पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>माझ्यामते सुहाना हा केप्रचाच ब्रँड आहे. एकदा पाकीट नीट पहा...>> नाही. प्रविण मसालेवाल्यांचा ब्रॅन्ड आहे.

केप्रच्या भाजणीच्या, त्यांच्या डब्यावरल्या कृतीनुसार भिजवूनही मला चकल्या जमल्या नाहीत. कृती चुकली की भाजणीच जुनी होती माहिती नाही. शेवटी डाळीच्या पिठाऐवजी ही भाजणी पेरून सिमला मिर्ची आणि इतर पीठपेर्‍या भाज्या केल्या.

आमच्याइथे फक्त पटेलब्रदर्स्कडे केप्रच्या थालिपीठ आणि चकली भाजण्या मिळतात. एकतर शेल्फवर टिकत नाहीत इतका खप आहे. दिसलीच तरी पाकिटं विचित्र आणि जुनी दिस्तात. (तरी लोक घेतात! :P) चकलीभाजणीचा पुठ्ठ्याचा डबा उन्हात ठेवून रंग उडाल्यासारखा तर था.भा. प्लास्टिक पाकिटातल्या भाजणीवर लाइट आणि डार्क धब्बे, भाजणी युनिफॉर्मली न भाजली गेल्यासारखे!

मी आणि माझा नवरा दोघे तुझ्या नवर्याला हव तर राखी बांधतो. नवरा पाठवून दे>>> राखी बांधल्यावर (दुसर्‍याचा) नवरा मिळतो ? ऐकाव ते नवलच बै Proud सीमंतिनी, Light 1

मृणचं हे मात्र खरं... भाजणी पेरून केलेल्या भाज्या डाळीचं पीठ पेरून केलेल्या भाज्यांपेक्षा जास्त खमंग अन चविष्ट लागतात.

आता चकली करायला बोलवायचं म्हणजे काहीतरी नाते हवे ना? नाहीतर कोण येईल. ही स्वाती२ आहे म्हणून नाहीतर त्याला नक्की जावईच करून घेतला असता. हल्लीच्या काळी जावयाला चकली येणे इतकी दुसरी हक्काची चकलीची सोय नाही बघ! (अवांतर चालू झाल धाग्यावर. पण चकली करणे जरा वीक पाँइंट आहे.)

आमच्याइथे फक्त पटेलब्रदर्स्कडे केप्रच्या थालिपीठ आणि चकली भाजण्या मिळतात. एकतर शेल्फवर टिकत नाहीत इतका खप आहे. दिसलीच तरी पाकिटं विचित्र आणि जुनी दिस्तात. (तरी लोक घेतात! फिदीफिदी) चकलीभाजणीचा पुठ्ठ्याचा डबा उन्हात ठेवून रंग उडाल्यासारखा तर था.भा. प्लास्टिक पाकिटातल्या भाजणीवर लाइट आणि डार्क धब्बे, भाजणी युनिफॉर्मली न भाजली गेल्यासारखे!>>>

हे छान नविन वाटयातात डबे! थालिपिठ करुन बघितलित तर मस्त झाली,इतके वर्श आई भाजणी पाठवते त्याच्याच केल्यात..
प्रयोग म्हणुन मुगाच्या,सोअर क्रिमच्या पण केल्यात कधितरी पण नेहमी आईचीच भाजणी असते!
!

मेधा, मी पण तू दिलेल्या रेसीपीनीच करते सॅमन फक्त वजा चाट मसाला. आता तो ही टाकून करुन पाहिन. पहिल्यांदा उडीद-मेथी रेसीपी ट्राय करणार.

पमप्किन स्पाइस लाते मधील प. स्पाइस पावडर काय असते? ती घरी बनवता येइल का? सिनेमॉन
पावडर असेल. प्लस काय काय?

जाड पोह्यांच्या चिवड्याची स्टेप बाय स्टेप कृती हवी आहे. कुणीतरी दिवाळीच्या आधी टाकणार का ?
पोहे तळण्याची चाळणी नाहीये घरात. झारा वापरुन होऊ शकेल काय ?

