॅकप डान्सर. Wink

सिरप मिळालं की करून बघते.. पण मला अंधुकस आठवतय त्यावरून
त्यात ते दूध पण घालायचे...
प्राजक्ता, बरोबर. पूर्वी फक्त ती गाड़ी असायची. (प्रोप्र शेवाळे अस लिहीलेल होत Lol )
काऊ, आमच्या नाशकात.

मागे कुठेतरी खारे दाणे करण्यासाठी कुकर / मावेमधे पाणी , मीठ घालुन उकडुन नंतर मावेत भाजणे असे लिहीले होते. त्याप्रमाणे केले तेव्हा खुपच छान झाले होते. पण आता रेसिपी सापदत नाहीये. प्लीज कुणाला माहित असेल तर सांगा Happy

सलगम ची भाजी जवळा घालून केली. छान लागली. थॅन्क्स सगळ्यांना. Happy
भाजी कापताना मुळ्यासारखा वास येतो पण चव मुळ्यासारखी नाही.

माझ्याकडे ३ मध्यम लाल रताळी आहेत. मला खीर आवडत नाही. अजून काही करता येईल का? मी एकावेळी एक रताळे खाऊ शकेल. काहीतरी खमंत सुचवा प्लीज. धन्यवाद.

रताळ्याचे गोड/खारे काप ... मावेत भाजून चाट मसाला भुरभुरवायचा ... खिचडी दाण्याच कूट टाकून किंवा कुठल्याही भाजीत बटाट्या ऐवजी ..?

Pages