Submitted by बिल्वा on 21 October, 2011 - 09:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. १ छोटा कुठल्याही ब्रँडचा sour cream चा डबा.
२. तांदळाचे पीठ
३. अगदी बारीक किसलेलं आलं
४. चवीप्रमाणे तिखट, मीठ
५. खसखस
६. ओवा
क्रमवार पाककृती:
sour cream मध्ये मावेल येवढचं तांदळाचं पीठ घालायचं. त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.
त्यात ओवा, तिखट, खसखस, आलं, आणि मीठ घालायचं. आणि लगेच चकल्या करायच्या.
वाढणी/प्रमाण:
खाऊ तश्या :)
अधिक टिपा:
अगदी, नाजूक, खुसखुशीत चकल्या होतात. चकलीच्या पिठात हळद घालायची नाही. हळद deep fry करताना जळते आणि मग काळपट रंग येतो.
ही मूळ कृती आर्चची आहे. जुन्या माबोवर तिने २००५ मध्ये लिहीली होती. आजपर्यंत दरवर्षी मी ह्याच रेसिपीने चकल्या केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत. अतिशय मस्त चवीच्या चकल्या होतात.
फोटो नाही. तुम्हीच करा आणि फोटो डकवा इथे.
माहितीचा स्रोत:
मूळ रेसिपी आर्च ची आहे. जुन्या माबोवर ती इथे आहे. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91783.html?1130424502
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, ह्या चकल्या
हो, ह्या चकल्या मस्स्स्स्स्स्स्स्स्त होतात. फोटो बेशय.
सुरेख दिसतायेत चकल्या.
सुरेख दिसतायेत चकल्या.
आर्च, चकल्या मस्त दिसत आहेत.
आर्च, चकल्या मस्त दिसत आहेत. कधी करायचा योग येईल कोण जाणे
आर्च, मस्त दिसतायेत चकल्या.
आर्च, मस्त दिसतायेत चकल्या. मी काल शोधले तांदळाचे पिठ पण नाही मिळाले मला. घरी मिक्सरवर तांदूळ दळून केलेले पिठ चालेल का?
नेहमीच्या चकल्यांच्या तुलनेत
नेहमीच्या चकल्यांच्या तुलनेत यांची चव कशी असते?
दिसायला मस्तच आहेत.
पाककृतीसाठी धन्यवाद!
आर्च काय सुरेख दिसतायेत. सगळा
आर्च काय सुरेख दिसतायेत.
सगळा फराळ झालाय, आता चकल्यांची वाट पाहतेय.
आर्च, मी मागच्या वर्षी
आर्च, मी मागच्या वर्षी केलेल्या तेंव्हा त्या खूप तेलकट झालेल्या शिवाय चकली खाल्यानंतर sour creme ची after taste खूप strong लागायची. तू कोणत्या ब्रँड चं क्रीम वापरतेस? किंवा तळताना काही चुकलं असेल का?
मी केल्या या पद्ध्तीने
मी केल्या या पद्ध्तीने चकल्या...
चवीला चांगल्या झाल्या, पण तुकडे पडलेत.
चकली साच्यातुन काढताना च तुटत होती, अगदी कढइत टाकेपर्यंत सुध्दा एक्संघ राहिल्या नाहीत्..
माझे काय चुकले??
मधुरा, खास कुठचा असा ब्रँड
मधुरा, खास कुठचा असा ब्रँड नाही. हळद घालायची नाही. आलं घातलं होतस का? आलं आणि ओव्याने sour cream ची टेस्ट जायला पाहिजे. नाही ग तेलकट नाही होत.
एक मुलगी, तांदूळाचं पीठ जुनं होतं का? ह्या खरच करायला सोप्या आहेत. एकतर पटकन होतात आणि खुसखुशीत होतात आणि रहातात. फोटोत दिसत नसतील पण दिसतातपण नाजूक.
