आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< कल्पु | 27 June, 2013 - 10:51 नवीन
@विजय देशमुखः सूर्यनमस्कार किती घातलेत ते सांगा >>>>

ते अजुनही जमत नाही हो. ३ बास झाले. पण आता वाढवेन हळूहळू. Happy

@दिप्स :- सहिच. मला पण थोडासा ब्रेक घेउन जमवावं लागेल. तसं एका तासाने ५ मिनिट चालतो, पण लक्षात राहत नाही बरेचदा. Sad

एकावेळी लागोपाठ २०० ते ३०० सूर्यनमस्कार घालत होतो, >> किती वेळात? एका नमस्काराला किती वेळ?>>>>>
जरी ३० सेकंद धरले तर २.५ तास !!!!!
बापरे
बा द वे
आज सकाळी ५० मि चाललो -५ किमी

बंडोपंत, पूर्ण सूर्यनमस्कार, की फक्त जोर?>> फक्त जोर ( अर्थात दोन हात पाय जमिनीवरुन नाक थोडेसे घासत नेऊन) पुन्हा पुन्हा उभे राहुन क्रमवार कॄती नाही

हमनाम.....: Rofl

मी दररोज एक तास वॉक करते... ट्रेडमिल वर ५.३ ते ५.६ स्पीड ने..

शॉपिंग करता करता ६,७ तास अखंड ( न दमता, पाय ही दुखत नाही.) चालू शकते Proud

एकावेळी लागोपाठ २०० ते ३०० सूर्यनमस्कार घालत होतो, >> किती वेळात? एका नमस्काराला किती वेळ?>> वेळ वगैरे मोजायचा प्रयत्न केला नाही. पण न थांबता जोर पध्दतीने करायचो !

मला बंडोपतांच्या 'जोर' वरुन "मी एस एम" हा धडा आठवला. त्यावेळी त्यांच्याशी कुणीतरी पैज लावली होती १०० जोर काढायची. ९५ जमले त्यांना.

बाकी थांबवू नका. पुनश्च हरीओम करा. (हा 'ओम' कसा लिहायचा?)

मी आज घरात पाणी भरले.....................४०० लिटर ची टाकी भरली ....पुर्ण....

नाही रे.................................

.
....
.
.
फक्त पाईप लावलेला Biggrin
.
.
.
पण टाकी भरे पर्यंत मी पाईप धरुन होतो .......:)

म्हणजे पाईपला व्यायाम झाला म्हणायचा Happy

धन्यवाद चिनुक्स ॐ बद्दल.

आज पुन्हा ३० मिनिट ३ किमी ट्रेड्मिल. आणि अप्पर बॉडी. १२-१०-८ असे रेप्स जमले. वजन १०-१५-२० किलो वापरले.
उद्या व्हॉलीबॉल खेळणार...

सकाळी लोवर बॉडी साठी सकाळी १० मि. ट्रेड मिल (१.५ की.मी.) नंतर अप्पर बॉडी (ट्राय्सेप्ट आणि अ‍ॅब्स ५० मि.)
नंतर तोंडाचा व्यायाम म्हणुन जेवण. सध्याकाळी डोळ्याच्या व्यायामासाठी एफसी रोड ला चक्कर. आत्ता कंपनीत मेंदुचा व्यायाम चालु आहे

@बंडोपंतः अय्या फक्त ४-५ सेकंद एका नमस्काराला??? मला अस वाटल की तुम्ही सूर्यबिंबाकडे बघून फक्त हात जोडता आणि त्याला सूर्यनमस्कार म्हणता की काय! Light 1

मला अस वाटल की तुम्ही सूर्यबिंबाकडे बघून फक्त हात जोडता आणि त्याला सूर्यनमस्कार म्हणता की काय!

Lol

>> एका सूर्यनमस्काराला तीस सेकंद्स लागत नसावेत. १२ ते १५ पुरत असावेत.
नाही, म्हणजे कुठलीच योगासनं इतकी जलद करायची नसतात. सूर्यनमस्कारातल्या सगळ्या बारा स्थितींत काही सेकंद राहणं आवश्यक आहे. आणि अर्थातच सर्वच योगासनांत आवश्यक असतो तसा श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवणं. मिनिटाला एक नमस्कार व्हावा साधारणपणे.

मला अस वाटल की तुम्ही सूर्यबिंबाकडे बघून फक्त हात जोडता आणि त्याला सूर्यनमस्कार म्हणता की काय! >>>> Rofl

मी पण करतेय व्यायाम रोज. फक्त रोज येऊन लिहायचा कंटाळा येतो. Happy

बंडोपंत बहुतेक जोर मारतात/काढतात, सुत्यनमस्कार नाही. एका जोर होतो पुर्ण ३-४ सेकंदात. तो पण जबरदस्त व्यायाम आहे. पुर्वीच्या (किंवा आता सुद्धा) पहिलवान लोकांचा स्टेपल व्यायाम होता. हिंदीत डंड (की दंड?) म्हणतात.

नाही, म्हणजे कुठलीच योगासनं इतकी जलद करायची नसतात. सूर्यनमस्कारातल्या सगळ्या बारा स्थितींत काही सेकंद राहणं आवश्यक आहे. आणि अर्थातच सर्वच योगासनांत आवश्यक असतो तसा श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवणं. मिनिटाला एक नमस्कार व्हावा साधारणपणे.<<<

बाप रे! मिनिटाला एक नमस्कार! असे केल्यावर खरे कळेल सूर्यनमस्कार काय व्यायाम आहे तो. हे माहीत नव्हते. एक सलग प्रोसेस असे मी सूर्यनमस्कार घालायचो पूर्वी. प्रत्येक स्थितीत थांबणे अपेक्षित असल्यास ते किती स्ट्रेसफुल असेल हे जाणवले. धन्यवाद बाई!

बंडोपंत बहुतेक जोर मारतात/काढतात, सुत्यनमस्कार नाही. एका जोर होतो पुर्ण ३-४ सेकंदात. तो पण जबरदस्त व्यायाम आहे.<<< + १

जोर हा व्यायाम अतिशय परिणामकारक आणि अतिशय उपयुक्तही आहे. मी गेल्या काही दिवसात 'एका स्ट्रेचमध्ये' पंचवीस या पातळीला पोचलेलो होतो. लहानपणी वजन कमी असताना तीस रिपिटेशन्स करू शकायचो, पण तेवढाच एक सेट! पण अगदी पंधरा जोर म्हंटले तरी काहीवेळा खूप होतात.

आजचा व्यायाम करायला निघावे चला Happy

Pages