Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी उपम्यासाठी दुप्पट पाणी
मी उपम्यासाठी दुप्पट पाणी उकळून घालते, रवा व्यवस्थीत फुलतो.
बी - जाड रव्याला जास्त पाणी
बी - जाड रव्याला जास्त पाणी लागत मऊ हवा की मोकळा हवाय उपमा? पाणी गरम्/उकळलेले जास्त असू द्या. चौपट टाका व वाफ काढून पहा. गरज पडल्यास जास्तीचे पाणी घाला.
धन्यवाद. मऊ आणि मोकळा दोन्ही
धन्यवाद. मऊ आणि मोकळा दोन्ही हवा आहे
मी एक चुक करत होतो बहुतेक. गार पाणी फोडणीत घालून फोडणीतच पाणी उकळायची वाट बघत होतो. आता कळले की आधीच पाणी ऊनऊन उकळून घ्यायचे.
सामी तू फक्त दुप्पट पाणी
सामी तू फक्त दुप्पट पाणी घेतेस
इतके कमी ..
मी पण दुप्पट पाणी घेते. उकळते
मी पण दुप्पट पाणी घेते.
उकळते पाणी फोडणीत घालणे हा सगळ्यात सोप्पा आणि रामबाण उपाय
अरे दुप्पट सांगणार्यांनो,
अरे दुप्पट सांगणार्यांनो, तुम्ही बहुदा बारीक रवा घेताय
बी, दुप्पट पाणी घेतल्यास उपमा
बी, दुप्पट पाणी घेतल्यास उपमा एक्दम मोकळा होतो, अजिबात चिकट होत नाही.
अरे दुप्पट सांगणार्यांनो, तुम्ही बहुदा बारीक रवा घेताय > नाही, जाडाच रवा. म्हणजे आपण उपमा करतो तोच रवा.
हो आमच्याकडे बारीकच रवा येतो
हो आमच्याकडे बारीकच रवा येतो
दुप्पट पाणी घेणार्यांनो,
दुप्पट पाणी घेणार्यांनो, तुमच्या रव्यात आणखी काय काय असतं? दोन तीन भाज्या घातल्यात तरीही दुप्पटच पाणी घेता का? आणि समजा पाणी कमी पडल अस जाणवल तर आणखी पाणी घातल तर चालत का? म्हणजे पाणी थोड जास्तिच गरम करुन ठेवायच.
दुप्पट पाणी घेणार्यांनो,
दुप्पट पाणी घेणार्यांनो, तुमच्या रव्यात आणखी काय काय असतं? दोन तीन भाज्या घातल्यात तरीही दुप्पटच पाणी घेता का? >> मी मटार, गाजर, काजू घालते
फोडणीत कांदा थोडा शिजला की , भाज्या घालायच्या. झाकून ठेवायचे. भाज्या जरा शिकल्या की भाजलेला रवा त्यात परतून घ्यायचा, खरपूस भाजले घेल्यावर उकळते पाणी घालायचे.
आणि समजा पाणी कमी पडल अस जाणवल तर आणखी पाणी घातल तर चालत का? म्हणजे पाणी थोड जास्तिच गरम करुन ठेवायच. > हो जास्तीच पाणी गरम करून ठेवायचे, लागल्यास घालायचे. पाणी आटले की मंद आचेवर झाकण लावून ठेवायचे. खाली उतरवताना वरून साजूक तूप घालायचे.
करून बघा आणि सांगा.
बी एक सांगू का? आपण तांब्याभर
बी एक सांगू का?
आपण तांब्याभर पाणी उकळून ठेवायचं.
फोडणी, त्यात भाज्या टाकून शिजवून घ्यायच्या, मग भाजलेला रवा याला परतून घेतलं की त्यात मीठ साखर (हिरवी मिरची नसेल तर लालपूड ) टाकायचं मग पुन्हा परतलं की हळू हळू उकळलेलं पाणी टाकायला सुरूवात करायची.
कुठे थांबायचं ते आपल्या लक्षात येतंच. मग झाकण ठेवायचं अर्ध्या मिनिटाने दाण्याचं कुट टाकायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं
एकदा हे करून बघा म्हणजे पाण्याचा अंदाज येईलच.
मला फारसा स्वयंपाक येत नाही पण उपिट जमतंच त्यामुळे सांगतेय थोडे दिवसांमधे अंदाज येतोच
बी, भाज्या ओल्या असतील (
बी, भाज्या ओल्या असतील ( मटार, फरसबी ) तर फारतर सव्वादोनपट पाणी घे. त्या भाज्या त्यांना सुटलेल्या पाण्यातच शिजतात.
रवा फोडणीत भाजून बाहेर काढ. मग दुसर्या फोडणीत भाज्या परत. त्यात पाणी ओत ( त्या पाण्यात थोडेसे ताक वा तूप टाक ) आणि पाणी उकळून भाज्या शिजल्या कि रवा टाक. ढवळून झाकण ठेवून एक वाफ काढ.. वेगळे पाणी उकळायची गरज नाही. असा वेळी रवा टाकल्यावर मिश्रण एकदम कोरडे वाटले तर थंड पाण्याचा हबका मारला तरी चालतो.
अय्यो सामी सेम पिंच
अय्यो सामी सेम पिंच
दिनेशदा, तुमची कृती अवघड आहे
दिनेशदा, तुमची कृती अवघड आहे
बी, फोडणीत रवा आधीच परततो
बी, फोडणीत रवा आधीच परततो आहेस का? आधी फोडणी करायची, भाज्या घालायच्या (शक्य असल्यास भाज्या मायक्रोव्हेव्हला आधी शिजवून घ्यायच्या) मग पाणी घालायचं, पाणी चांगलं उकळलं की रवा घालायचा. आता मिश्रण खदखदतं,. म्ग लगेच झाकण ठेवून आच मंद करायची. पाचेक मिनिटांनी आच बंद करायची. आणि अजून पाच मिनिटांनी झाकण काढायचं. मस्त मऊ मोकळा आणि फुललेला उपमा होतो.
