आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला मलाही काहीतरी लिहायला मिळाले शेवटी.

आज योगाटिचरच्या देखरेखीखाली पाऊण तास योगा. त्यात १२ सुन, उभे राहुन पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे इ.इ. वळून करायचे सगळे स्ट्रेचेस, ३ मिनिटे अनुलोम विलोम, ओम्कार, प्राणधारणा इ.इ. बरीच लफडी.

ऑफिसच्या जिमची फी डिसेंबरात भरली आणि त्यानंतर अधुन्मधुन रेगुलरली इर्रेगुलर करत शेवटी आज जाऊन १५ मिनिटे कार्डीओ केला.

उद्या अरोबिक्स आहे तासभर. जमवायचेच असे ठरवलेय.

सूर्यनमस्कार घालताना मी वर दाखवल्यापैकी २ नंबर ला १ समजुन सुरु करतो. ६ नंतर डाव्या आणि उजव्या बाजुला तिर्यक भुजंगासन करतो. मग वरील १० नंतर (जी माझ्यासाठी ११ आहे) हातांनी सर्वांगाल स्पर्श करत हात नमस्कार मधे आणतो.
तिर्यक भुजंगासन केल्याने शरीराला पिळ मिळतो आणि पचनसंस्थेला मदत होते.माझे गुरु श्री. अमृत पाटिल यांनी ही additions शिकवली.

हरीहर यांनी म्हटल्यानुसार प्रत्येक नमस्काराआधी सूर्यदेवतेचे नामस्मरण करुन नमस्कार घालावे, काहीवेळा यात बीजाक्षराचा देखिल वापर होतो. जसे ॐ ह्रीम मित्राय नमः ...

भ्रमरा, अरे त्यात बरेच काही आहे आणि रोज वेगवेगळे वॅरिएशन घेतात सर, म्हणजे कधी फक्त स्टँडिंग, कधी पाठीवर झोपुन, तर कधी थोडी स्टँडिंग, थोडी सिटींग असे व्हॅरियेशन्स घेतात सर...म्हणुन मी तसे म्हटले, मला वाच्यार्थाने तसे म्हणायचे नव्हते Happy

काल नाही केला
आज केला

येथे कोणीतरी 'ऑफिस मध्ये जिने उतरण्याचा व्यायाम करते. ऑफिस आठव्या मजल्यावर आहे' असे लिहीले आहे. माझ्या माहीती प्रमाणे फक्त जिने चढण्याने व्यायाम होतो उतरण्यामुळे व्यायाम न होता त्याने घुडग्यावर ताण येतो जे जास्त अपाय्कारक असते

लोक्स खालिल प्रतीसाद वेळ असेल तरच वाचा,
मी व्यायाम सूरु केला की सुरु करतानाचे प्र. ची. अन त्यानंतर प्रत्येक महिन्याचे प्र.ची. टाकणार आहे Lol तेव्हा लोक्स प्रोत्साहनास तयार रहा Lol .... या धाग्या मुळे सुरु करावाच म्हणतो ,
पण माझ्या मनात व्यायाम सुरु करण्या आधीच नकार घंटेची १० कारण सुरु होतात त्यातिल काही खालील प्रमाणे
१. बायको म्हणते जीम चालु झाली कि हे नको ते नको सुरु होते
२. किती वाळलायत असे म्हणते, तीला मी गोल झालेल छान वाटतं,
३. डाएट मनाप्रमाणं म्हणजे सकस इ. मिळाला नाही कि चिड चिड होते
४. झोप ८ तास तरी मिळावी अस वाटतं
५. आई तर अगदी क** करते म्हणते गरज काय तुला व्यायामाची तासलायस पार मागुन पुढुन Lol
( वजन अन उंची याचे गुणोत्तर पहाता मी एकदम फिट बसतोय त्यात ५'७" = ६८ पण सासुबाइ म्हणतात फार बारिक झालिय तब्येत , लग्नात ६१ वजन आसुन Sad )
Lol
माझ्या व्यायामाला लयी साइड इफेक्ट हाइत म्हणा हवतर ........
र च्या क ने निखळ हसने हाही एक व्यायाम आहे अन कधी कधी या मा बो मुळे तो होतो त्या बद्दल मी शतशः
आभारी आहे इथल्या साहित्यिकांचा
( हा .... दमलो टायपुन....)

>> हा .... दमलो टायपुन
पोस्ट टायपायच्या आधीचे आणि टायपून झाल्यानंतरचे प्रचि टाकायचेत ना!

स्वाती Rofl बारीक झालेली बोटं Rofl दादाश्री Light 1 घ्या Happy
दमले एकाच वाक्यात इतक्या स्मायली टायपून. आधीचे आणि नंतरचे प्रचि नाही टाकणार ज्जा!

लिहायला वेळ मिळेना.
तर, आता पुन्हा व्यायाम सुरू केला. रोज ४५ ते ५० मिनिटे चालणे. हे बर्‍यापैकी चढाच्या ट्रॅकवर. सध्या पावसामुळे रस्ते निसरडे आहेत, नाहीतर १५ मिनिटे सायकलिंग. साधारण ३ किमी.
घरी येऊन सू न. हे मी गॅपनंतर सुरू करायचे तर ४ नमस्कारापासून सुरू करते.
१. नमस्कार स्थिती.
२. हात खांद्यातून सरळ वर, श्वास घेऊन.
३. वाकणे. हात पायाला टकवणे, गुडघ्यात अर्थातच न वाकता. श्वास सोडून.
४. डावा पाय मागे, मान वर इत्यादी.
५. मग उजवा पाय मागे. बाकी वरच्याप्रमाणे.

