आज

हुलकावणी

Submitted by rajeshnaik65 on 25 July, 2020 - 00:25

जर त्याला भेटलो
असतो तर
माझी तीव्र इच्छा
झाली असती सर

त्याच्या सोबत घालवले असते काही स्वतःचे असे क्षण
ठरवून भेटणारच
होतो नक्की ..पण

तो पण.. नेहमीसारखाच
आडवा येत गेला
अन् मनाचा कोपरा
रिकामाच राहीला

म्हटल होत काल
उद्या भेटू हमखास
परंतु उद्या ने कधी
सोडलीच नाही कास

फक्त करत राहिलो
परवा तेरवाच्या गोष्टी
आणि होत गेलो
तो न भेटण्याने दु़ःखी कष्टी

घट्ट मारायची होती
त्याला मिठी
तो भेटण्याच्या आनंदात
मारायची होती शिट्टी

शब्दखुणा: 

आजींची खोली

Submitted by भागवत on 2 January, 2018 - 21:45

ना भावनेचा हुंकार, ना श्वसनाचा अंहकार
ना शब्दाचे उच्चार, ना इच्छेचा आविष्कार

खोली सुनसान, अडगळीचे सामान
कोपर्‍यात छायाचित्र, मुक्तीचे साधन

श्वास अडकला होता, कोंडले होते क्षण
तुटले होते व्यासपीठ, सांडले सोन्याचे कण

जीर्ण झालेली गादी, शांत निजलेले मन
आजही शोधतात डोळे, मात्र स्मृती छान

खोलीची आठवण, का आठवणीची खोली
आसवाची लबाडी, की डोळ्यात आसवाची खोली

शब्दखुणा: 

आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

विषय: 
शब्दखुणा: 

आज !

Submitted by राफा on 5 August, 2010 - 02:25

'आज'चा दिवस रोज येतो.

पण 'आज' त्याच्यासारखा तोच !

कालच्या 'आज' पेक्षा वेगळा आणि उद्याच्या 'आज'पेक्षाही.

कारण आज ह्या दिवशी तो राजा आहे. उगवतानाच तो आपला स्वभाव दाखवून देतो. येतानाच तो स्वत:चा 'मूड' बनवून येतो. आपल्याला त्याच्या मूड प्रमाणेच वागायला लावतो.. निदान काही वेळ तरी.

कधी सुंदर अतिशय आवडत्या अश्या गाण्याने उठवतो (आपणच लावलेल्या मुझिक सिस्टीमच्या किंवा मोबाईलच्या 'गजरा' ने ) तर कधी काही कारणाने अलार्म झालाच नाही म्हणून धडपडत उठवतो..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आज