आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन, हिम्स्कूल, स्वाती, सुर्य नमस्काराची एकदम छान माहीती सांगीतली.
मला शवासन उत्तम जमते. कोणाला माहीती हवी असल्यास जरुर विचारा

वैद्यबुवा यांनी दिलेल्या इमेजनुसारच मी बर्‍यापैकी करते.

फक्त स्टेप ४ मधे उजवा पाय आधी मागे घ्यावा. काही फरक पडतो उजवा किंवा डावा घेतल्याने माहित नाही.
सहाव्या स्टेप मधे हनुवटी टेकवावी की कपाळ? मी कपाळ टेकवते. साष्टांग नमस्कार अशा अर्थी ती स्टेप आहे ना?

सू. न. चर्चा देजावू वाटते आहे. आधी पण एका व्यायामाच्या धाग्यावर सगळी चर्चा झाली असं वाटतय. शोधायला हवी आणि सू. न. चा सेपरेट धागा काढायला हवा (कोणीतरी)

फार छान धागा .माझा मात्र फिरण्यावर/चालण्यावर भर असतो. इतर गोष्टीना वेळ नाही हि सबब आहेच . कितीही ठरवलं हि सबब सांगायची नाही. वेळ काढायचाच / काढायलाच पाहिजे तरी जमतच नाही Happy आणि ऑफिस मध्ये जिने उतरण्याचा व्यायाम करते. ऑफिस आठव्या मजल्यावर आहे :)पूर्वी सूर्यनमस्कार घालत होते. मस्त वजन कमी केले होते . पोट सपाट Happy

हिम्सकूल | 28 June, 2013 - 20:06
(चूकभुल देणे घेणे.. श्वासोच्छवास जसा आठवतो आहे तसा लिहिला आहे.. कोणाला योग्य प्रकारे माहिती असेल तर सांगा.. दुरुस्त करतो.. ) >>>>>>>>>>>>>

हिम्सकूल स. न.
श्र्वास घेणे म्हणजे ‘पूरक’, श्र्वास सोडणे म्हणजे ‘रेचक’, श्र्वास पूर्ण सोडल्यानंतर श्र्वास न घेता राहणे किंवा श्र्वास पूर्ण आत घेतल्यानंतर श्र्वास न सोडता राहणे म्हणजे ‘कुंभक’
तुम्ही सूर्यनमस्कारातील श्र्वासाच्या अवस्था बरोबर सांगितलेल्या आहेत केवळ एका ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे ती म्हणजे वैद्यबुवांच्या चित्रामधील ६ नंबरच्या अवस्थेत कुंभक करावयाचा असतो. म्हणजेच तुमच्या वाक्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करावी लागेल.
६. ५व्या स्थितीतूनच बाकी काहीही न हलवता फक्त हात वाकवून खाली जाणे (श्र्वास रोखून धरणे - कुंभक) आणि तसेच पुढच्या बाजूने वर येत भुजंगासन करणे (वरील उदयनच्या चित्रातील डावीकडची आकृती) (श्वास आत घेणे)

