पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इडली बीबी वर आहे की वाचलेली.
मला लिंक आठ्वत नाहीये. इड्ली फॅन क्लब असा आहे वाटतं. >>
शोधले मी पण नाही सापडतेय Sad

नरेशजी धन्यवाद!

या पाहिल्यात मी आधीही त्यात हिरवी चटणी जशी डेफोडिल्स व अजुन कुणितरी दिलेल्या फोटोसारखी नाहिये. तरीही जर नाहीच मिळाली चटणीची पाकृ तर अरुंधतींनी दिलेल्या दक्षिणात्य पद्धतीप्रमाणे फक्त लाल तिखटाच्याऐवजी हि.मिरची घालुन करेन.

निल्सन,
इडलीसाठी १ कप उडीद डाळ + १/२ तीस्पून मेथी ५-६ तास भिजवून वाटणे.
२ कप इडली रवा - घरी केलेला बारीक असेल तर अर्धा तास भिजवून डाळीच्या मिश्रणात घालायचा, जाड असेल तर ४-५ तास भिजवून तोही मिनीटभर ग्राइंडमधून फिरवून घे.
मूठभर पोहे भिजवून तेही उडीद डाळी बरोबर वाटून घे.
सगळे नीट मिक्स करुन बॅटर ८-१० तास उबदार जागी ठेवून इडल्या करायच्या.

निल्सनः तरला दलालचं हमखास यशस्वी प्रमाण आहे एक वाटी उडीद डाळ, एक वाटी पोहे आणि चार वाट्या इडली रवा. पैकी उडदाची डाळ सहा-सात भिजवायची, पोहे दहा पंधरा भिजवून घ्यायचे आणि इडली रवा नुसताच धुवून घ्यायचा. आणि सगळं एकत्र वाटून सहा-सात आंबवायला ठेवायचं.

मुंबईत असतांना आर सिटी मॉल मधे बनाना लिफ मधे खिचडी खाल्ली होती खुप आवडली होती. कोणाला रेसेपी माहित आहे का?

काल केल्या होत्या इडली रव्याच्या इडल्या.
प्रमाण १ किलो इडली रवा - अर्धा तास भिजवुन
अर्धा किलो पेक्षा थोडी कमी उडीद डाळ - ७-८ तास भिजवुन
वाटीभर पोहे व अर्धा चमचा मेथीदाणे - अर्धा तास भिजवुन
एकत्र करुन वाटले व एक चमचा तेल + पाणी घालुन आंबविण्यास ठेवले.
काय इडल्या झालेल्या यार मस्तच! एकदम लुसलुशित, पांढ-याशुभ्र, तोंडात सहज विळघरणार्या आहाहा!
आज सकाळी उरलेल्या पिठाच्या केल्या त्या ही सेम.
माबोवरील सर्व सुगरणींना धन्यवाद!
याआधी मी केलेल्या इडल्या नरम असत पण अशा लुसलुशित नसत. इथल्या टिप्स वाचुन फायदा झाला.

बाकी, इडली रवा आंबविलेल्या तांदळाचा असतो का? कारण पिठ खुप आंबले होते. इडल्या मस्त लागत होत्या पण डोसे फारच आंबट झाले.

आणि हो नारळाची चटणी अरुंधतींनी दिलेल्या चटणीची पाकृ दक्षिणात्य पद्धतीप्रमाणे फक्त लाल तिखटाच्याऐवजी हि.मिरची घालुन केली. पहिल्यांदा चटणी छान झाली. सर्वांना आवडली.
धन्यवाद अरुंधती कुलकर्णी !

बिर्याणी बरोबर जी ग्रेव्हि देतात हॉटेल मध्ये त्याची रेसिपी सांगु शकेल का कोणी ? मी घरी केली परंतु तशी चव नाहि जमली .

मी कांदा व लसुण (भाजुन), टोमॅटो, अद्रक कोथिंबीर असे मिक्सर मधे पेस्ट करुन त्यात नारळाचे दुध टाकुन फोड णी देते. त्यात तिखट, मिठ हळद टाकुन उकळुन घेते. छान ग्रेव्ही होते. बाहेर वेगळी मिळत असेल पण ही पण छान लागते बिर्याणी बरोबर.

मी काल मार्केट मधून सलगम आण्ले आहे पहिल्यांदाच. इथे माबो वर त्याची क्रुती नाही. त्याची भाजी कशी करायची? सलगम आणि नवल्कोल एकच की वेग्वेगळे?

शलगम साधारण दुधी भोपळ्याच्या चवीची असते. नवलकोल वेगळे असते. मी नेहेमी जीर्‍याची फोडणी देऊन तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड आणि दाण्याचा कूट टाकून करते. ही भाजी बर्‍यापैकी पाणी सोडते म्हणून वाफेवर बनवता येते. पाणी टाकायची आवश्यकता नाही. इकडे उत्तरेत सॅलड म्हणून खातात शलगम.

smitaklshripad, काजू करी साठी काजू साधारण 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. कांदा, खोबरे, कोथिंबीर, आले, लसूण यांना भाजून पेस्ट करा. तेलात ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवा. तिखट, काळा/ कांदे लसूण मसाला, हळद, मीठ टाका. पाणी टाका आणि काजू टाकून 3-4 उकळी काढा. काही लोक काजू न भिजवता तळून टाकतात.

शलगम म्हणजे टर्नप. पंजाबी स्टाईल ग्रेवीत घालून भाजी करता येइल. सुका जवळा टाकून वगैरेही करता येइल. स्ट्युमधे ढकलता येइल.

शलगम = टर्निप = तीच फळभाजी ना ज्याची स्किन इकडे तिकडे पर्पल असते>>> >>> हो.खाताना मुळ्याची आठवण येते.पणखूप माइल्ड.

मला दही वड्यामधील फक्त वड्याची कृती मिळेल का? आणि कुणी दहीवड्याचा साचा वापरुन पाहिला आहे का?

मेदूवड्याचा साचा मी वापरला आहे. मस्त वडे होतात. पण पीठ भरपूर लागतं. पीठ संपत आलं की साच्यातून वडे नीट पडत नाहीत. दहीवड्याचे वडे आम्ही वेगळे काही करत नाही. नेहेमीचे मेदू वडे असतात तीच कृती.

धन्यवाद पूनम.

मी खूप पुर्वी दहीवडे केले होते १० वर्षापुर्वी. छान झाले होते पण नंतर कधीच करुन पाहिले नाही. मी ती कृती विसरुन गेलो आता.

Pages