पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधी केळी ह्ल्ली कॄत्रीमरीत्या पिकवलेली मुंबईत मिळतात. ती साधारण जास्त टिकत नाहीत.वेलची केळी त्यातल्या त्यात बरी, ती फार लहान असतात .पण तुम्ही म्हणताय ती बहुतेक राजेरी केळी ( देशी केळी सुद्धा) म्हणतात .ती केरळ ,बॅंगलोर वाल्या दुकानांमधे (१/२ ,एक अशा )वजनावर मिळतात.थोडी महाग असतात पण जास्त टिकतात.दिसायला मोठी व आतुन थोडी केशरी असतात.पिकल्यावरच खावी नाहीतर वाया जातात.त्यासाठी एक टिप -हे केळे पुर्ण काळे पड्ते तेव्हा खावे .खुप चवीष्ट लागते.(अगदिच लगेच खायची असतील तर दुकानदाराला विचारा. पिकले आहे का?)

मी उसगावात राहते. पण मी ऐकले आहे मी छान असतात लोणची. माझे दिर जाणार आहेत पुढच्या अठवड्यात, त्यांना सांगते आणुन ठेवायला.

भगवती आणि मंजू, आपण उर्वरीत गप्पा आपापल्या विपुत मारल्या तर चालणार आहे का?

मी फार भक्तिभावाने इकडचे प्रश्न वाचत असते. त्यातून कधी काही करायची देखील स्फुर्ती येत असते. तर ज्यासाठी हा धागा सुरू आहे त्यावर थोडं फोक्सड राहुया का? आभार्स Happy

विड्याच्या पानांची भजी मस्तच लागतात. विडे करून फ्रीजात ठेवल्यास तेही टिकू शकतात. फक्त ओले खोबरे टाळायचे.

इथे बहुतेक सुलेखा यांनी मुखवासाची कृती दिली होती. विड्याच्या पानांचा मुखवासही चांगला टिकतो फ्रीजमध्ये.

धन्यवाद अरुंधती.
भजी कशी करायची ? एकावेळी जास्त पानं खाल्ल्याने काहि अपाय नाहि होत ना? पान फारसे खात
नाहि म्हणुन विचार्तेय.

विड्याचा भात मस्त होतो. पाने मिक्सर मधून थोडे पाणी आणि थोडे आले कोथिंबीर घालून वाटून घ्यायची. जीरा राईस सारखा भात करायचा. जरा शिजत आला की विड्याचे मिश्रण घालून वाफा आणायच्या. मस्त होतो.

ऐतेनच की! मला फक्त विडा/पानच माहिती आहे. सुकं खोबरं घालून तांबूल करून एअरटाईट डब्यात फ्रिजात ठेवला तर आठवडाभर सहज टिकेल. पण मुळात तांबूल एवढा उरतच नाही. Happy

योकु, ही बहुतेक तामिळ रेसिपी आहे. मी मराठी जिभेला रुच्तील असे बदल केले Wink श्रावणात बरेच वेळा हा भात होतो. त्यामुळे कांदा नसतो.
http://www.nithaskitchen.com/2014/01/betel-leaves-rice-vetrilai-seeraga....

त्या साईट वरचा फोटो तर मस्तच दिसतोय तयार डिश चा. एकदा पाहावा लागेल करून. धन्यवाद सीमंतिनी लिंक शेअर केल्याबद्द्ल Happy

एक नोट करा पण, १ १/२ वाटी तयार राईस ला फक्त ४ विड्याची पानं वापलेली आहेत त्यात Happy

बेसनासोबत फ्री म्हणून २०० ग्राम मुगाचं पीठ आलेलं आहे.पीठ २००च ग्राम आहे हे ध्यानात ठेवून त्याचे लाडू सोडून अजून काय प्रकार करता येतील?

गोड पदार्थ कदाचीत सान्गतील बाकीचे पण त्याचे पिठले पण होऊ शकते. आजारपणात बेसन खायचे नव्हते तेव्हा साबानी घरी मुगाची डाळ दळुन त्याचे पिठले मला करुन दिले होते. बेसनासारखे खमन्ग लागत नाही पण बदल आणी पथ्यकर म्हणून ठीक वाटले.

नाहीतर त्या पीठाचे मुगौडे ( वडे, भजी ) बनु शकतील. ठेचलेले जीरे+ ओवा+ तिखट=कोथिम्बीर घालुन वडे होतात.

मूंग दाल के चीले: कांदा टोमाटो कापून. हिरवी मिरची, आले लसूण कोथिंबीर वाटून घालायची व रवा दोन चमचे. तव्यावर धिरडी टाकायची. बरोबर पांढरे लोणी. सकाळी नाश्त्याचा फेवरिट आयटम आहे.
बारके बारके तीन घालायचे व एकावर एक ठेवून वर लोणी सोडून खायचे.

भजी व भजी घालून सूप किंवा कढी.

मी चमचा चमचा पीठ कुठेही ढकलते म्हणजे मुलांच्या पॅनकेकचं रेडीमेड पीठ असतं त्यात, किंवा पीठ पेरूनच्या भाज्या असतात तिथे, थालीपीठत, डोशाचं पीठ पातळ झालं तर तिथे वगैरे ..बाकी काही नाही तरी फुकट हेल्दी प्रोटीन खाल्याचा फील येतो. रच्याकने, माझ्याकडचं मुगाचं पीठ अख्या मुगाचं (काळपट) आहे...(दुप्पट हेल्दी का काय ते Wink )
नंदिनी २०० ग्रॅमसाठी ढकलाढकली इज बेटर ऑप्शन.

मुगाच्या पीठाचं सूप छान होईल. पीठ पाणी घालून ब्लेंडरमधून काढायचं. हवं तेवढं पाणी घालून चांगलं उकळायचं. जिरं, मिरे, हळद, कढीलिंब, मिरची घालून सा. तुपाची फोडणी द्यायची. यात काकडी, फरसबी, दुधी या भाज्या छान जातात. तसंच खाताना ताक किंवा लिंबूरस घालून अजून चांगली चव येते.

माझ्याकडचं मुगाचं पीठ अख्या मुगाचं (काळपट) आहे...(दुप्पट हेल्दी का काय ते<<< हां हां! असलंच आहे ते पीठ.

अमा, चिल्यांची आयडीया बेश्टे. घरातल्या ज्युनिअर सदस्याला "दोसा आहे" म्हटलं की काहीही चालतं. तिला नक्कीच आवडेल.

शुगोल, सूपची आयडीयापण आवडली.

सबको धन्यवाद. Happy

मुठिया साठी बाजरीचे पीठ वापरावे. बाजरीला अंगचाच स्वाद असल्यामुळे चव फार छान लागते. म्हणूनच थेपले करताना सुद्धा बाजरीचे पीठ वापरतात.

एक वाटी रव्याचा उपमा करायचा असेल तर किती वाट्या पाणी घ्यावे लागेल? चार का? मागे मी ६ घेतले होते तर उपमा थोडा आसट झाला. तीन घेतले तर रवा फुलला नाही. चार घेऊन बघू का? रवा जाड आहे. लाडवाचा बारीक नाही? आणि उपम्यात फरसबी, गाजराचे तुकडे, मटार, शिमला मिरची, काजूगर हे साहित्य आहे पण मी ते थोडे अरतपरत करुन एक वाफ दिली आहे त्यांना म्हणून थोडे शिजलेलेच आहे.

Pages