(सूर्यनमस्काराचा पुढील टप्पा म्हणजे तृचाकल्प-नमस्कार. यावर अगोदर कुणी धागा काढला नसेल तर तो काढण्याचा विचार आहे.)
सूर्याची नावे व त्यांचा क्रम -
ॐ मित्राय नमः ।।१।। ॐ रवये नमः ।।२।। ॐ सूर्याय नमः ।।३।। ॐ भानवे नमः ।।४।। ॐ खगाय नमः ।।५।। ॐ पूष्णे नमः ।।६।। ॐ हिरण्यगर्भाय नमः ।।७।। ॐ मरीचये नमः ।।८।। ॐ आदित्याय नमः ।।९।। ॐ सवित्रे नमः ।।१०।। ॐ अर्काय नमः ।।११।। ॐ भास्कराय नमः ।।१२।। * (ॐ श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः।।१३।।)
* तृचाकल्पनमस्काराचा समारोप ‘‘अनेन तृचाकल्पोक्‍तनमस्काराख्येन कर्मणा श्रीसवितृसूर्यनारायणः प्रीयताम्‌।।’’ असा असल्यामुळे (म्हणजेच मुख्य देवता श्रीसवितृसूर्यनारायण असल्यामुळे) काही जण ॐ श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः।। हा जादाचा नमस्कार करतात.
नाममंत्रांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी ॐ मित्र-रवि-सूर्य-भानु-खग-पुष-हिरण्यगर्भ-मरीच्यादित्य-सवित्रर्क-भास्करेभ्यो नमः ।।’ हा मंत्र पाठ केल्यास उपरोक्‍त नावे व त्यांचा क्रम लक्षात राहतो.

फार छान धागा.

१२ सुर्यनमस्कार >> आधी उजवा व नंतर डावा पायाने सुरुवात करून केलेला नमस्काराला १ मोजायचा की २ मोजायचे?

आज नक्की करणार.

सूर्यनमस्कार केल्यावर फार छान वाटते हा माझा अनुभव आहे. एकदम एनर्जेटीक. रात्री जागरण झाले असेल किंवा झोप कमी झाली असेल तरीही जर सकाळी सूर्यनमस्कार घातले तर दिवसभर उत्साही वाटते.<<< अगदी खर आहे.
आज १५ सू.न. घातले. २ महिन्यांपूर्वी पर्यंत सलग ५० घालू शकत होते. परत हळू हळू सुरु करणार.

एबीसी योगा डॉट कॉम अशी काहीशी लिंक आहे त्यावर अ‍ॅनिमेटेड सून छान दाखवले आहेत.
वैद्यबुवांचेही पर्फेक्ट आहेत.

सूर्यनमस्कारास प्रारंभ करण्यापूर्वी ‘ध्येयः सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायणः सरसिजासन सन्निविष्टः । केयूरवान्‌ मकरकुण्डलवान्‌ किरीटी हारीः हिरण्मयवपुर्धुत-शङ्ख चक्रः ।।’ असे सूर्यध्यान म्हणावे आणि सूर्यनमस्कार झाल्यानंतर ‘आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुर्वन्ति दिने दिने । आयुः प्रज्ञा बलं वीर्य तेजस्‌ तेषां च जायते ।।’ अशी प्रार्थना म्हणावी.
अधिक माहितीसाठी -
क्रीडाभारती (महाराष्ट्र प्रांत) सूर्यनमस्कार विभाग, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम, शुक्रवार पेठ, पूणे, फोन २०-२४४४१३६७
यांच्याशी किंवा श्री. शरद गोगटे , ५१९, नारायण पेठ, पूणे (मो.) ९३७१०१२०७० यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडे सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्‍त विवरण असलेली तबकडी मिळते. तसेच (मुलांच्या खोलीत लावण्यासाठी) सूर्यनमस्काराची कृती दाखवणारा आकर्षक असा एक तक्ताही मिळतो.

सूर्य नमस्कार फारच nostalgic करतात.. डायरेक्ट शाळेची आठवण येते. दर वर्षी सप च्या ग्राउंड वर रथसप्तमीला शाळेतले सगळे विद्यार्थी एकत्रितपणे नमस्कार घालायचो... अजून चालू आहे का हे काही माहिती नाही..

सुर्यनमस्कार चर्चा छानच.

योगासनं क्लासची आठवण आली. Happy

काल कार्डिओ. अ‍ॅब्जला सुट्टी. टमी इन्फेक्शनने बिघडली अस्ल्याने.
आज वेट ट्रेनिन्ग करणार.

