आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहिरः- वर्षभरात १५ किलो कमी करणे अतिशय धोकादायक आहे तेंव्हा जरा जपुन. आणि अनियमित वेळेस व्यायाम केला तरी चालेल की Happy शुभेच्छा....

वर्षभरात १५ किलो कमी करणे अतिशय धोकादायक आहे तेंव्हा जरा जपुन. >>> कसं काय??
समजा एखादा साडेपाच फुटी माणुस ९० किलो आहे.
त्यातही बॉडी फॅट जास्त.
त्याने रेग्युलर व्यायाम केला आणि डायेट कन्ट्रोल नीट केलं तर त्याचं ह्यापेक्षाही जास्त कमी होउ शकेल की वजन.
अंदाजे महिन्याला २ किलो म्हणलं तरी २४ किलो कमी होउ शकेल. (अर्थात हे एवढं एकरेषीय समीकरण नसतं म्हणा. ) सुरवातीला फास्ट कमी होइल वजन. नंतर कमी होण्याचा वेग कमी होइल.

झकासराव, एकदम वजन कमी करायच म्हटलं की बरेचसे बदल एकदम केल्या जातात. सुरुवातीला शरीराला सवय नसते, त्यामुळे उदा. उपासमार किंवा अगदी चक्कर येणे वगैरेपण वाटू शकते. म्हणुन म्हटलं हळूहळू बदल करत जाणे योग्य ठरेल. जसं पहिल्या महिन्यात भाताचे प्रमाण अर्धे केले आणि ते महिनाभर टिकवले, पुढे दुसर्‍या महिन्यात अजुन एक बदल, असं. {"झेन टू डन" या पुस्तकात हे खुपच चांगल्या पद्धतीने लिहिले आहे}.

तसं वर्षभरात १५ किलो वाढले तर कमी झाले तर आनंदच आहे, पण असं टारगेट न ठरवता, वजन कमी करायचं आणि व्यायामाचा आनंद घ्यायचा असं केलं तर ?

१ महिण्यात ४ ते ५ किमी थोडे जलद गप्पा न मारता चालले तर वजन नक्की ३ किलोचे आसपास घटते माझा अनुभव आहे.

@ गौरी, तिर्यक भुजंगासन म्हणजे भुजंगासन केल्यावर ( वैद्यबुवांनी टाकलेल्या प्रचिमधिल ६ नंबरची स्थिती) कंबरेपासुन वरील शरीर डावीकडे आणि उजवीकडे वळवणे. आपल्या टांचाकडे नजर जाईल ईतके वळवणे अपेक्षित आहे.

विजय , झकासरा, धन्यवाद ..इथे मॉरल सपोर्ट दिल्याबद्दल..

मी स्वत: आहार कमी न करता ..पण योग्य आहार घेतो आहे सध्या ..
कारण एवढं मोठ वजन असेल तर इंजिन पॉवरफुल लागणारच ..

पाणी , लिक्वीड फूड , फळे खाणे चालु आहे ..
सकाळ ६:३० उठल्याबरोबर कोमट पाणी + कोरफडीचा रस..( यामुळे प्रेशर येण्यासाठी जो उठल्या उठल्या चहा घ्यायला लागयचा तो बंद झालाय )

नंतर चालणे आणि २५ सु न..पाउस खुप असेल तर घरीच उड्या किंवा इतर कार्डियो व्यायाम..

नंतर फ्रेश झाला की..(८:३०-९ वाजता) मोड आलेली उसळ लिंबू पिळून / २ फुलके- भाजी / वरण भात / इडली / आंबील ,ज्युस, इतर

असा पोटभर नाष्टा करतो ..बरचसे पदार्थ स्वतः तयार करतो ..जसे कि कोशिंबीर, उसळ , इडली ..
कारण रोजच्या घाईमधे माझे चोचले कोण पुरवणार Happy
सोबत अर्धा कप चहा..

१० ला ऑफीस मध्ये आल्यावर चहा ..
मग १ वाजता ३ फुलके आणि भाजी ..हलकासा वॉक..

