Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16
खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.
मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.
असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.
काय मग, आज व्यायाम केला का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन दिवस तब्येत बिघडल्याने
दोन दिवस तब्येत बिघडल्याने जीमला दान्डी...
काल गेलो. वेट ट्रेनिन्ग..
तब्य्ते नरमच असल्याने हलका व्यायाम.
आज कार्डिओ..
तुम्ही काही पण करा आमचा आपला
तुम्ही काही पण करा आमचा आपला एकच व्यायाम. आजही पाउस उघडलेला होता आल्हाददायक वारे. हलके ऊन. शाळेत निघालेली मुले. उत्तम वातावरण. पी थ्री लेव्हल अवॉइड केली. पी वन वरच चाललो.
नाही, म्हणजे कुठलीच योगासनं
नाही, म्हणजे कुठलीच योगासनं इतकी जलद करायची नसतात. सूर्यनमस्कारातल्या सगळ्या बारा स्थितींत काही सेकंद राहणं आवश्यक आहे. आणि अर्थातच सर्वच योगासनांत आवश्यक असतो तसा श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवणं. मिनिटाला एक नमस्कार व्हावा साधारणपणे. >>> +११११११
मिनिटाला एक सुर्यनमस्कार
मिनिटाला एक सुर्यनमस्कार म्हणजे एका पोजिशनला सुमारे ६०/१२=५ सेकंद. म्हणजे ५ सेकंदात एकदा श्वास/उच्छवास, बरोबर आहे का?
१ मार्च पासून साधारणपणे
१ मार्च पासून साधारणपणे आठवड्यातून ४ ते ५ पोहायला जाते. कालपर्यंत जमवलं. आता संध्याकाळी जरा थंड हवा असते. खरं म्हणजे पावसाळा(आमचा नगरी हं!) सुरू झाला की पोहोण्यातली हवा जाते. पण कालपर्यंत जमवलं. आणि अजूनही रोजच जाण्याचा विचार आहे. खूपच फ्रेश वाटतं. पहिली २० मिनिटं नॉनस्टॉप नंतर थोडं थांबत वेगवेगळे स्ट्रोक्स. साधारणपणे पाऊण तास पोहोणं होतं. ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी घरीच सकाळी योगासनं, वेट्स, प्राणायाम हे सगळं तरी किंवा संध्याकाळचा वॉक असं रोज काही ना काही जमवतेच.
थोडं बदलून बदलून व्यायामप्रकार केलेले मला पर्सनली आवडतात.
घरी अॅब्स क्रन्चेसचं मशीन आहे तेही बर्याच वेळा वापरते.
आजचे ५० मिनिटांचे ५ किमी
आजचे ५० मिनिटांचे ५ किमी वॉकिंग झाले.
आता उद्या सुट्टी घेता येणार नाही कारण पावसामु़ळे मंगळवार अन बुधवार बुडाला होता
हो हो जोर त्याने दंड आणि छाती
हो हो जोर त्याने दंड आणि छाती भारदार रहायची. !
आता मात्र कधी मधे सायकल चालवितो !
सूर्यनमस्कारातल्या सगळ्या
सूर्यनमस्कारातल्या सगळ्या बारा स्थितींत काही सेकंद राहणं आवश्यक आहे. आणि अर्थातच सर्वच योगासनांत आवश्यक असतो तसा श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवणं. मिनिटाला एक नमस्कार व्हावा साधारणपणे. >> माझे सुर्यनमस्कार अशेच असतात.. अगदी मिनिटाला एक नाही पण दोन होतात.. पाच दहा मिनीटासाठीच हा व्यायाम आवडीने करतो.. सगळी मरगळ निघून जाते..
सुर्य नमस्कारासाठी युट्युबची
सुर्य नमस्कारासाठी युट्युबची लिंक मिळेल का?
सकाळी केला. मिनिटाला एक
सकाळी केला.
मिनिटाला एक सुर्यनमस्कार म्हणजे एका पोजिशनला सुमारे ६०/१२=५ सेकंद. म्हणजे ५ सेकंदात एकदा श्वास/उच्छवास, बरोबर आहे का?