व्वा, काय मस्त चर्चा रंगलीय... पालक कबाब खातांना वाचतोय त्यामुळे अजुनच लज्जत वाढली. Happy

वैद्यबुआ, ६ (आणि १०) नंबरची पोझ या जन्माततरी जमेल असं वाटत नाही Wink

काल २ तास व्हॉलिबॉल खेळलो, त्यामुळे परत आल्यावर कार्डीओ जमलच नाही करणं. आजही व्हॉलीबॉल Happy

सूर्य नमस्कार फारच nostalgic करतात.. डायरेक्ट शाळेची आठवण येते. दर वर्षी सप च्या ग्राउंड वर रथसप्तमीला शाळेतले सगळे विद्यार्थी एकत्रितपणे नमस्कार घालायचो... >>>>>

हे जे सूर्य नमस्कार शालेय वा सार्वत्रिक पातळीवर राबवले गेले यात कै. बापूराव दात्ये, पुणे यांचा फार मोलाचा वाटा होता. नमस्कार कंटाळवाणे न होता एका सुरेख लयीत घालता यावेत यासाठी "संगीतमय सूर्य नमस्कार" (काही सुरावटीवर घातले जाणारे नमस्कार) असाही प्रकार त्यांनी अनेक प्रयोग करीत शोधून काढला - त्याच्या कॅसेट्स काढून त्या उपलब्ध करुन दिल्या.
बापूरावांच्या वहिनी/भावजय - सौ. मालती दात्ये, पुणे. - या माझ्या चांगल्या परिचित असून गेली ३०-३५ वर्षे त्या नियमित नमस्कार घालत आहेत. सध्या दात्येकाकू ८० वर्षे वयाच्या असूनही सडसडीत बांध्याच्या, सदा हसतमुख, उत्साही अशा आहेत. आपल्या निरोगी तब्येतीचे सर्व श्रेय त्या नमस्कारालाच देतात. या वयातही जमतील तितके सूर्य नमस्कार त्या घालत असतात.

सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी रा. स्व. संघाच्या श्री. गोळवलकरगुरुजींनी या सूर्य नमस्काराचा प्रसार व्हावा म्हणून एक विशेष पत्रिका काढली होती. या पत्रिकेत शास्त्रोक्त नमस्काराच्या सर्व स्थिती फोटो व माहितीसकट दिलेली आहे. यात फोटोसाठी ज्या व्यक्तिची त्यांच्या बांधेसूद व लवचिक शरीररचनेमुळे निवड झाली होती ते श्री. कवठेकर (सहकारनगर २/ तुळशीबागवाले कॉलनी, पुणे ९) हे सध्या ७५ वर्षाचे असून ते ही सर्व श्रेय नियमित सूर्य नमस्कारालाच देतात. या वयातही श्री. कवठेकर सूर्य नमस्कार घालतच असतात.
श्री. किशोरजी व्यास हे देखील सूर्य नमस्काराचे चाहते असून या संघाच्या पत्रिकेतील ही कोण एवढी उत्तम पोझेस देणारी व्यक्ति आहे म्हणून चौकशी करत होते. नुकतेच जेव्हा श्री कवठेकरांची व त्यांची गाठभेट झाली तेव्हा जाहीररीत्या किशोरजींनी त्यांचा सत्कार करुन एक प्रकारे गौरवच केला.

आज हा लेख वाचून जरा जोशातच व्यायाम केला. नंतरचे संवाद साधारण असे झाले

हाल कैसा है जनाब का ?
क्या खयाल है आपका ?
तुम तो मचल गये ओह ओ हो
हे हे यूं ही फिसल गये आ हा हा हा

ये क्या हुआ कैसे हुआ
कब हुआ क्युं हुंआ

जब हुआ तब हुआ
छोडो ये ना सोचो

आ उ आ उ आ...
डिंग डाँग.. ओ बीबी नो मोअर साँग

इथली चर्चा वाचून आज सुर्यनमस्कार केले. सायकॉलिजिकल छान वाटलं की खरं खरं ते माहित नाही पण छान वाटलं खरं.
आता नियमीत करायचा विचार आहे.
देशमुख, मलाही नं ३ आणि नं ४ ची पोजिशन तितकीशी चांगली जमत नाही. अंगात लवचिकता थोडी आणखिन पाहिजे असं जाणवलं आज. आता असं झालय की सगळेच व्यायाम करावेसे वाटतात पण किती करायला जमेल माहित नाही. सुर्यनमस्कार मात्र जमवायला हवे.