बाकीच्या स्टेप्स वर अनेकांनी म्हटल्यायत तशा. परत पूर्वस्थितीत येताना डावाच पाय अगोदर पुढे घेणे. अशा पद्धतीने पहिला नमस्कार. मग याच स्टेप्स, फक्त उजवा पाय अगोदर माग/ पुढे घेणे. माझ्या काकूंनी मला खरंतर दोन्ही पाय एकेकदा मागे-पुढे झाले की तो एक सू न, असे १२ घाल असं म्हटलं. ते बहुधा पुढया जन्मीचं प्रोजेक्ट! Wink पण त्या असेच घालतात. ते झालं की प्राणायाम
भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, अनुलोम-विलोम, भामरी, कुंभकातला उज्जयी, आणि उन्हाळा/ हिवाळा बघून लागेल तसे शीतली-शीतकारी आणि अग्निसार.

यात चालणं कधीच चुकत नाही, बाकी मात्र थोडं माझ्या सोयीन वगैरे असतं. खूपदा खंड पडतो, पण आता त्यातही सातत्य आणायचंय.

काल मी चक्क १.५ किमी ९ च्या वेगाने धावलो. मलाच आश्चर्य वाटतय... बहुदा इथे सगळे जी चर्चा करत आहे त्यामुळे उत्साह वाढलेला दिसतोय. सोबत अप्पर बॉडीचे व्यायाम.

व्यायाम वजन/चरबी कमी करण्यासाठीच करायचा असा नियम नाही.>>> +१०००.... कित्येक वर्षे वजन वाढवण्यासाठी काहीनाकाही (म्हणजे व्यायाम सोडुन) करुन बघितले, पण फारसा उपयोग झाला नाही. दादाश्री मी ५'१०" आणि सध्या ५९ किलो आहे. तरी जीम लावला. सा.बा. ना सांगता येईल. माझ्याकडे बघुन लोकं जीम सोडतील की काय अशीही भिती जीममालकांना असावी Happy म्हणुन हा सरकारी जीम लावला.....

आणि टायपिंग चालु द्या, तितकाच बोटांना व्यायाम. Happy

उद्यापासून माझी पण हजेरी

उंची : ५-८"
वजन : ९० कि. Sad

मागच्या एका वर्षात वाढलेले साधारणतः १४ कि.

आता खाडकन जाग आलिये ..

बाहेरचे खाणे पूर्ण बंद..
चहा २ वेळाच..
बेकरी प्रॉडक्ट बंद..
रोज ३ किमि चालणे
नंतर २५ सु.न.

१ वर्षात १५ कि घटवायचे आहे ..

जिम लावायची आहे पण ......कामाच्या अनियमित वेळा म्हणून जमत नाही..

बादवे ..आय टी क्षेत्राचा पोट वाढणे हा फार मोठा तोटा आहे

१ वर्षात १५ कि घटवायचे आहे ..

कमी कालावधीत जास्त वजन घटवण्याचा प्रयत्न धोकादायक ठरु शकतो.

आज सकाळपासुन सर्दी नी डोकेदुखी.. नो व्यायाम. Sad

जिम लावायची आहे पण ......कामाच्या अनियमित वेळा म्हणून जमत नाही..
>>>>>>> शाहिर, जे जमेल ते करायचं. सुरवात करणे महत्वाचे. बाकी बदल तुम्ही केलेच आहेत फक्त ते कायम पाळत राहिलात तर वजन आटोक्यात येइलच. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

नुसती साखर (वरुन टाकायची) बंद करुनच अगदी सहजतेने ३-४ किलो वजन कमी होते.

नुसती साखर (वरुन टाकायची) बंद करुनच अगदी सहजतेने ३-४ किलो वजन कमी होते.
>>> +१००००

त्यासोबत थोडं कार्डिओ केलं तर फार लव्कर परिणाम दिसतो आणि उत्साह वाढतो Happy

नुसती साखर (वरुन टाकायची) बंद करुनच अगदी सहजतेने ३-४ किलो वजन कमी होते.
>>> वरुन टाकलेल मीठ देखिल खुप अपाय्कारक असत अस नुकतच ऐकलय

थियरी तोंडपाठ आहे हो .. काय चांगला काय वाईट ..
दिवेकर , बंग आणि पुस्तकी ज्ञान भरपूए वाचले आहे ..
त्याच्या १०% जरी पथ्य पाळता आले तरी खुप झाले ..

अवांतर :कुत्रा पाळा . मांजर पाळा ..हवा तर वाघ पण पाळा ..
पण पथ्य ही काय पाळायची गोष्ट आहे का ?

फॅट पर्सेन्तेज काढण्यासाठी एक मशीन असतं.
कराडा स्कॅन म्हणुन. अप्रॉक्जिमेट व्हॅल्युज असतात.
अधिक अचुक प्रमाण काढायचं असेल तर डॉ कडे जावं.

Pages