पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणी पंगतीच्या लग्नात असते ना तश्या अळूच्या पातळ भाजीची रेसिपी देवू शकेल का?
कित्येक वर्षात तशी भाजीच खायला मिळाली नाही .

इथे आहे सविस्तर रेसिपी. त्यांनी डाळ-दाणे घातलेच आहेत, तुम्हाला आणखी 'शाही' करायची तर सुक्या खोबर्‍याचे पातळ काप आणि काजूही घालू शकता.

धन्यवाद , आता करते लगेच.
@दिनेश - जिलेबीचा पाक तर काही मिळणार नाही पण पंगतीतल्या भाजीची चव मात्र कधी विसरता येत नाही, आजकाल ८-१० stall च्या बुफे मध्ये ती चव फार मिस करते मी.

गेल्या काही वर्षात सोनपापडी / पतिसा खुप लोकप्रिय झाली आहे. ओगले आज्जींनी त्यात साबुदाण्याचे पिठ वापरायला सांगितलेले आहे. त्यांनी दिलेला फोटोही चांगला आहे. पण त्यांची कृती जरा वेगळी.
बाजारात मिळते ती कशी करतात ते या लिंकवर बघा.. ( नंतर सोनपापडी खावीशी वाटली तर खा Happy )

http://www.youtube.com/watch?v=f6pYxJl-gnI

मृणाल१, तुम्ही पुण्यात असाल तर काही डायनिंग हॉल्स / मंगल कार्यालयांच्या मेन्यूत ही (पंगतीच्या चवीची) भाजी असतेच असते. तिथे जेवून यायचे, हा का ना का.

एका एवे एठी ला सर्व लालुंच्या घरी जमले होते बाराकर वगैरे, तेव्हा आंबोळे बाईंनी करून नेली होती.
तयारीचे फोटो टाकले होते तेच एव्ढे सुबक आणि नीट होते कि भाजी मस्तच झाली असणार. वर क्वेरी आली तेव्हा मला ते फोटोच आठवले.

दिनेशदा., लिंक मस्त आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

नंतर सोनपापडी खावीशी वाटली तर खा >> हे का ते कळलं नाही. हाताने बनवली आहे म्हणून का?
हस्तस्पर्शविरहीत पदार्थ खायचे ठरवले तर मोतीचुराचे लाडू कसे खायला मिळणार? Happy

तसे नाही, आजकाल फुड प्रोसेसिंग करताना किमान स्वच्छता बाळगावी अशी अपेक्षा आहे. अगदी हातमोजे, टोप्या नकोत पण किमान स्वच्छता हवीच. बाकीचे पण व्हीडीओज आहेत. काही ठिकाणी हिच क्रिया मशीनने केलेली आहे.
आणि काही ठिकाणी... असोच.

मी सुतरफेणीचा व्हीडीओ शोधत होतो, नाहीच मिळाला तो. कुणाला सापडला आहे का ? तरला दलाल वगैरेंचे आहेत ते तयार शेव वापरून केलेले आहेत.

अरुंधती, पुण्यातच आहे मी पण आजकाल लग्नात पण अशी भाजी ठेवताच नाहीत . काहीतरी पंजाबी भाजी ठेवतात. ( राग)
बाकी कोणत्या डायनिंग हॉल्स मध्ये मिळेल असे जेवण . तुला आवडत असेल तर दोघी जावूयात

जकाल फुड प्रोसेसिंग करताना किमान स्वच्छता बाळगावी अशी अपेक्षा आहे.>>> हलवायाची मिठाई खावी,पण ती करत असताना पाहू नये म्हणतात ते यासाठीच. Happy

मृणाल १ > बहुधा श्रेयस वाल्यांकडे असेल. श्रुती मंगल कार्यालय वाले पण अशी भाजी देतात (छोट्या प्रमाणात सुद्धा) असे ऐकून आहे.

Aani besanpith fans .......ashipan aahe tehi havi aahe please...

श्राव्य, उजवीकडे कोपर्‍यात 'शोध' असे शब्द आणि त्याखाली एक रिकामी चौकट आहे. तिथे देवनागरीमध्ये चहा आणि बेसन असे वेगवेगळे दोनदा लिहा आणि शोधा. हवे तितके धागे दिसतील त्या त्या विषयावरचे.

मृणाल १, नळ स्टॉप कडुन म्हात्रे पुलाकडे जाताना, स्वीकार नावाचे एक हॉटेल आहे...
तिथे दर रवीवारी ही अळुची भाजी असलेली स्पेशल थाळी मिळते...मसालेभात ई ई महाराष्टीयन स्पेशल..
तिथे जाउन खाउन या...:-)

Thanks पौर्णिमा,, te karte aahe pan tyamdhe mi jo wachlela bb hota to kahi milat nahiye mala....barich charch hoti chaha karnyawar ....shodhat aahe mi pan to specific milat nahiye far diwsapurvi wachnyat aala hota...

मृणाल१

श्रेयस, सुवर्णरेखा डायनिंग हॉल, जनसेवा डायनिंग हॉल, आशा डायनिंग हॉल इथे अगोदर फोन करून त्या दिवशीच्या किंवा दुसर्‍या दिवशीच्या मेनूची चौकशी करा. बहुतेक वेळा रविवारी असते अळूची पातळ भाजी.

गावातले पूना बोर्डिंग हाऊस, बादशाही बोर्डिंग, लक्ष्मीकृपा इथेही मिळू शकेल. पूना गेस्ट हाऊस लक्ष्मी रोड इथेही असते बहुतेक अळूची भाजी. मथुरा (जंगली महाराज रोड)ला (अळूची भाजी सोडून) अनेक पालेभाज्या व मराठी पद्धतीच्या भाज्या मिळतात.

सामी, पार्ल्यात सुद्धा दुधीच्या वड्या टेस्टी मिळतात. आत्या घेऊन येते त्या दुकानाच नाव माहित नाही. मलापण आता खायची इच्छा झाली. कृती हवी आहे. Happy

शोरबा नावाचा प्रकार जो हॉटेलात मिळतो त्याची पाकृ कुणी सांगू शकेल काय?
सुप आणि शोरबा मध्ये काय फरक असतो? Uhoh

सिझलर मध्ये जो चॉकलेटीसर रंगाचा सॉस असतो त्याची सोप्पी कृती मिळेल? वॉर्सेस्टर सॉस न वापरता तो सॉस बनवता येईल काय?

सोनपापडी पाहिली, पण मला तर खुप आवडते, त्यामुळे इलाज नाही. शिवाय, हलवाई नेहमी कळकट्ट्च असतो Happy

Pages