अय्यो सामी सेम पिंच >
अय्यो सामी सेम पिंच >
असा फोडणीत भाजलेला रवा आधी
असा फोडणीत भाजलेला रवा आधी तयार करून फ्रिजमधे ठेवता येतो. आयत्यावेळी पाणी उकळले आणि त्यात तो टाकला कि उपमा तयार. भाज्या आयत्यावेळी असतील त्या वापरायच्या.
त्या दह्यासारखा उपमा /
त्या दह्यासारखा उपमा / उप्पीटाचा धागा काढा आता!
रवा कोरडा भाजून मग उपमा केल्यास सोपा पडतो हेमावैम. तेलही कमी लागतं. पण पूर्ण तयार झाला की बाजूनी चमचाभर साजूक तूप सोडलं तर अजूनच चविष्ट लागतो उपमा.
रवा कोरडा भाजून मग उपमा
रवा कोरडा भाजून मग उपमा केल्यास सोपा पडतो हेमावैम. तेलही कमी लागतं. पण पूर्ण तयार झाला की बाजूनी चमचाभर साजूक तूप सोडलं तर अजूनच चविष्ट लागतो उपमा.
>>
हायला! मी आत्तापर्यंत हीच पाकृ समजत होते. म्हणजे लागणार्या जिन्नसांमधेच भाजलेला रवा
काही लोक्स (म्हणजे आई/आजी !)
काही लोक्स (म्हणजे आई/आजी !) एकाच फोडणीत सगळं करतात. त्यांना ते दोन वेळा करायचा कंटाळा येतो असं वाटतं...
सही टिप्स मिळाल्यात
सही टिप्स मिळाल्यात सर्वांकडून! ताकाची कल्पना छानच आहे. मी तुप वापरत नाही फारसे. पंचामृतात जेवढे चाखायला मिळते तेवढेच आपले!!!!!
मला आणखी दोन गोष्टींबद्दल विचारयचे आहे. वेगळा धागा काढत नाही कारण इथे मग कुरकुर निर्माण होते, तरः
१) ब्राऊन राईस: अर्धा वाटी ब्राउन राईस शिजवताना किती वाट्या पाणी घालायचे आणि हा राईस कुकर मधे की पातेल्यात शिजवायचा? बासमती बा.उ. साठी वेगळे पाण्याचे अंदाज आहे का?
२) मी बेसन करताना आधी डाळ भिजवून मग ती ग्राईंड करुन घेतो. नेहमीच्या साध्या फोडणीत डाळ कोरडी होईपर्यंत शिजू देतो. साधारण कचोरीच्य आत जसे सारण असते ना तितपत बेसन होते. तुमची बेसनाची पद्धत कशी आहे? कधीकधी ताकात डाळ ग्राईड करतो.
कोनाला इथे veg or - non-veg
कोनाला इथे veg or - non-veg सुप बद्दल माहिति आहे का?
link forward करावि plzzzz.
ब्राउन राईसला मी एकास तीन असे
ब्राउन राईसला मी एकास तीन असे पाण्याचे प्रमाण घेते. बासमती ब्राउन साठी पण तेच.
अदिती, तू कुकरात शिजवतेस की
अदिती, तू कुकरात शिजवतेस की पातेल्यात?
योकु सेम पिंच! मी थोडंसं दूध
योकु सेम पिंच! मी थोडंसं दूध घालते, उपमा मऊ होतो व रंगही छान येतो. आलं आवश्क घटक!
बी - तिप्पट पाणी अन पूर्णवेळ गॅस सीमच ठेवायचा. प्रेशर आल्यावर पाच मि ठेवायचा कुकर. डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायचा.
kohalya pasun kay banavata
kohalya pasun kay banavata yeil tyachi receipe koni deil ka?
ghari 2 kohale aahet. kacche ( hirave ) aahet.
गार्गि, कोहळे फार कोवळे
गार्गि, कोहळे फार कोवळे नसावेत, तसे खाऊ नयेत.
त्यापासून थालिपिठ, सार, पेठा, खीर असे अनेक प्रकार करता येतात.
मटकी, कुळीथ अश्या कडधान्यात टाकता येतात.
खोबरे लाल मिरची व धणे यांचे वाटण लावून भाजी करता येते.
सांबार मधे वापरता येतो.
अखंड कोहळा सहसा खराब होत नाही. तो न कापता टिकू शकेल.
सांडगे पण करतात. तूकडे करून ताकात ( मीठ मिरची घालून) भिजवून वाळवून ठेवता येतात. ( ते आयत्यावेळी तळायचे. )
धन्यवाद दिनेश दा
धन्यवाद दिनेश दा
एक वाटी रव्याचा उपमा करायचा
एक वाटी रव्याचा उपमा करायचा असेल तर किती वाट्या पाणी घ्यावे लागेल? >>>>>> दोन-सव्वादोन वाट्या गरम पाणी लागेल.मात्र रवा व्यवस्थित भाजलेला असावा.नाहीतर उपमा चिकट होऊ शकतो.उपमा झाल्यावर वर दिल्याप्रमाणे १ छोटा चमचा साजूक तूप घातले तर्स्वाद मस्त येतो.
Mulala (13 years old )
Mulala (13 years old ) football match sathi baryach wela mumbaitlya mumbai madhey javel lagte. Sakali jaun sandhyakali parat potbhar Kay deta yeil jaast dabe nyayla tayar hot nahi. Poli roll kele ter kuthlya bhajya karta yetil?
Pages