Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16
खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.
मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.
असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.
काय मग, आज व्यायाम केला का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ येळेकर; रोज धागा वाचण्याचा
@ येळेकर; रोज धागा वाचण्याचा व्यायाम का?
तसा मीही हा व्यायाम रोज करते सद्ध्या. आणि त्यातून रोज न चुकता व्यायाम करायचं मोटीव्हेशन नक्की मिळतं!
गौरी खरय ग! तसेही पाऊस मदतीला
गौरी
खरय ग! तसेही पाऊस मदतीला धाऊन येतो. मग घरात बसून इतरांनी छान छान व्यायाम केल्याचं समाधान मिळते!
ह्या धाग्याला बघुन व्यायामाची
ह्या धाग्याला बघुन व्यायामाची आठवण येते! संध्याकाळी करणार
आज शक्यतो संध्याकाळी, पण
आज शक्यतो संध्याकाळी, पण नक्की नाही. धागा चांगला चाललाय... सर्वात आधी मीसुद्धा हा धागा बघतो. तेव्हडाच व्यायामाचा (दुसर्यांच्या) आनंद
कोई शक?
कोई शक?
नाही. बर्याच दांड्या...
नाही.
बर्याच दांड्या...
काल, आज दोन्ही दिवस
काल, आज दोन्ही दिवस स्ट्रेचिंग व ८ सू न.
कोई शक? >>>>> अश्विनीमामी
सर्दी खोकल्याने हजेरी लावली
सर्दी खोकल्याने हजेरी लावली आहे ..
त्या मुळे आज -उद्या सुट्टी ..
बादवे , आजारी असताना व्यायाम करावा का ? कोणता करावा ?
केला. आजारी असताना व्यायाम
केला.
आजारी असताना व्यायाम करावा का ? कोणता करावा ?
>> आजारी असताना सगळ्यात उत्तम व्यायाम म्हणजे झोपण्याचा. शरीराला विश्रांतीची व्यायामा एव्हढीच गरज असते
आज पुर्ण लोअर बॉडी एक्सर्साईज
आज पुर्ण लोअर बॉडी एक्सर्साईज केलाय.. असं वाट्तय चालताना पायाचे मसल्स लुड्बुड करतायत..
चालू आहे रेग्यूलर! इथले
चालू आहे रेग्यूलर!
इथले प्रतिसाद बघून सायकलिंगचा वेळ वाढवला. मस्त वाटले.
मधे एकदा वाचले होते मलायका अरोरा रोज ट्रेडमिल नाहीतर सायकलिंग ५० मि. करते, स्पीड वगैरे पण सांगितला होता. पण हा धागा वाचून जेवढी स्फुर्ती मिळाली तेवढी ते वाचून काही मिळाली नव्हती.
धन्यवाद
मला कोणी Persuit आणि circuit बद्दल जास्त माहिती देईल का?
मी रोज एक दिवसाआड पोहायला
मी रोज एक दिवसाआड पोहायला जायला सुरुवात केली आहे. अर्धा तास पोहतो. जास्त थकल्यासारखे नाही वाटत आणि अंग भरुन आल्यासारखे देखील नाही वाटत. म्हणजे बहुतेक प्रमाणात व्यायाम होत असावा.
पोहताना कोणते व्यायाम करता येतील म्हणजे पोहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती?
असं वाट्तय चालताना पायाचे
असं वाट्तय चालताना पायाचे मसल्स लुड्बुड करतायत..>>>:D
मी सध्या सकाळी १०
मी सध्या सकाळी १० सुर्यनमस्कार, दीर्घ श्वसन्,कपालभाति,अनुलोम विलोम, मग राम्देव बाबान्चे ७ सुक्श्म व्यायाम आणि १/२ योगासने करते, सगले १०-१५ मिन मधे होते. मग लन्च ब्रेक मधे १५ मिन चालणे आणि सन्ध्याकाळी जेवणानन्तर १५ मिन चालणे असे करत आहे. वीक डेज मधे सगळे नीट होते मात्र वीकेन्ड ला कधी खुप काम केले जाते किन्वा खूप आळस.:) पण हेच नियमित्पणे चालू ठेवणार आहे. हे बरोबर आहे का? बाकिचे प्राणायाम नीट जमत नाहीत.
केला. चालू आहे रेग्यूलर!
केला. चालू आहे रेग्यूलर!
कोई शक? स्वस्तातले म्हणून
कोई शक?