>> नाही. एका पोजिशनला जास्त वेळ थांबुन तुम्ही नियमीत श्वास/उच्छवास करु शकता. श्वास रोखुन ठेवणे गरजेचे नाही. तशा सगळ्याच पण दुसर्या आणि पाचव्या पोजिशनला जास्तीत जास्त थांबायचा प्रयत्न करा
सुर्य नमस्कारासाठी युट्युबची लिंक मिळेल का?
>> अबोली, सुर्य नमस्कार युट्युब पेक्षा सुर्या कडे बघुन करा
>> अबोली, सुर्य नमस्कार
>> अबोली, सुर्य नमस्कार युट्युब पेक्षा सुर्या कडे बघुन करा दिवा घ्या
अस्लं वाचायलाच मी इथं चक्कर मारते.
पण खरंच लिंक दे ना. मला त्या श्वासाचे प्रकार आठवत नाहीत.
मी पण करते रोज. १०
मी पण करते रोज.
१० सूर्यनमस्कार रोज. थोडावेळ प्राणायाम, इतर आसने मग सायकलिंग.
१ सूर्यनमस्कार साधरण ३५-४० सेकंदात होत असेल. मला नेहेमीच प्रश्न पडतो १ सूर्यनमस्कार किती वेळात व्हायला पाहिजे?
(काकस्पर्शमधे सचिन खेडेकर किती फास्ट घालतो सूर्यनमस्कार! हे आपलं उगाच आठवलं म्हणून लिहिले :))
सर्किट ट्रेनिंगबद्दल कुठे माहिती मिळेल?
तुम्ही सुर्य नमस्कार का
तुम्ही सुर्य नमस्कार का करतात...? जर तुम्हाला शरीर कमवायचे नसल्यास कसेही कितीही जलद आणि हळु करा
परंतु जर शरीर कमवायचे असल्यास... सुर्य नमस्कार करण्याची एक रीत आहे
दोन्ही हातांमधे एक हाताचे (कोपर्या पासुन ते बोटांपर्यंत) इतके अंतर ठेवा..
दोन्ही पाय जिथे तुमचे गुढघे पोहचत आहेत तिथे तुम्ही तुमचे पाय ठेवा..
आता तुम्ही तुमचा पार्श्वभाग उंच घेउन मागे घ्या...
आणि विमान जसे सुर मारुन खाली येते त्याच प्रमाणे जमिनी कडे चेहरा घेउन जा..
आता लगेच छाती समोर करा...आणि मान मागे घ्या..
या प्रमाणे जमिनीशी तुमच्या छातीचा ९०कोन होईल..
५ सेकंद याच स्थितीत रहा...
मग परत मागे या आणि सुर मारुन जमिनीपाशी जा..
----------
या प्रकाराने तुमचा स्टॅमिना हातांचा वाढतो आणि तुमची छाती लवकर भरली जाते...
परंतु हा प्रकार करायला सोप्पा नाही आहे....थकवा लव्कर येतो
उदयन, यात छाती/पोट जमिनीला
उदयन,
यात छाती/पोट जमिनीला टेकायचे काय? की अधांतरीच राहयचे?
जर तुम्हाला शरीर कमवायचे
जर तुम्हाला शरीर कमवायचे नसल्यास कसेही कितीही जलद आणि हळु करा
>> असे आहे का!
सॉरी हे लिहायचे राहिले नाही
सॉरी हे लिहायचे राहिले
नाही अधांतरीच रहायचे......१ सेकंद फक्त असतो आपण त्या स्थितीत...त्यामुळे त्याचा इतका त्रास होत नाही फक्त जेव्हा छाती पटकण पुढे घेतो ... त्याचा थोडा त्रास मात्र होतो..
पोजिशन ची स्थिती निट कळण्यासाठी असे करा
तुम्चा हात वरुन खालच्या दिशेने घेउन जा .आणि अचानक तळवा समोर करा......
याच प्रमाणे हाता प्रमाणे शरीर जमिनीच्या दिशेने घेउन जायचे आणि तळव्या सारखे छाती पुढे घ्यायची
माधवी.... शरीर कमवणे आणि
माधवी....
