Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना, इथे
साधना, इथे बघ.
http://www.foodnetwork.com/recipes/ree-drummond/homemade-bbq-sauce-recip...
पण Worcestershire sauce वापरायला हवाच. ( रच्याकने या सॉसमधे आपला हिंग असतो. आणि याची कृतीही मूळ भारतीयच आहे. )
श्राव्या, http://www.maayboli
श्राव्या,
http://www.maayboli.com/node/47092 बेसनपीठ फॅन क्लब
http://www.maayboli.com/node/25157 तुम्ही चहा कसा करता?
दिनेश यांचे बरोबर आहे. वूस्टर
दिनेश यांचे बरोबर आहे. वूस्टर सॉस हवाच. आमच्या इथल्या पॉपटेट्स मध्ये भन्नाट सॉस येतो सिझलर बरोबर. वाटी वाटी ओरपला आहे मी. फ्रेंच फ्राइज बरोबर पण मस्त लागतो. किंवा मग ते कॉर्न व्हाइट सॉस मध्ये अस्तात त्यात एक ठिपका घातला तरी फार मस्त लागते.
सॅमन फिश देशी पद्धतीनी (
सॅमन फिश देशी पद्धतीनी ( म्हण्जेच देशी मसाले वापरुन) कूक करायचा आहे. रेसीपी सापड्ली नाही. कोणाला माहित आहे का?
मी उडीद-मेथीच्या
मी उडीद-मेथीच्या बांगड्याप्रमाणे करते.
स्वाती २, धन्यवाद! करुन बघते.
स्वाती २, धन्यवाद! करुन बघते.
पण Worcestershire sauce
पण Worcestershire sauce वापरायला हवाच. ( रच्याकने या सॉसमधे आपला हिंग असतो. आणि याची कृतीही मूळ भारतीयच आहे. )
<<
दिनेशदा,
तुम्ही शाकाहारी आहात ना? त्या वूस्टरशायर सॉसमधे अँचोव्हीज असतात. आणि हो, बियर सुद्धा.
शुगोल, मी तिखट मिठ, हळद लाउन,
शुगोल, मी तिखट मिठ, हळद लाउन, तव्यावर फ्राय केला आहे. पण मिठ, मिरे, लिंबुरस मधेच बेस्ट लागतो
राजस्थानी स्टाइल बटाटा स्टफ
राजस्थानी स्टाइल बटाटा स्टफ करुन सिमला मिरचीची ग्रेव्ही असलेली भाजी कशी करायची? कोणाकडे पाककॄती आहे का?
गोड बुंदी घरी कशी बनवता येइल.
गोड बुंदी घरी कशी बनवता येइल. मैदा वापरायचा कि बेसन? जलेबीचेच पीठ का?
अमा... घरी करण्यापेक्षा विकत
अमा... घरी करण्यापेक्षा विकत पहा.
स्वस्त अन सोपं पडेल. नंतरचा पसारा म्हणजे वईताग. तूप, कढई, झारा, परात, पाकाचं भांडं अन काय काय!
अर्थात मोठ्या प्रमाणात करायची असेल तर गोष्ट वेगळी...
माझ्या माहितीप्रमाणे जरा रवाळ बेसन वापरतात. एकतारी पाक लागेल, मळी काढलेला.
आबईच्या शेन्गान्ची भाजी किती
आबईच्या शेन्गान्ची भाजी किती प्रकारे करता येउ शकते?
इथे एका धाग्यावर कारळाचा कुट घालुन करायचा प्रकार दिला आहे.
योकु.. अगदी खरं. अमा.. ती
योकु.. अगदी खरं.
अमा.. ती उस्तवार नकोच वाटते!
पण रवाळ बेसन भिजवुन त्यात कडक डीत मोहन टाकुन भज्याच्या पिठा इतपत भिजवायचं.
आपला सा ध झारा तुप तापत ठेवलेल्या क ढईवर ठेउन त्यवर पिठ टाकुन तो थडा थडा आपटायचा गरम तुपात.. मण्द आचेवर.. मग त्याचे टीअर ड्रोप्स प डतात तुपात
.. ते जरा गोल्डन झाले की पाकात टाकायचे... पुढच्या घाण्याच्या वेळी आधीच्या बुंद्या उपसायच्या..
मग ह्यात गरम तुप टाकुन गरम करुन वळायला घ्यायचे!
एक हिरा बेसन नावाचे खास बुंदी
एक हिरा बेसन नावाचे खास बुंदी बेसन मिळते ते वापरून आम्ही बुंदी करतो.