४ ला चहा + २ मारी बिस्कमारी

६:३०-७ ला पुन्हा भुक लागते तेव्हा एखादा केळ , किंवा मुरमुरे असा काहीतरी खातो ( इथे बर्याच वेळा लोच्या होतो ...सहकार्‍यां बरोबर बाहेर पडला की वपा, पॅटीस , भेळ असा खाणा होता ..

९ ला १ भाकरी-भाजी आणि वरण भात तूप असा आहार घेतो ..
पूर्वी झोपतना दूध्प्यायचो आता नाही ..

बाकी दिवसात ४ लिटर पाणी पितो ..

आणि १५-२० दिवसातून एकदा चिकन असते , किंवा अंडी असतात..

हॉटेल , पापड , लोणचे , ठेचा , चटण्या सध्या जमेल तितके बंद आहेत..
वरील आहारात काही त्रूटी असेल तर सांगा

सल्ला-सुचनांचे स्वागत आहे Happy

शाहीर फळं दुपारी बाराच्या आदेहेच खा असा सल्ला मला जीम मध्ये दिला होता.
त्याच्यात असलेली नॅचरल शुगर पचवायला आवश्यक जास्त जीआय (ग्लायकोजन) तेव्हा पुरेसं असतं.
त्यानंतर त्याची पातळी कमी होते.

प्रोटीन कन्टेन्ट वाढले पाहिजेत. पाणी ५ लिटर चालेल.

वॉकिन्ग ला चांगले शूज कुठले घेऊ? दोन जुने पेअर्स होते दोघांचे सोल निघाले. आता नवीन घ्यावे लागतील.

अमा, तुम्ही जर मातीवर चालत असाल तर साधे शूज चालतील. पण जर सिमेंट-कॉन्क्रीट्चा ट्रॅक असेल तर मात्र ज्यांचा सोल रबरी आहे आणि shock absorber सारखा काम करत असेल असेच शूज घ्या. कारण आपण वेगात चालतांना गुडघ्यावर वरतुन आपल्या वजनाचा आणि खालुन सिमेंट-कॉन्क्रीट वर चालतांना मिळालेल्या शॉकचा आघात होऊन गुडघेदुखी होऊ शकते. तेव्हा puma, adidas असे शूज घ्या.

काल २ किमी चालले. ते सूर्यनमस्काराचे काही जमतच नाहीये. आम्हाला लहानपणी शिकवलेला वेगळाच होता. त्यामुळे आता गोंधळ होतोय Sad

माझे सिक्स पॅक अ‍ॅब्स माझ्यासाठी इतके महत्वाचे आहेत कि ते चरबीच्या थराखाली लपवून ठेवले आहेत.

मी शिकल्याप्रमाणे योगासन करताना शरीरच inhale-exhale हे नॅचरली करतं बरोबर. ते नॅचरल इनस्टींट आहे.
फक्त काहींना चुकीच्या सवयी लागतात कारण शरीर बॅलेन्स नसतं म्हणून.
नाहीतर आसनं करताना आपण पोझिशन वर फोकस करून योग्य रीतीनेकेलं की श्वास-उच्छवास बरोबरच होतो.

त्याचे टेन्शन घेवून पोझ चुकीची करु नये...

आज घरी पाव- भाजी चा बेत !!
हे असा अहे बघा ...जरा कुठे सुरुवात केली की विघ्ने येतात ..

आणि पोट आणि तोंड मारून जगणं आवडत नाही ..
( उद्या २ किमी जास्त चालणार ..पण पावभाजी खाणारच)

४ ला चहा + २ मारी बिस्कमारी >>> मी ४ चहा आणि २ मारी वाचल Wink

कोरफडिचा उपाय चांगला वाटला. करुन बघतो.
झोपताना दुध पिल्याने झोप चांगली लागते.
काल ४.५ किमी ४% चढावर(म्हणजे नेमकं कीती?) ४१ मिनिटे चालणे+धावणे झाले. ४०० कॅलर्‍या (किलो?) उडवल्या.... आणि लोअर बॉडी.