मीही आज फार दिवसांनी शनिवारचा मारुतीरायाच्या दिवसाचा मुहूर्त साधून परत एकदा सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केलेली आहे.. पहिल्या दिवशी १२ ही सुरुवात अगदीच वाईट नाही.. कारण न थाम्बता सलग ४० पर्यंत पूर्वी घातलेले आहेत..

मस्त धागा. इथे रोज लिहिलं तर जरा नियमितपणा येईल व्यायामात.
सूर्यनमस्कार एकदा डावा पाय मागे घेऊन, एकदा उजवा पाय मागे घेऊन असे दोन्हीकडून झाले की एक मोजायचा असं सांगितलं होतं माझ्या शिक्षकांनी. आणि सावकाश, पूरक - कुंभक - रेचकाकडे लक्ष देऊन, प्रत्येक स्थितीमध्ये थांबत करायला हवेत असंही. असे मी रोज जेमतेम दहा घालू शकायचे नमस्कार. सद्ध्या तर तेवढेही नाही.
आज फक्त चालण्याचा व्यायाम केला.

बुवांनी दिलेल्या चित्रात एक चूक आहे आणि ती म्हणजे चित्र ४ आणि चित्र ९. चारात जर डावा पाय दुमडलाय तर ९ व्यात उजवा दुमडलेला दाखवायला हवा.
abc-of-yoga साईट चांगली आहे. मागे जेव्हा त्यातल्या त्यात नियमित सून करत होते तेव्हा त्या चित्रांचं प्रिंट आउट घेऊन ठेवलेलं फॉलो करायला.

अजून काही:
सूर्य नमस्कार घालून झाल्यावर खालील श्लोक म्हणावा--

आदितस्य नमस्कारान् मे कुर्वन्ति दिने दिने
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्
सूर्यपादोदकं तीर्थं जठरेधारयाम्यहम्

सूर्य नमस्कार सुरू करायच्या आधी धातुच्या भांड्यात पाणी घेऊन ते, त्यात सूर्याची कोवळी किरणे पडतील असे ठेवून सूर्य नमस्कार पूर्ण झाल्यावर वरील श्लोक म्हणून ते पाणी पिऊन टाकायचे.

आज रविवार म्हणून व्यायामाला सुट्टी.
पण व्यायामविषयक एका साईटवर स्वयंपाक आणि स्वयंपाकाची तयारी करण्याने एका तासात मध्यमगतीने चालण्याइतक्याच कॅलरी खर्च होतात म्हणून लिहिलंय. त्यामुळे सकाळपासून दोन तास ब्रेकफास्ट लंच तयार करून नक्कीच व्यायाम झाला असेल. त्यात आम्ही वाट्णं घाटणं रगड्यात्/ खलबत्त्यात करतो, प्रत्येकवेळी नवा मसाला तयार करतो त्यामुळे कॅलरी नक्कीच जळत असतील. Wink
हल्ली महिनाभर दररोज सकाळी चार आणि संध्याकाळी तीन किमी चालत आहे.
अ‍ॅब्ज करत होते पण मागचा एक आठवडा नाही केले.

विजयजी, कोरियात तर अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत. मैदाने भरपूर, हायकिंगला डोंगर भरपूर, शिवाय मोकळ्या जागेत व्यायामाची साधनेही असतातच. त्यामुळे तुम्हांला तर काहीच एक्सक्युज नाही. Wink Light 1

Pages