बेफिकीर, घरच्या भाजाणीच्या चकलीची चव नाही येत पण छान लागतात. परिश्रमपण खूप कमी न! मुरकूसारख्या कडक किंवा बेचव नसतात.
रैना | 25 October, 2011 -
रैना | 25 October, 2011 - 00:11
आर्च काय सुरेख दिसतायेत.
>>>
आर्च | 25 October, 2011 - 00:39 नवीन
बेफिकीर, घरच्या भाजाणीच्या चकलीची चव नाही येत पण छान लागतात. परिश्रमपण खूप कमी न! मुरकूसारख्या कडक किंवा बेचव नसतात.>>>
आर्च = बिल्वा?
(घरच्या भाजणीच्या चकल्यांची चव नाही येत - तसं नाही हो, मी आपलं सहज विचारलं होतं, याही मस्तच लागतील याबाबत अजिबातच संदेह नाही.)
-'बेफिकीर'!
एक मुलगी, तांदूळाचं पीठ जुनं
एक मुलगी, तांदूळाचं पीठ जुनं होतं का? ह्या खरच करायला सोप्या आहेत. एकतर पटकन होतात आणि खुसखुशीत होतात आणि रहातात. फोटोत दिसत नसतील पण दिसतातपण नाजूक.>>>
तांदळाचं पीठ याच आठ्वड्यात आणलं..दुकानात ते किती दिवस आधी पासून पडून होतं ते सांगता येत नाही.
बाकी दिसायला न चवीला छान झाल्यात. तेल्कट नाहीत, करायला अगदी सोप्या. लेक आनंदाने खातोय, तुकडे झालेत तर तोडण्याचे कष्ट वाचले म्हणायचे
Sour Cream ऐवजी काय वापरता
Sour Cream ऐवजी काय वापरता येइल?
Sour Cream ऐवजी काय वापरता
Sour Cream ऐवजी काय वापरता येइल?>>> मलादेखील हेच विचारायचे होते.
मुंबईत मिळते का? कुठल्या ब्रँडचे?
चक्का वापरून पहा>>> अशी वर पोस्ट आहे. पण चक्का आंबट हवा का??
सायीचे आंबट दही चालेल का?
Sour Cream ऐवजी काय वापरता
Sour Cream ऐवजी काय वापरता येइल?>>> मलादेखील हेच विचारायचे होते.
Sour Cream किती आउंस घ्यायचे?
Sour Cream किती आउंस घ्यायचे? म्हणजे ८ की १६?
वर्षा_म > sour cream ऐवजी
वर्षा_म > sour cream ऐवजी चक्का वापरून बघता येईल.
चक्का आंबट नको.
मनी > sour cream मध्ये मावेल एवढं तांदळाच पीठ घालायच. किती चकल्या करायच्या त्यावर किती औंस sour cream घ्यायच ते ठरवायला लागेल.
मी केल्या या चकल्या काल. मस्त
मी केल्या या चकल्या काल. मस्त तर लागत आहेत पण कुरकुरीत न होता एक्दम कडक झाल्या आहेत. काय चुकलं का ? की कुरकुरीत होतचं नाहीत या?
काल sour cream संपवण्यसाठी या
काल sour cream संपवण्यसाठी या चकल्या केल्या. मात्र या वेळी बेक केल्या. चांगल्या झाल्या म्हणून इथे नोंद करुन ठेवत आहे.
ओव्हन टेंप ३५० फॅ. कुकीशीटवर पार्चमेंट पेपर वर सोर्यातून चकल्या पाडल्या. सिलिकॉन ब्रशने तेल लावले आणि ओव्हनमधे १५ मिनिटे ठेवल्या. बाहेर काढून उलटल्या. पुन्हा ब्रशने तेल लावले आणि ओव्हनमधे १७ मिनीटे ठेवल्या. बाहेर काढून कुकीशीटवर गार होवू दिल्या.
Pages