६ सुर्यनमस्कारापर्यंत पोचलो... पुढे धप्प...

बाकी इतर लोकं दात ओठ खाउन वजनं का उचलतात कुणास ठाउक. स्वतःला पेलेल त्यापेक्षा थोडसं (१०% किंवा एक स्टेप जास्त) जास्त वजन उत्तम नव्हे का?

<<<<वॉकिन्ग ला चांगले शूज कुठले घेऊ? दोन जुने पेअर्स होते दोघांचे सोल निघाले. आता नवीन घ्यावे लागतील.>>>> शक्यतो ब्रँडेडच घ्या, चांगले असतात.

स्वीमिंग पुलातलं पाणी काढलं साफ करण्यासाठी. आता आठवडाभर पोहोयाला सुट्टी. म्हणून काल चालायला जायचं ठरवलं पण संध्याकाळी खूप पाऊस झाला. मग अंगणात निसरडं झालेलं म्हणून गच्चीत चकरा मारल्या.(एक्सक्यूजेस?:डोमा:)
अमा...मी अदिदासचे जॉगिंग शूज बरीच वर्षं वापरतेय. मस्त आहेत.

स्वीमिंग पुलातलं पाणी काढलं साफ करण्यासाठी पाणी साफ करायला की स्विमिंग पूल... Lol Light 1 घ्या...

मी पण अ‍ॅडिडासच वापरतो, एकदम मस्त आहेत...

अदिदास घेते. धन्यवाद.
जुने वापरायचा प्रयत्न केला पण त्यांचे सोल्स निघोन आले चाल्ता चाल्ता. आम्ही आज पण चाललो. काही ऑप्शनच नाहिये ना. Happy

काल तासभर योगा, पण त्यात फक्त योगिक क्रिया घेतल्या..
आज तासभर एरोबिक्स. आता पायाचे मसल्स बोंबाबोंब करणार... Sad उद्या जिने उतरायला नको.

सायकलिंग करणे हा व्यायाम कसा आहे.. जोडिला अजुन ही काही करणे अपेक्षित आहे का?
व्यायामा साठी काही इक्विपमेंट्स घ्यायचा विचार करताना .. मला सायकलच छान वाटते... म्हणजे बाहेर चाल्वायला नाहि घरी व्यायामाचि सायकल ... अशा व्यायामच्या सयकलचि किंमत साधारण ८०००-१०००० असते ... सगळ्यंचे काय मत आहे? घ्यावि का विकत अशि सायकल??
घरात थोडि जागा अडुन जाइल .. पण बाकी ओके वाटते..

अशा व्यायामच्या सयकलचि किंमत साधारण ८०००-१०००० असते ... सगळ्यंचे काय मत आहे? घ्यावि का विकत अशि सायकल??
>> त्या पेक्षा रेग्युलर सायकल काय वाईट आहे? मोकळ्या हवेत व्यायाम छान होतोच शिवाय थोडीफार बाजारहट करुन पेट्रोलचे पैसे पण वाचतील

लाज वाटावी तशी तर पण .. माझ्या कडे फोर व्हिलर च लायसंस आहे पण सायकल चालवता येत नाहि..
भितीच वाटते .. लहानपणापासुन .. म्हणुन विचारले.. तस तर सगळ्याच गाड्यांची भिति वाटते ...

वर्षभरात १५ किलो कमी करणे अतिशय धोकादायक आहे तेंव्हा जरा जपुन. >>> तिकडे दालचिनीच्या धाग्यावर एकांनी सहा महिन्यात १८ किलो वजन कमी केल्याचे लिहिले आहे. बर्‍याच लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा, उत्साह, सल्ला, आहाराबद्दलच्या टिपा वगैरे बरंच काय काय घेतलं आहे.

