आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hot म्हणजे नेमकं काय? म्हणजे व्यायाम केल्यावर गर्मी होते का?
{थंडित बरं पडेल म्हणुन विचारतोय बरं}

विजय Hot म्हणजे १०० डिग्री फॅ च्या वर रुम मधे तापमान ठेवतात आणि त्या रुम मधे एका पाठोपाठ एक असे सलग योगासने करतात. खुप घाम येतो असा व्यायाम /योगा करताना.
छान धागा. मी सुद्धा केला. पण आज फक्त ३० मिन सायकलिंग, आणि थोडे स्ट्रेचिंग.

काय मग, आज व्यायाम केला का ? >>>> हे असं दररोज विचारणारे कोणी तरी हवे आहे, (खरं तर कान पकडून विचारणारे Happy ) त्याशिवाय व्यायाम होतंच नाही - कंटाळा, आळस -सर्वच्या सर्व सबबी पुढे येतात.

तुम्ही दररोज व्यायाम करता हे वाचून खूपच आनंद झाला - असाच चालू ठेवा - अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.

@प्रिया७:

अग १०० फॅ च्या वर (१०० ते १०७ फॅ) म्हणजे बिक्रम योगाच टेंपरेचर झाल. Hot Yoga ९५ फॅ ला ठेवतात. बाकिच तू छान लिहल आहेस.

काल केला.
आजही संध्याकाळी करणार.

जीम मध्ये.

आज कार्डिओ + अ‍ॅब्ज.

पण आज अ‍ॅब्जला मोस्टली सुट्टी.
पोटदुखी सुरु आहे.

कार्डिओ मध्ये.
क्रॉस ट्रेनर / एलिप्टिकल १५ मिनिटे. लोड वाढवुन.

ट्रेडमिलवर चालणे ६ किमी प्रतितास च्या वेगात फक्त १५ मिनिटे.

सायकल १२-१५ मिनिटे.

झकासराव :- अ‍ॅब्जचा व्यायाम रोज केला तर चालतो का? की उप्पर बॉडी आणी लोवर बॉडीसारख आलटुन पालटुन ?

हो इथे कोरियातपण बरेच बोर्डस बघितले हॉट योगाचे. पण फि बघुन फिरकलो पण नाही :). तसं इथे हॉट रुम्स (साउना / सोना?) म्हणजे झिम्जिलबांग खुप प्रसिद्ध आहेत. ६०, ७०, ९५ डिग्री से. (बहुदा)च्या खोल्या असतात, पण तिथे फक्त बसायच आणि घाम गाळायचा. बाहेर उणे तापमान असताना एकदम मस्त वाटतं. या खोलित शिरल्यावर एकदम भारतात मे-जुन मधे पोचल्याचा आनंद (!) मिळतो.

<हे असं दररोज विचारणारे कोणी तरी हवे आहे, (खरं तर कान पकडून विचारणारे स्मित ) > +१.

<हे असं दररोज विचारणारे कोणी तरी हवे आहे, (खरं तर कान पकडून विचारणारे स्मित ) > +१.

आज मी केल सायकलिंग -१५ मिनीट, क्रॉस ट्रेनर / एलिप्टिकल १५ मिनिट,अप्पर बॉडी २० मिनीट मग अ‍ॅब्ज + स्ट्रेचिंग

विजयजी, माझ्या जिम ट्रेनर नी सांगीतलेल स्केड्युल फॉर वीक - कार्डीओ , अप्पर बॉडी , लोअर बॉडी , सर्किट ट्रेनिंग
वॉर्म अप रोज + सायकलिंग/ ट्रेड्मील

अ‍ॅब्जचा व्यायाम रोज केला तर चालतो का?>> मी काही तज्ञ नाहिये हो.
पण ट्रेनरने लिहुन दिलेले श्येड्युल फॉलो करतो.
त्यात अल्टरनेट डे ला अ‍ॅब्ज आहे. त्यातही फक्त प्लॅन्क आणि लोवर अ‍ॅब्ज आणि सिट अप्स आहेत.

६०, ७०, ९५ डिग्री से. (बहुदा)च्या खोल्या असतात, पण तिथे फक्त बसायच आणि घाम गाळायचा. >>>>> अहो विजयराव हे फॅरनहिट असेल - ९५ डिग्री सें म्हणजे जवळ जवळ पाणी उकळते ते तापमान .... तिथे कसे बसता येईल ??

खरं तर मलाही वाटतं की ते फॅरेनाईटच असावं पण त्या खोल्यांवर मात्र 60 C, 70 C, 95 C असच लिहिल होतं. आणी ते तापमान आपल्याकडच्या उन्हाळ्यापेक्षा थोडं जास्त असावं असं वाटते. असो. गर्मीने घाम निघतो हे महत्वाच.

तसही ९५ से. ला बसणे मला तरि शक्य वाटत नाही. त्वचाच जळुन जायची. पेंटरभाउचि चुक असावि कदाचीत Happy

आज एक महिना झाला चालणे आणि सुर्यनमस्कार करणे सोडून......तुमचा धागा पाहून परत सुरूवात करेन.....पण अजुन ४/५ दिवसांनी आजारी असल्यामूळे.......

<हे असं दररोज विचारणारे कोणी तरी हवे आहे, (खरं तर कान पकडून विचारणारे स्मित ) >>>>+१०००००

रोजचे ४ किमी चालणे सकाळी पुण्याबाहेर असलो की जमतं!
पण आजकाल इथे दिवसात इथे सक्काळीच ५ वाजता गरम होते २ चकरातच घामाघूम! Sad

चांगला पाऊस झाला तर उतरेल तापमान...

वा वा.. छान धागा Happy
माझी कारणे Proud

घड्याळात वाजले सहा
डोळ्यात झोप पहा
डुलक्या काढण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले सात
पायात आलाय वात
पाय हलवण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले आठ
भरायचा राहिलाय माठ
पाणी भरण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले नउ
चला काहीतरी खाउ
नाष्टा करण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले दहा
साबांनी मागितला चहा
चहा पिण्यात ( Proud ) एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले अकरा
घरात झालाय कचरा
केर काढण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...

घड्याळात वाजले बारा
सिरीयलींचा झालाय मारा
सिरीयल पहाण्यात एक तास गेला
मी नाही व्यायाम केला...
.
.
.

धागा चांगलाय.
पण माझी सटकलीये. जिकडे तिकडे तेच तेच. हापिसात जेवताना, चहा पिताना, उठता बसता व्यायाम, वजन, डायेट अस्ल्याच गप्पा अन वर हा बीब. बोरींङे.

Pages