Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आली विपू धन्यू!
आली विपू
धन्यू!
अकु, मला तुमची कमाल वाटते.
अकु, मला तुमची कमाल वाटते. ग्रेट आहात. कसं हो सुचत एवढ आणि एवढ्या पटकन तुम्हाला. !!!
किती ऑप्शन्स देता तुम्ही आणि किती कमी वेळात !!!
लसणीच्या पाल्याच काय करता
लसणीच्या पाल्याच काय करता येईल?
मनीमोहोर लसणीचा पाला -
मनीमोहोर
लसणीचा पाला -
चटणी
भाजी / आमटी / उसळींत स्वादासाठी वापरू शकता.
स्वादासाठी सलाद ड्रेसिगमध्ये वापरू शकता.
लसणीच्या पातीचं वरण मस्त
लसणीच्या पातीचं वरण मस्त होतं. नेहेमीसारख्या फोडणीत आधी पाला परतायचा हिरव्या मिरचीसोबत, यात तांबडं तिखट नाही घालायचं; पाला जरा मोठ्या आचेवर भराभर परतून हिरवाच राहील हे पाहायचं, वरण घालून एक उकळी आली की वर कोथिंबीर घालायची जरा सढळ हातानी, हिरवी/पिवळी डाळ दिसायला मस्तच दिसते. वाफाळता भात असं वरण अन एखादं तोंडिलावणं मस्त गरमागरम थंडीच्या दिवशी संध्याकाळच्या जेवणाचा फक्कड बेत होतो!
कितीक वर्षे झाली आईच्या हातचं असं वरण खाऊन...
लसणीची पात घालून केलेले
लसणीची पात घालून केलेले ऑमलेट, शक्तीवर्धक असते. या दिवसात मुद्दाम करतात.
उंधियू च्या वाटणात असते ती पात. या पातीचे विदर्भात सांडगे पण करतात.
ईथे कुळिथाच्या डोस्यां बद्दल
ईथे कुळिथाच्या डोस्यां बद्दल स्वाती ने लिहिले आहे. त्याचे पीठ ईग्रो मधे मिळत एका? काय विचारायचे?
हॉर्स ग्राम म्हणतात मराठीत...
हॉर्स ग्राम म्हणतात मराठीत...
[http://en.wikipedia.org/wiki/Macrotyloma_uniflorum]
योकु, पण त्याचे पीठ ई ग्रो
योकु,
पण त्याचे पीठ ई ग्रो मधे मिळते का?
रिमझिम , इंग्रो त कुळीथ पीठ
रिमझिम , इंग्रो त कुळीथ पीठ मला तरी अजून दिसले नाहीये, पण कुळीथ मिळतात. डोसे करायचे असतील तर उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घालतो तेव्हा कुळीथही भिजत घालायचे.
प्रिती विराज हे पहा
प्रिती विराज हे पहा http://www.maayboli.com/node/16480
विष्णू मनोहरांचे लसणीचे आक्षे
विष्णू मनोहरांचे लसणीचे आक्षे
मिक्स्ड कडधान्यांच्या उसळीची
मिक्स्ड कडधान्यांच्या उसळीची काही वेगळी रेसिपी आहे का कुणाकडे? पंजाबी, मालवणी कोणतीही चालेल.
स्वाती२, कुळिथाचे प्रमाण
स्वाती२,
कुळिथाचे प्रमाण सांगणार का? डोस्यासाठी?
योकु, इथे वाचून २-३
योकु, इथे वाचून २-३ दिवसांपूर्वी लसण्याच्या पातीचं वरण केलं होतं. त्यात भाकरी चुरून मस्त लागली.थँक्स.
उसळ नाही पण उकडून घेउन त्याचे
उसळ नाही पण उकडून घेउन त्याचे सलाड मस्त बनते. कांदा टोमाटो कोथिंबीर, उकडलेले बटाटे बारीक तुकडे करून त्यात हे उकडलेले मिक्स घालायचे, वर चाट मसाला, धने जिरे पावडर, तिखट. लिंबूरस.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/4861
शर्मिला, या पद्धतीने मोड न आलेल्या मिक्स कडधान्याची डाळ बनवता येईल. आख्खे मुग, थोडी मटकी, ह्खे मसुर, कुळिथ, राजमा, उडीद आणि चण्याची डाळ घ्यायची. कडधान्यं भिजवून घ्यायची फक्त. बाकी रेसेपी वरच्या लिंकमधली सेम. थंडी स्पेशल पहाडी डाळ आहे ही.