अमा,
१ टीस्पून पंपकिन स्पाईस पावडर साठी पर्याय १/२ टीस्पून दालचिनी पावडर + १/४ टीस्पून सुंठ + १/८ टीस्पून जायफळ पावडर + १/८ टीस्पून लवंग पावडर
किंवा
१/२ टीस्पून दालचिनी पावडर + १/४ टीस्पून सुंठ + १/४ टीस्पून ऑलस्पाईस पावडर आणि १/८ टीस्पून जायफळ पावडर

मृणचं हे मात्र खरं... भाजणी पेरून केलेल्या भाज्या डाळीचं पीठ पेरून केलेल्या भाज्यांपेक्षा जास्त खमंग अन चविष्ट लागतात.+११ ...... भाजी काय सगळाच चविष्ट लागते.
माझा लेक एक दिवस सांगत आला कि मी आज ५ धिरडी खाली . मी आवाक.
बघते तर माझ्या बाई नी भाजणीच्या पिठाची धिरडी केली होती .

ज्वारीचं पीठ पेरूनही भाज्या खमंग होतात. कधीकधी केला जाणारा ज्वारी पीठ + बेसन + तांदळाचे पीठ अशी मिश्र पिठे लावून काकडी / दुधी / कॉलीफ्लॉवर / कोबी यांचा कोरोडा मस्त खमंग लागतो चवीला. सिमला मिरची, कांदा पात, कांद्याची पीठ पेरून भाजी वगैरेही मिश्र पीठे लावून खमंग होतात.

केप्र च्या चकलया होतात छान. मी तरी केलेलया दोनदा. जर्सीत मिळणारी पाकिटे तर ती पटेलची बाई बंद खोक्यातून उघडून काढून लावत होती दिवाळीच्या आसपास तेव्हा उचलली दोन पाकिटं हे आठवतय.

@प्रीति विराज, तिखटमिठाच्या पुऱ्या, घारगे, ठेपले, खाकरे, दशम्या, पुरणपोळ्या, साटोऱ्या, गुळपोळ्या.
चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे इत्यादी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ.
भडंग, बाकरवड्या, पुडाच्या वड्या, कोरडी भेळ वगैरे.
फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर पावभाजीची भाजी, छोले, बिऱ्याणी.

रव्याचा शिरा, मेथी पराठे
{मेथी कोरडी भाजुन घट्ट कणीक भिजवुन करायचे, दिवसा नुसार अयर टाईट डब्यात ठेवायचे}

प्रत्येक दिवसाचा एक डबा असं विभागुन घे. म्हणजे ४ दिवसाचे ४ छोटे डबे.
एकदा डबा उघडला की त्यतलं त्याच दिवशी संपेल असं पहावं.

सातूचे पीठ, नाचणी सत्व - आयत्या वेळी दूध घालून खीर. (मिल्क पावडर?)
लाह्यांचे पीठ किंवा लाह्या. दूध / ताक घालून किंवा नुसत्या.
व्हीटपफ्स, व्हीटफ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स वगैरे.
सुकामेवा, खजूर. चिक्की. राजगिरा / गूळपापडी / बेसन / रवा / नाचणी / बुंदी / चुरमुऱ्याचे लाडू. चणे-फुटाणे.
वेगवेगळ्या कोरड्या चटण्या (जवस, कारळे, तीळ, शेंगदाणे, खोबरे इ.)
मठरी, शेवगाठी, मुंगोटे व तत्सम पदार्थ
मॅगी, रेडी टू ईटवाले हवाबंद पदार्थ.

मावेत फ्रेंच फ्राईज होणे कठीण आहे. मावे केलेच तर त्या आक्रसतील. ग्रील असेल तर असे काहीतरी करता येईल.
( फ्रेंच फ्राईज साठी कन्व्हेंशन अवन किंवा एअर फ्रायर हवा. )

GRILLED POTATOES.jpg

दिनेशदा काय tempting दिसतयं स्मित >>> + १

मस्त दिसतयं ...

कन्व्हेंशन अवन आहे ....त्यात कस करणार?

शक्यतो नवीन बटाटे घ्या. त्याचे असे दोन भाग करून आणखी दोन तीन चिरा द्या. मग एका नॉन स्टीक भांड्यात थोडेसे तेल टाकून हे बटाटे पसरून ठेवा. अर्धा कप पाण्यात ( ६ मध्यम बटाट्यासाठी ) हळद, तिखट ( किंवा आवडता मसाला ) मीठ मिसळून या बटाट्यावर टाका. मध्यम आचेवर झाकण ठेवून बटाटे अर्धवट शिजवून घ्या. पाणी आटले पाहिजे.
मग एका डिशमधे असे मांडून ५/६ मिनिटे ग्रील करा. वरून तीळ, पुदीना, चाट मसाला शिवरा.

माझ्या एका मित्राला व्हेज मंच्युरीयनची रेसिपी पाहिजे आहे (बॅचलर्स लोक बनवू शकतील अशी. Happy ). लिंक असेल तर प्लीज शेअर करा.

Pages