पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाळ वाटुन कोथिंबीरीच्या वाफवुन वड्या, ह्याच वाफवलेल्या वड्या कुसकरुन त्याला फोडणी करुन, कांदा परतवुन भाजीही मस्त लागते.

काहीच जमलं नाही वेळेत तर सिरियसली दळून पीठ करून ठेव. पीठाचे अनंत प्रकार करता येतात. संपत नसेल तर फ्रीझरमध्ये ठेवता येईल.
पुरण सर्वात सोपे आणि बेस्ट. बरीच डाळ संपेल. पुरण फ्रीजात चार दिवस तरी टिकेलच.
मुळ्याचा चटका कर, डाळ भिजवून. यम्मी प्रकार.
मिनीने इथे दिले आहेत ते डोसे कर. नाव आठवेना त्यांचं Uhoh आठवली की लिंक देते.

बेसनाचा बाफ आहे मजला वाट्ते. चण्याच्या डाळीचे इतके पदार्थ रोज खाल्ले तर ते पोटाला जड आहे पचायला. एक दिवसाआड करून संपविता येइल.

नीधप, ईडलीच्या पीठात भिजवलेली ह. डाळ घालून ईडली वाफवायची. दिसायला ही छान आणि चवीला सुद्धा मस्त लागतात.
ह. डा. भिजवून. वाटून अळूवडी करायची. टेस्टी होतात.
आंबोळीचे तांदूळ भिजवताना त्यातसुद्धा पाव वाटी ह. डाळ घालतात.

ते ह.डा लिहिणं बंद करा पाहू. पुन्हा पुन्हा 'हाड'च वाचतेय मी.>>>:फिदी: मला पण सेम.

पौर्णिमाचा सल्ला बेष्ट. फ्रिझरमध्ये ठेवली की निदान २ ते ३ महिने टिकेलच, किडे, अळ्या पण होणार नाही.

उद्या सकाळी ८ च्या दरम्यान ब्रेफ्फासाठी डोसे करायचेयत.उशीरा लक्षात आल्यामुळे आत्ता
३:३० वाजता इड्लीरवा आणि उडीद डाळ भिजवली आहे. तर रात्री १० पर्यंंत भिजेल क दोन्ही?
१० वाजता वाटून ठेवल्यावर सकाळी फक्त डोसे घालायचं काम ठेवता येईल.

प्रज्ञा, नक्की भिजेल.. पण आपल्याकडे हवामान थंड असेल तर पिठ पुरेसे आंबेल कि नाही याची शंका आहे.
त्यामूळे जरा उबदार जागी ठेवावे लागेल. जरा लवकर वाटले ९/ ९.३० ला तरी चालेल.

९ मी फारतर २/२.५ तास भिजवून वाटते. जास्त थंड असेल वातावरण तर एखाद तास जास्त. भिजली डाळ जास्त जोर न लावता तुकडे होत असली की झाले. भिजल्यावर बाहेर खूप थंडी असेल तर दिनेशदांनी सांगितले तसे उबदार जागी, किंवा अवनचा लाईट ऑन करून त्याखाली ठेवले तरी चालते.

३:३० वाजता इड्लीरवा आणि उडीद डाळ भिजवली आहे. तर रात्री १० पर्यंंत भिजेल क दोन्ही?<< आरामात.

मी इडली डोश्याचं पीठ चार वाजता चहाच्या वेळेलाच भिजवते आणी रात्री जेवायच्या दरम्यान रूब्बीत टाकते. तासभरात दळून होतं.

सुनिधीला शाळेमध्ये डब्यातून सॅलड द्यायचं आहे. मी उकडलेले बटाटे, डालिंब, स्वीट कॉर्न, गाजर असं चिरून वाफवून एकत्र करून द्यायचा विचार करतेय. त्याला ड्रेसिंग म्हणून काय चांगलं वाटेल. ?

स्ट्रीक्टली नो मिरची, लाल तिखट, काळी मिरी.

मध??

तिला मिक्स्ड हर्ब्जची चव आवडते का? किंचित मीठ व मिक्स हर्ब्ज भुरभुरून. (परवानगी असल्यास वरून थोडे किसलेले चीज)
उकडलेला बटाटा, गाजर, स्वीट कॉर्नला नेहमीचे मीठ-साखर-लिंबाचे ड्रेसिंगही छान लागेल.
किंवा चाट मसाला भुरभुरून.

अकु, आज करून खायला देऊन बघते.

जे टिल्लं आपला डबा सर्वात आधी संपवेल त्याला बक्षीस आहे. मातांच्या सुगरणपणाची इतकी बेभरवशी टेस्टिंग ठेवणारे शाळावाले धन्य आहेत. आमच्याकडे कधी नुसतीच कच्चा दुधी खाल्ला जातो तर पुढच्याच अठवड्यात "दुधाची बाजी नक्को" असा सूर लागतो. Happy

धन्य आहेत खरच... डब्बे एक्चेंज करायला सांगा.. दुसर्‍यांच्या डब्ब्यातलं नेहमीच जास्त आवडतं बर्‍याचदा

खरचं धन्य आहेत शाळावाले. नंदिनी, तुझी कसोटी आहे ग बाई !! एक सजेशन नेहमीपेक्षा थोडा कमीच दे म्हणजे संपेल. ( स्मित)

काही का करेनात. आपण डबा भरून द्यायचा! सगळं खाल्लंतर वावा, नाहीतर पोटभरेल इतकं खाऊन आली तरी चालेल. रोज शाळेमध्ये स्नॅक्स देतात पण या स्पर्धेसाठी घरून डबा आणायचाय.

Pages