पुर्वी कधीच व्यायाम केला नसेल आणि वजन बर्यापैकी वाढलं असेल आणि डायट आणि व्यायाम दोन्ही जर सुरु केले तर वजन खुप झपाट्यानी कमी होतं. शरीराला ह्या गोष्टींची सवय नसल्यामुळे वजन पटापट कमी होतं. डायट किंवा व्यायामामध्ये काही अतिशयोक्ती केली नसेल तर मग कितीही कमी झालं तरी प्रश्न नाही. खुपच कमी खाऊन, उपासमार करुन , एखादा आकडा (म्हणजे १५ कमी करायचेत, २० कमी करायचेत) गाठायचा म्हणून केलं तर ते धोकादायक ठरू शकतं.
खरं तर उपासमार केली की एका लिमिट नंतर शरीर वजन आजिबात कमी होऊ देत नाही (दुष्काळ मोडात जाऊन जितकं खाललय ते जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवायला बघतं. मेटॅबोलिसम अगदी स्लो होतं अशा वेळी).

( जरा चकाट्या पिटून घेतो Wink काय करणार माझं नाव मधुरा, चतुरा असू शकत नाही Proud )
@ मंजुडी

महिन्याला १ ते १.५ किलो या रेटने वजन उतरवलं तर काही होत नाही. शुगर फ्लक्चुएशन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही वजन कुठल्याही उपायाने उतरवा, डॉक्टरशी संवाद असूद्यात. महिन्याला चेक अप करून गप्पा मारून यायचे पैसे अगदीच अंगावर पडत नाही. मी ज्या जीमला जायचो तिथे एका बाईने इन्स्ट्रक्टरशी हुज्जत घालून महिन्यात ९ किलो कमी केलं. डाएट आ़णि वेट लॉस हे इतकं हेक्टीक झालं कि एक दिवस घरी जाताना स्कूटरवरून चक्कर येऊन पडली. गंभीर जखमी झाली...

माझं शेड्युल एकेकाळी खूप टाइट होतं. संध्याकाळी सहा ते सात बॅडमिंटन, रात्री नऊ वाजता जीम आणि सकाळी फिरायला जाणे. याशिवाय रविवारी सिंहगड चढणे होतंच. पण डॉक्टरांनी सांगितलेलं पटलं. व्यायाम असा असावा कि जो दीर्घकाळ करता येईल. हिंसक व्यायामाने शरीराच्या स्नायूंची, पेशींची झीज लवकर होते. तरुणपणी ही झीज लवकर भरून निघते. पण वयानुसार हाडं कुरकुर करू लागतात. अतिहिंसक व्यायाम पेलवत नाहीत. त्यातून अंतर्गत दुखापती होऊ शकतात. त्यामुळं बॅडमिंटन लगेचच बंद केलं. हळूहळू जीम बंद केलं. आता योगा आणि फिरणे चालू आहे. हा व्यायाम शरीर थकलं तरी झेपेल असं वाटतं.

खरं तर या अशा गोष्टी कधीच ओपन फोरम मधे डिस्कस करू नयेत. हा तज्ञांचा आणि वैद्यकीय ज्ञान असलेल्यांचा विषय आहे. आपल्याला कितीही ज्ञान आहे असा आत्मविश्वास असेल तरीही टाळावेच.

( वैयक्तिक अनुभव लिहीलेत... पण लोक्स तपासून घेतील हा विश्वास आहे).

बॅडमिंटन हिंसक>>>>>>>> Lol एक वेळ वेट लिफ्टिंग ला हिंसक म्हंटला असता तर मी मला मारलेला टोला असं समजून गप्प राहिलो असतो पण बॅडमिंटन? बॅडमिंटन ला हिंसक म्हणणे म्हणजे खारीला किंवा सशाला हिंसक म्हणण्यासारखे आहे. असो. तुम्हाला हिंसक वाटत असेल तर लांबच रहा बॅडमिंटन पासून. नावातच बॅड आहे म्हणजे खरं तर धोका आहे हे आधीच कळायला पाहिजे होतं.

Pages