आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी विचारलं ,
काय हो स्वतच्या क्वालीटी वर भरोसा नाहिये तुमचा ! सहा महिने जिम केलेला माणूस पुढे कंटीन्यू करेल याची खात्री नाहिये वाटत..

ती म्हणाली , "मला काय माहीत ...हे रेट कार्ड आहे ते सांगते तुम्हाला ! ...पटलं तर घ्या Happy

जिम मधले हायजिन खुप महत्वाचा आहे ! बर्‍याच लोकल जिम मधे ते मेंटेन केलेला नसता ..
सध्या शोध मोहिम घेतली आहे ! "जिम शोधताना" असा बाफ काढावा का ?

सध्या रोज १०००० स्टेप्स चालायचं असं ठरवलं आहे. कंबरेला पेडोमीतर अडकवलेला असतो पण ते पेडॉमीटर किती अक्युरेट असतात?

बरं मला एक सांगा, सगळीकडे म्हणतात की रोज ३० मि. तरी व्यायाम करावा. आता ३० मि हे फक्त फिट राहण्यासाठीच असतात का?जर का वेट लॉस करायचा असेल तर किती वेळ व्यायाम करावा?

लगेहाथ मी पण विचारुन घेते......
माझी मुलगी वर्षाची आहे ...... पाठदुखी साठी पंचकर्मा सुरु करण्याचा विचार आहे.....
करु का?
त्यात पुर्ण अंगाची आयुर्वेदिक तेलाने मालिश... स्टीम ... कसलितरी बस्ती ई. ८ दिवसांसाठी आहे....
सगळ्यांचे काय मत ???

स्नेहा१ :- किती वेळ नव्हे तर कसा जास्त महत्वाचं.

आरोग्यम धनसंपदा मध्ये "वजन कसे कमि केले ते बघा. तिथे बरिच माहिती मिळेल.

जून एन्डला पोहोणं बंद केलं. काही ना काही कारणाने बंद झालं. मग लगेच योगासनांसाठी क्लास लावला. रोज सकाळी ७ ते ८. संध्याकाळी जमेल तेव्हा ब्रिस्क वॉक! मस्तच!

देवा... १७ जुलैनंतर मी काहीच् केलेले नाहीय........ कसे होणार माझे... ह्या धाग्यामुळॅ निदान कळले तरी कधीपासुन ठम्म बसलेय ते.....

अच्छा. पण शाहिर उगाच ८००० च्या मागे लागु नका. होईल हो कमी. काळजीने वजन वाढते म्हणे Happy

काल पुन्हा एकदा ट्रेडमिलवर चढलो. ३०मि. ३ किमी.

इथे हा प्रश्न योग्य नसेल तर काढून टाकीन.
मी १५ दिवसांपूर्वी एक योगाचा क्लास लावला. जागा बेसमेन्टात आहे. साधारणपणे २०' बाय १५' असा हॉल असावा. आणि एकाच बाजूला खिडक्या आहेत. (कारण बेसमेन्टात आहे) त्याही बंदच असतात. कारण या खिडक्या रस्त्याच्या लेव्हलला उघडतात.
आता सध्या इथे खूप पाऊस चालू आहे. खूप जणींना सर्दी खोकला झालाय. तर आम्ही इथे सर्व जणी सर्व प्रकारचे प्राणायाम करतो, खूप जोरात सर्वांचेच उ:श्वास त्या एवढ्या जागेत कोंडले जाऊन एकमेकींना एकमेकींचे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे का? याचा अर्थ कुणी खूप आजारी अवस्थेत येतात असं नाही पण मुळात एवढ्या जागेत आम्ही कमीत कमी २० जणी तरी असतो तर ही सिच्युएशन योग्य आहे का?....कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

@येळेकर ..
ट्रेड मिल वर स्लोप ठेउ नका ..
सॉफ्ट तळवे असलेले स्पोर्ट शूज घालून चाला ..

कोणत्याही हार्ड सरफेस वर चालले की गुडघे दुखतात ..डांबरी रस्त्यावरून जोरात चालले असता दुखतात

मानुषी, तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तरी ते जागा योग्या वाटत नाही. अर्थात हे फक्त तुमची पोस्ट वाचून मनात आलेले उत्तर. तुम्हाला स्वतःला शंका वाटत असेल तर आतला आवज ऐकणे श्रेयस्कर !

विजय देशमुख +१ खेळती हवा व्यायामासाठी उत्तम

स्नेहा १ वजन कमी करायला कमित कमी १ तास तरी करायला लागेल्...पण ते करताना, काय खातो हे पण पहाण खुप महत्वाच्...स्वानुभव्...७५ वरुन ६३ वर आलेय्...पहिल्वान झाला होता माझा..:(

@ शशांक, गेल्या काही दिवसात प्रवास, आजारपण, लेकीचं आजारपण, पाहुणे ही सगळी व्यायामातली विघ्नं येऊन गेलीत. आता आजपासून पुन्हा नव्याने सुरुवात!

Pages