सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 4 January, 2014 - 01:04

सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

सध्या एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी यावर दिवस सुरु आहेत. कंटाळा आला म्हणून अर्धा किलो बेसन पीठ आणलं आणि भाज्या त्याच अस्य्नही रोज नव्या नव्या वाटू लागल्या.

मग जाणवलं की बेसन पीठ हे स्वयपाकघरातील बहुगुणी पीठ आहे.

भजी, वडा असे स्वतंत्र पदार्थ बेसनची खासियत आहेच.

पालेभाज्या इतर भाज्या करता येतात.

पिठलं ते झुणका , गट्टे की सब्जी असे विविध प्रकार करता येतात.

लाडू, म्हैसूर पाक, वड्या ... अशा गोड पदार्थातही बेसनच.

नुसता कांदा जास्त तेलात परतून थोडे पीठ लावले तर मस्त पदार्थ तयार होतो. व्हेज आम्लेट करता येते.

हा धागा बेसन पिठाचे पदार्थ आवडणार्‍यांसाठी आहे.

नव्या जुन्या पाककृती थोडक्यात द्याव्यात. जुने धागे असतील तर लिंका द्याव्यात.

बेसन पीठ कुठून आणावे, कसे साठवावे .. अमेरिकेत कुठे मिळते, पिठात प्रोटीन किती, वात किती, पित्त किती .... कश्यकश्यालाही या धाग्यावर बंदी नाही.

besan_0.JPG

फोटो गुगल इमेजवरुन घेतले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी

पालेभाजी विकणारा फळभाजी ठेवत नाही काय?? एवढी काक करुन कुठे जायचेय??? Happy

नै हो. सध्या जॉब्नमधून वेळ मिळत नाही. त्यामुळे बाहेरच खाणे होते. पण पालाभाजी बाहेरच्या जेवणात नसते, त्यामुळे तेवढेच रोज करुन रोजच्या राइस प्लेटा बाहेरच्याच मागवून खाणे सुरु आहे.

--

माझा रुममेट जेव्हा ऑमलेट करुन मला टूकटूक करुन दाखवतो तेव्हा मी लगेच मस्त टॉमेटो, कोथिंबीर घालून बेसनाचे धिर्डे बनवून त्याला उत्तर देतो.

पोह्यासारखाच लगेच जमणारा, होणारा सोपा आणि चवदार पदार्थ - बेसनाचे धिरडे

अहाहा लक्ष्मी गोडबोले, फोटोत बेसनाचे पिठले दिसत्येय. हिरव्याकंच मिरच्या घालून तयार केलेले तिखटजाळ पिठले, बरोबर ना?
आ.न.,
-गा.पै.

काहीजण मेथी, कोथिंबीर, पालक यांचे ठेपले नुसते बेसन घालून करतात. मी बेसन आणि थोडी इतर पीठे मिक्स करते.

इब्लिस पण हिवाळ्यात ते चालणार नाही, कारण ते तेल शोषुन घेते, कोरडे पडते. त्या ऐवजी मसूर डाळ पीठ वापरतात.

पाटवड्या पण होतात की. मी गोडखाऊ असल्याने तोन्डाला पाणी सुटलेय बेसनामुळे. लाडु, वड्या, मोहनथाळ, म्हैसुर्पाक ( चेन्नईचा मऊ).

बेसन लावून आंघोळ>>> हा तर आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही कसा काय सुचवलात इब्लिस?

मन्जूडी.:फिदी: इब्लिस ना अडकवले का?:फिदी:

ढोकळा, फाफडा, ठेपला,वडा, मेथीगोटा, दालवडा, शेव, भजी, पाथरा (अळुवडी), पाटोळ्यांच बट्ट, गट्टाकरी, चिल्ला (मुग्डाळीचे तसेच बेसन पीठाचे)

>>>फोटोत बेसनाचे पिठले दिसत्येय. हिरव्याकंच मिरच्या घालून तयार केलेले तिखटजाळ पिठले
फोटोत दखवले आहे ते सिंधी बेसन करी सारखं दिसतंय!!!आणि त्या बहूतेक आख्ख्या भेंड्या आहेत!!!!

हा तर आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही कसा काय सुचवलात इब्लिस?
<<
आयुर्वेदात औषध आहे.
होमिओपथीत औषध नाही.
आयुर्वेदाच्या नावाखाली कुणी मूर्ख बनवीत असेल तर त्याला विरोध आहे.
आयुर्वेद वा इतर अनुभवसिद्ध औषधांतूनच मॉडर्न मेडिसिन उत्क्रांत झालेले आहे.
विषय वेगळा आहे.
नंतर बोलू.

शक्तीपीठ Biggrin

पिठल्याचेच किती तरी प्रकार करता येतात. सगळ्यात आवडतं पिठलंच. मग वडे, भजी, पीठ पेरून वेगवेगळ्या भाज्या, धिरडी इ.

बुंदीचे/मोतीचुराचे लाडू
बेसनाचे लाडू
फरसाण

बेसनाची नसली तरी चण्याच्या डाळीची बंगाली पाकृ - छोलार दाल

Pages