स्वस्तातले म्हणून पाहिले तर शूज ७०० - महागातले ३५०० च्या पुढे. म्हनून सध्या चाल्ताना चप्पलच.
मामी सध्या ऑनलाइन शॉपिन्ग वर
मामी सध्या ऑनलाइन शॉपिन्ग वर मान्सुन डिस्काउन्ट्स सुरु आहेत. (जॅबॉन्ग वै)
शोरुम मध्येही ५० टक्केपर्यंत आहेत.
बेसिक कम्फर्टेबल लाइटवेट शुज १०००-१२०० पर्यंत मिळतील.
हॅप्पी वॉकीन्ग..
कोई शक म्हटलं की शाहरुखची
कोई शक म्हटलं की शाहरुखची "फौजी" आठवते. त्याचा भाऊ नेहमी "कोई सवाल" असं विचारत असतो, आणि विचरायला कोणी पुढे आला की "होना ही नही चाहिये" असं काहिसं म्हणतो...
अमा - नो मॅडम...
अमा, मला गोखले रोडवरच्या 'अमर
अमा, मला गोखले रोडवरच्या 'अमर शूज' मध्ये वॉक साठी शूज ७०० रुपयांना मिळाले. एकदम कंफर्टेबल आहेत. वेल्क्रो लावलेल्या फ्लॅप्स आहेत. माझी चप्पल खरेदी वर्षानुवर्षे फक्त आणि फक्त 'अमर शूज' मधूनच असते. दुसरीकडे कुठे घेतल्या तर त्या दुकानातल्यापेक्षा निम्मे दिवसही नाही टिकल्या.
१२ सूर्यनमस्कार, मग
१२ सूर्यनमस्कार, मग प्राणायाम. पावसामुळे चालणे बंद
१२ सूर्यनमस्कार काल आणि
१२ सूर्यनमस्कार काल आणि परवा..पण संध्याकाळी केले...आजपण संध्याकाळी...
केला. बॅक + बाय्सेप्ट
केला.
बॅक + बाय्सेप्ट
कोई शक म्हणजे मिथूनचा डायलॉग
कोई शक म्हणजे मिथूनचा डायलॉग आहे.
अमा, साधी चप्पल बेस्ट असते. आजिबात महागाचे शूज घ्यायच्या भानगडित पडू नका. चप्पलचा फक्त एक प्रॉबलेम होतो. खुप चाललं तर घर्षणानी पायाचे साल (स्कीन) निघून फोड येऊ शकतो. तुम्ही जर खुप चालणार नसाल तर चप्पल बेस्ट आहे. खुप कडक नसलेली घ्या फक्त.
इथे अमेरिकेत आता सँडल्सचं खुप फॅड आलय. माझ्या पायाला बाक (?)/आर्च फार कमी आहे आणि चप्पल घालून किंवा पायाच्या ग्लोव्स सारखे मोजे घालून चालून्/पळून खुप फरक पडला आहे. रनिंग बाफं ला भेट द्या जमल्यास, तिथे मी सविस्तर लिहिलं आहे. मीच उघडला होता त्यामुळे माझ्या लेखनात सापडेल.
रोजचे ४ किमी चालणे ...आज एक
रोजचे ४ किमी चालणे ...आज एक महिना झाला.
अर्रे चार दिवसात कुणी व्यायाम
अर्रे चार दिवसात कुणी व्यायाम केलाच नाही का काय? मी केला बरं!
मी नाही केला ... आज पुन्हा
मी नाही केला :(... आज पुन्हा सुरुवात...
कुठलाही व्यायाम करा पण
कुठलाही व्यायाम करा पण व्यायाम करणे अतिशय महत्वाचे - एखाद्-दोन दिवस खंड पडला तरी हा धागा वाचून स्फूर्ती घ्या व परत सुरु करा - सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...
अरे धन्यवाद. शॉपराइट मध्ये
अरे धन्यवाद. शॉपराइट मध्ये ७०० रु चे मिळाले. कुत्र्यांच्या मागे धावायचे म्हणजे अक्षरशः कुठेही कसेही पळावे लागते. त्यात पावले ओली, चप्पल ओली म्हणजे घसरून पडायची भीती.
१२,१३,१४ ल व्यायामाला दांडी
१२,१३,१४ ल व्यायामाला दांडी मारली...सोमवारपासून पुन्हा चालू.....आज १८ सु.न.
सुरु आहे..
सुरु आहे..

Pages