इब्लिस मी खात नाही हो.. फक्त
इब्लिस मी खात नाही हो.. फक्त माहिती संग्रहात ठेवतो. ( म्हणजे काय खायचे, काय टाळायचे ते कळते
)
धन्यवादम. माझ्याकडे
धन्यवादम. माझ्याकडे प्रिसाइसली अर्धीवाटी पाक वाचलेला आहे.
त्या पाकात करायची आहे का
त्या पाकात करायची आहे का बुंदी अमा??
मला कळ्ळं नाही!
सॅमन फिश देशी पद्धतीनी >>
सॅमन फिश देशी पद्धतीनी >> हळद, तिखट मीठ लावून ठेवायचे बाइट साइझ तुकड्यांना थोडावेळ.
मग पसरट पॅनमधे जरा सढळ हाताने तेल घालून तुकडे परतायचे . ऑलमोस्ट होत आले की हवी भरपूर हिरवी चटणी + लिंबु रस सर्व तुकड्यांना नीट लागेल असे पसरवून घालायचे. मंद आचेवर दोनतीन मिनिटे शिजू द्यावे.
थोडा चाट मसाला भुरभुरावा . टेस्टी अॅपेटायझर तयार
य.न्दा केप्र चक्ली भाजणी
य.न्दा केप्र चक्ली भाजणी मिळालिय, त्याच्या चकल्या पाकिटावरिल सुचनेप्रमाणे केल्यास चा.न्गल्या होतिल का?
त्या.न्नी पिठ झाकण ठेवुन वाफवायला सा.न्गितल्य, कुणाला केप्रचा अनुभव असेल तर लिहा प्लिज!
य.न्दा केप्र चक्ली भाजणी
य.न्दा केप्र चक्ली भाजणी मिळालिय, त्याच्या चकल्या पाकिटावरिल सुचनेप्रमाणे केल्यास चा.न्गल्या होतिल का?
>> माझी न्यूजर्सीतली कझिन सांगत होती तिथे केप्र चकली भाजणी मिलते असं. त्यांची रेसिपी फॉलो करून उत्तम चकल्या होतात असं पण म्हणाली मला शिवाय तुला पण पाठवू का अशी ऑफरही दिली...मी नको म्हणाले पण आता विचार बदलावासा वाटतोय
आम्ही (मी आणि नवरा) गेल्या
आम्ही (मी आणि नवरा) गेल्या वर्षीपर्यंत केप्रची चकली भाजाणी वापरुन चकल्या करायचो. एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेल न पिणार्या चकल्या होतात. १ कप पिठाला अर्धा कप उकळते पाणी अणि १टीस्पून तेल असे मिश्रण पिठात घालून पीठ पाच मिनीटे झाकून ठेवायचे. नंतर मळून चकल्या करायच्या. पीठ मळताना लगल्यास थोडे गरम पाणी घ्यायचे.
सुहानाच्या भाजणीचा प्रयोग कसा होतोय कुणास ठाऊक.
यावर्षी केप्र भाजाणी मिळाली नाही.
मलाही केप्रची चकली भाजणी
मलाही केप्रची चकली भाजणी मिळाली आहे पण माझा चकल्या करायचा प्लॅन नाही. दिवाळी ऑर्डर गेली आहे आधीच.
स्वाती२, तुम्हांला पाठवू का?
थॅक्स सायो. नको पाठवूस.
थॅक्स सायो. नको पाठवूस. सुहानाची नवर्याने हावरटासारखी १ किलो भाजाणी घेतलेय. चकल्या तोच करणार आहे.
ओके.
ओके.
चकल्या तोच करणार आहे.>> मी
चकल्या तोच करणार आहे.>>
मी आणि माझा नवरा दोघे तुझ्या नवर्याला हव तर राखी बांधतो. नवरा पाठवून दे 
lol सिमंतिनी! माझा नवरा
lol सिमंतिनी! माझा नवरा कायस्थी पद्धतीचे कानोले खायला मिळतील या बोलीवर चकल्या करणार आहे.
कानोले म्हणजे मुरडीची करंजी
कानोले म्हणजे मुरडीची करंजी ना? कायस्थ पद्धत काय असते?
सिमंतिनी,
सिमंतिनी, http://www.maayboli.com/node/30042
झकास!
झकास!
माझ्यामते सुहाना हा केप्रचाच
माझ्यामते सुहाना हा केप्रचाच ब्रँड आहे. एकदा पाकीट नीट पहा...
Pages