पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदानी मागे एकदा साखरेच्या पाकाविशयी खुप छान माहिती दिली होती. ती सापडत नाही आता. कोणाला माहीत असल्यास प्लिज लिंक द्या.

हो जिप्सी,नॉरचे मांचुरियन मस्त आहे. त्यात दिल्याप्रमाणे केले तर मस्त होते.पण आता दिनेश यांनी लिंक दिली आहे तर पुन्हा करताना तीच प्रिफर करेन असे म्हणतेय.

दिनेशदानी मागे एकदा साखरेच्या पाकाविशयी खुप छान माहिती दिली होती .मला ही लिंक सापडली.>> http://www.maayboli.com/node/11362 .

शोधताना ही दिवाळी फराळाची भरपुर माहीती सापडली. http://www.maayboli.com/taxonomy/term/260?page=4 .
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

५-६ किलो टोमॅटो घरात आहेत.. अर्धवट पिकलेले.. काय करता येइल? प्रश्न इथे बरोबर आहे ना? की दुसर्‍या कोणत्या धाग्यावर लिहु?

चि, टोमॅटोचा सॉस बनव.
कच्ची केळी कोणत्या प्रकारची आहेत??? त्यावरून रेसीपी सुचवता येईल
कच्च्या केळ्याची काप, भजी, भाजी. कच्च्या केळ्याच पीठ

एक अख्खा कच्च्या केळांचा घड आहे.. त्याचं काय काय करता येइल?
>> वेफर्स?
कच्च्या केळांचे तळलेले वेफर्स मस्त लागतात Happy
एकदिवस भाजी करता येईल.
एक दिवस केरळ्यांकडे असते तशी केळ्याची भजी (पाळंबुरी) करता येईल.

टोमॅटोचे सॉस करून बरणीत भरून ठेव.
एक दिवस जेवणात सार कर.
एक दिवस सूप कर (आणि मला बोलव घरी सूप प्यायला Proud )

कच्ची केळी कोणत्या प्रकारची आहेत??? >>>>> माहित नाही.. हे कसं कळणार आता? छोटी आहेत केळी.. बहुदा सोन्केळी असावीत..

सुप, सार च्या सोप्प्य्या रेसिपी द्या ना.. केळाचे वेफर्स करायच्या टिपा पण द्या

चिमुरी, उजवीकडच्या 'शोध' या खिडकीत 'टोमॅटो' आणि 'कच्ची केळी' असे वेगवेगळे दोन वेळा लिहिलेस आणि शोधलेस तर मायबोलीवरच्या अनेक रेसिपी सापडतील.
इन्टरनेटवर तर टोमॅटो सूप/ सार, नुसत्या टोमॅटो रेसिपीज असे शोधलेस तर अनेक पर्याय मिळतील.

ओक्के पौर्णिमा... पण नेट वरच्या हमखास यशस्वी, अगदी डोळे झाकुन विश्वास ठेवाव्या अश्या रेसिपी नाही गं ओळखता येत.. माबोवरच्या शोधते..

मला नव्हतं माहीत <<< रीया, केरळात राहून तूझा काही फायदा झाला नाही. Happy ही केळी आकाराने मोठी असतात आणि तेलात टाकल्यावर त्याला पिवळा रंग येतो. तुमच्या इकडे केरला स्टोअर्स असेल तर त्यांच्याकडे तुला ही केळी मिळतील.

चि, सोनकेळी म्हणजे वेलची केळी असेल तर वेफर्स नाही होत. भाजी, भजी टेस्टी होत नाहीत. भाजी आणि भजीची केळी वेगळी असतात. ही केळी पिकल्यावर बर्फी बनव खूप टेस्टी होते. माझी फेव्हरेट आणि मला पिकलेली केळी आणी बर्फी कुरीअर कर. Wink इथे वेलची केळी आणायला खूप लांब जाव लागत. Angry

भाजी काल केलेली.. मस्त झालेली.. वाफवुन, चकत्या केल्या.. जिरं, मोहरी, लसुन अन मिरची वाटुन, कोथिंबीर, भरपुर ओलं खोबरं..

युक्ती सुचवामध्ये मी हाच प्रश्न विचारला होता तो शोधत बसावा लागेल ...१. वडे
कच्च्या केळ्याना वाफवुन त्यात कांदा, तिखट, चाट मसाला, जिरे, थोडा ओवा , थोडा गरम मसाला, कोथिम्बीर टाकुन मळा व त्याचे चपटे वडे करुन रव्यात घोळवुन वडे शेलो फ्राय करा.
( हे बाटाटा वड्यासारखे पण करता येतात )

२. कापं...
कच्च्या केळ्याना सालं काढुन तिरके काप करुन थोडी लसुण पेस्ट , मीठ , हळद, मसाला लावुन ठेवायचा १५ मिन. नंतर तांदुळाच्या पिठात थोडा रवा, मीठ , तिखट घालुन त्यात हे काप घोळवुन फिश फ्राय सारखे फ्राय करा.
खायला देताना आवडत असेल तर लिंबु पिळुन द्या.

३. पुर्र्या
केळी वाफवुन घ्यायची. ती कुस्करुन ठेवायची..आता त्यात मिठ , हिरव्या मिरचीची आणि लसुणाची पेस्ट, थोडी हळद मिक्स करायची..मग कणीक मळायला घेते वेळी ही कुस्करलेली केळी मिक्स करुन छान मळुन घ्यायचे आणि पुर्या लाटुन तळायचे

४. भाजी
केळ्याची साले काढुन तुकडे करायचे मग तेलाय कांदा, लसुण , जीरे, हिंग , हळद, मिरचीची फोडणी देउन भाजी टाकुन परतायची. लागेल तितक पाणी टाकुन भाजी शिजवायची.. पण रस भाजी नाही झाली पाहिजे..सुकीच ठेवायची. खोबरं टाकुन तयार.....

५. पराठे
हे पराठे बटाटयाच्या पराठ्याच्या क्रुती ने करायचे....

आधीही एकदोनदा लिहिली आहे बहुदा, पण परत थोडक्यात
कच्च्या केळ्याचे कोफ्ते -
कच्चं केळं, कच्ची पपई आणि बटाटे समप्रमाणात कुकरमधून उकडून घेऊन थोडं मीठ घालून एकत्र मळून कोफ्ते करून घ्यायचे. मिळून येण्यासाठी कदाचित बटाटा थोडा जास्त प्रमाणात लागेल/ कोफ्ते तळून घेऊन एकीकडे तेलात जिरेपूड, तमालपत्र, आलं, धणेपूड, हळद, तिखट/मिरची वगैरे घालून उकळी आली की सोडायचे.

Pages