शरीर कमवणे आणि व्यायाम करणे ......या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत......
व्यायाम केल्यामुळे आपण फिट राहतो..स्टेमिना वाढतो...शरिराचा आकार जास्त वाढत नाही...पण काटक आणि इन-शेप असते
शरिर कमवण्यात..... आपले शरीर वाढते...आपला स्टॅमिना वाढतो.. स्नायु बलवान होतात. ते जास्त दिसु लागतात
उदयन, जरा रेखाचित्रे नाहीतर
उदयन,
जरा रेखाचित्रे नाहीतर विडीओ द्याल तर कळेल. समजायला थोडे कठीण आहे. उगाच हातात पाय आणि पायात हात अशी गाठ बसायची
या प्रमाणे जमिनीशी तुमच्या छातीचा ९०कोन होईल..
५ सेकंद याच स्थितीत रहा...
>> ही भुजंगासनाची पोझ आहे ना?
शरीर कमवणे आणि व्यायाम करणे
शरीर कमवणे आणि व्यायाम करणे ......या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत >> हो. म्हणूनच ना तुम्ही म्हणताय की व्यायाम करताना जलद सूर्यनमस्कार घातले तरी चालतील? (मी शंका म्हणून विचारतेय)
हो...... थोड्याफार प्रमाणात
हो...... थोड्याफार प्रमाणात भुजंगवस्थाच...
हम्म्म.. दुसरी जी अवस्था आहे
हम्म्म..
दुसरी जी अवस्था आहे त्यात पायाचे तळवे पूर्ण जमिनीला टेकवायचे म्हटल्यास पोटर्या थोड्या स्ट्रेच होतात.
जलद सूर्यनमस्कार घातले तरी
जलद सूर्यनमस्कार घातले तरी चालतील? >>>> जितके मी शिकलो आहे... अतीजलद करु नये... घाईघाईत कोणताही व्यायाम हा नुकसानकारक असतो...
व्यायाम करताना नेहमी "सेट" ठरवा ... आज मी १० सुर्यनमस्कार करणार आहे... सुरुवात करत असाल तर ५ सुरुवातीला करा...३ मिनिट थांबा.. शरीर सैल करा..परत ५ करा.. हा तुमचा झाला ५ चा सेट...
सुरुवातीला ५ चे २ सेट करा...मग रोज रोज त्यात तुम्हाला एस्ट्रीम त्रास होणार नाही या पध्दतीने त्यात वाढ करा... १० चे दोन करा मग १५ चे ३ करा... मग २० चे २ करा... असे करत करत तुमचा स्टॅमिना सुध्दा वाढेल आणि तुम्हाला त्रास देखील होणार नाही......
चालेल........एकदम पाय सगळेच
चालेल........एकदम पाय सगळेच टेकले नाही तरी चालतात... आपण धावताना जी पोजिशन घेतो..ती घेतली तरी चालेल...
फक्त एक लक्षात ठेवा.........कोणताही व्यायामाचा दोन तीन सेट झाल्यावर ... १ मिनिट तरी अंगठे पकडुन उभे रहा...जर नाही पकडु शकले तरी त्या अवस्थेत रहा.. अश्याने तुमचा मणका लवकर लवचिक होतो..
चांगली माहिती उदयन.
चांगली माहिती उदयन.
>> मिनिटाला एक सुर्यनमस्कार
>> मिनिटाला एक सुर्यनमस्कार म्हणजे एका पोजिशनला सुमारे ६०/१२=५ सेकंद. म्हणजे ५ सेकंदात एकदा श्वास/उच्छवास, बरोबर आहे का?
नाही, तसं नाहीये ते.
त्याचा ठोकताळा असा आहे : सूर्यनमस्कारात स्थिती बदलताना जर पोट स्ट्रेच होत असेल (उदा : उभे राहून हात वर करताना, किंवा भुजंगासनात जाताना) तर श्वास आत घ्यायचा आणि जर पोट आकुंचित होत असेल (खाली वाकताना, पाय जवळ ओढताना) तर उच्छ्वास सोडायचा. एकदा त्या स्थितीत स्टेबल झालं की श्वासोच्छ्वासाची १-२ आवर्तनं रेग्युलर लयीत करायची, मग स्थिती बदलायची.