नाही अमा, सलाड नको आहे. पण
नाही अमा, सलाड नको आहे. पण तुमची ही रेसिपी एरवी नक्की करणार. हेल्दी आहे.
अल्पना यस. अगदी परफेक्ट. फार काही मसाल्याचे वाटण वगैरे नाहीये यात. आणि थंडी स्पेशलच हवी होती.
धन्यवाद!
आमच्याकडे उसळ म्हणजे "ए आज
आमच्याकडे उसळ म्हणजे "ए आज काहीतरी मराठी खावंस वाटतंय ग." खाली फाइल केलेली आहे त्यामुळे ही एकच रेसिपी आम्ही ऑथेंटिक मराठी बनवत राहतो.
मला उसळी टिपिकल ब्राह्मणी
मला उसळी टिपिकल ब्राह्मणी पद्धतीच्याच आवडतात. म्हणजे गोडा मसाला, गुळ वगैरे मटकीच्या असतात तशा. फार फार तर चवळीच्या उसळीत लसणीची फोडणी. पण मुलींना उसळी म्हणजे एक तर मिसळीसारख्या तर्रीच्या किंवा पंजाबी पद्धतीच्या ग्रेव्हीतल्याच लागतात. आजकाल सटल चवींची काहीच मातबरी राहिलेली नाही हेच खरं
अर्थात पंजाबी घरगुती पद्धतीच्या रेसिपीज (जशा अल्पनाच्या असतात) सुद्धा खूप सौम्य असतात. हॉटेल्समधे फारच मसालेदार करतात हे लोक.
आजकाल सटल चवींची काहीच मातबरी
आजकाल सटल चवींची काहीच मातबरी राहिलेली नाही हेच खरं >> अगदी अनुमोदन,
घरगुती काहीतरी म्हणजे फार फार थकल्यावर किंवा बाहेरचे खाउन कंटाळा आल्यावर आईला मागायचे असे समीकरण झाले आहे. सम थिंग सिंपल? लाइक दॅट खिचडी यू मेक? ओ आय लव्ह मटकीची उसळ विथ पाव. ओ बटाट्याची भाजी इज टू डाय फॉर. आज जस्ट वरण भात तूप लाइकओल्ड टाइम्स. थालिपीठ वो क्या होता है? वडापाव - वो तो कँटिन में मिलता है. साबुदाणा खिचडी विथ दही? ऑल स्टार्च ना आप भी मत खाओ. चलो पिज्झा मंगाते है. खलास.
अमा... भारीच!
अमा... भारीच!
आजकाल सटल चवींची काहीच मातबरी
आजकाल सटल चवींची काहीच मातबरी राहिलेली नाही हेच खरं <<
अगदी अगदी..
प्रत्येक ठिकाणी जे पारंपरिक घरगुती म्हणून अन्न असतं त्याच्या चवी जनरली सटल असतात. पण ते हाटेलात आणून विकताना त्यात बदाबदा तेल आणि मसाले ओतल्याशिवाय का जमत नाही कोण जाणे.
ओल्या तुरीच्या दाणे आहेत
ओल्या तुरीच्या दाणे आहेत जवळ्पास अर्धा किलो.
ह्याच काय करता येइल? वाटण घालून रस्सा झालाय करून .
आमटी, कोफ्ते, कढी गोळे. कचोरी
आमटी, कोफ्ते, कढी गोळे. कचोरी
तुरीच्या दाण्यांची
तुरीच्या दाण्यांची कचोरी
इन्ना, ही पाकृ शोध. माबोवर आहे. कचोरी ऑसम लागते
इन्ना त्या तूरीच्या
इन्ना त्या तूरीच्या दाण्यान्ची कचोरी पण करतात. पण गुजराथी पद्धतीने करतात असे कुठेतरी वाचलय त्यामुळे नक्की कृती माहीत नाहीये. मायबोलीवर गायु वगैरे ला ती कृती माहीत असेल कदाचीत.
आणी उन्धियो मध्ये पण घालतात ना.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40001
सापडली ग. सुलेखा ताईन्ची आहे.
पौर्णिमा धन्यवाद. रेसेपी
पौर्णिमा धन्यवाद. रेसेपी मायबोलीवरची कळल्याने पटकन शोधता आली.:स्मित:
http://purvasfoodfunda.blogsp
http://purvasfoodfunda.blogspot.in/2014/12/tuvar-lilva-usal-turichya-dan...
हा नवीन ब्लॉग ( माझ्यासाठी नवीन असु शकतो कदाचीत) सापडलाय. बघु काय नवीन आहे ते.
Pages