सूर्यनमस्कार केल्यावर फार छान
सूर्यनमस्कार केल्यावर फार छान वाटते हा माझा अनुभव आहे. एकदम एनर्जेटीक. रात्री जागरण झाले असेल किंवा झोप कमी झाली असेल तरीही जर सकाळी सूर्यनमस्कार घातले तर दिवसभर उत्साही वाटते.
उदयन, चित्रांविषयी धन्स.
उदयन,
चित्रांविषयी धन्स. आत्ता नीट समजले.
उदयन ह्याला जोर म्हणतात हो..
उदयन ह्याला जोर म्हणतात हो..
सूर्यनमस्कारात १० किंवा १२ आकडे असतात... पद्धतीनुसार बदलतात.. पण किमान १० असतातच.
१. उभे राहून नमस्कार करणे. (नेहमीचे श्वसन)
२. हात जोडून डोक्याच्या वर करणे. (श्वास आत घेणे)
३. ओणवे होणे. तेव्हा हात तळपायांच्या शेजारी ठेवणे (श्वास सोडणे)
४. डावा पाय मागे घेणे आणि त्याच वेळेस डोके वर करणे (श्वास आत घेणे)
५. उजवा पाय पण मागे घेणे. उतरत्या फळी सारखी स्थिती करणे. (श्वास सोडणे)
६. ५व्या स्थितीतूनच बाकी काहीही न हलवता फक्त हात वाकवून खाली जाणे (इथे श्वास रोखून धरणे) आणि तसेच पुढच्या बाजूने वर येत भुजंगासन करणे (वरील उदयनच्या चित्रातील डावीकडची आकृती) (श्वास आत घेणे)
७. त्रिकोण करणे, टाचा पूर्ण जमीनीला टेकवायचा प्रयत्न करणे आणि हनुवटी छातीला टेकवणे (वर उदयननी दिलेल्या चित्रानुसार उजवीकडची स्थिती) (श्वास सोडणे)
८. डावा पाय पुढे घेऊन हातांच्या मधे जास्तीत जास्त पुढे ठेवणे. (श्वास आत घेणे)
९. उजवा पाय पुढे घेणे व डाव्या पाया शेजारी ठेवणे. आणि ओणवे होणे. (श्वास सोडणे)
१०. उभे राहून नमस्कार करणे.( नेहमीचे श्वसन)
आणि प्रत्येक सूर्यनमस्कार सुरु करायच्या आधी सूर्याचे एक नाव घेऊन सुरु करणे. (सगळी नावं काही केल्या आठवत नाहीयेत.. ॐ सूर्याय नमः, ॐ हिरण्यगर्भाय नम:, ॐ आदित्याय नमः, ॐ मित्राय नमः...)
(चूकभुल देणे घेणे.. श्वासोच्छवास जसा आठवतो आहे तसा लिहिला आहे.. कोणाला योग्य प्रकारे माहिती असेल तर सांगा.. दुरुस्त करतो.. )
त्याचा ठोकताळा असा आहे :
त्याचा ठोकताळा असा आहे : सूर्यनमस्कारात स्थिती बदलताना जर पोट स्ट्रेच होत असेल (उदा : उभे राहून हात वर करताना, किंवा भुजंगासनात जाताना) तर श्वास आत घ्यायचा आणि जर पोट आकुंचित होत असेल (खाली वाकताना, पाय जवळ ओढताना) तर उच्छ्वास सोडायचा. <<< स्वाती, अच्छा. हे बरं आहे लक्षात ठेवायला.
मित्र रवी सूर्य भानु खग पूष्ण
मित्र रवी सूर्य भानु खग पूष्ण हिरण्यगर्भ |
मरिचादित्य सवित्रार्क भास्कराय नमोनमः ||
हा श्लोक आहे बारा नावांचा.
प्रत्येक नमस्कार घालताना :
ॐ मित्राय नमः
ॐ रवये नमः
ॐ सूर्याय नमः
ॐ खगाय नम:
ॐ पूष्णे नमः
इ. नावं घ्यायची.
Pages