आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या रोज ३०-४० मिनिटे पळतोय आणि २०-३० मिनिटे चालतोय. सध्या राहतोय ते ठिकाण ते ऑफिस ८.५ किमी अंतर आहे ते पळत आणि चालत काटतो परत येताना. २१ ऑक्टोबरला अर्ध मॅराथॉन पळायची आहे त्यासाठी हे ट्रेनिंग सुरु केले आहे. हळुहळु पळण्याचे अंतर वाढेल आणि चालण्याचे कमी होइल.
जुलैपासून आठवड्यातून तीन वेळा पळणे (४५ मिनिटे २ दिवस आणि १.१५-१.३० तास १ दिवस). बाकीचे दिवस सायकलिंग.
मुद्दामून इथे लिहित आहे म्हणजे जर आळसावलो तर किमान लाज वाटेल की लोक काय म्हणतील मॅराथॉन नाही पळालो तर.

टण्या, मॅरेथॉनसाठी शुभेच्छा!

मुद्दामून इथे लिहित आहे म्हणजे जर आळसावलो तर किमान लाज वाटेल की लोक काय म्हणतील मॅराथॉन नाही पळालो तर. <<< हो, सगळे लिहायचे. आणि काय काय करायचे ठरवले आहेस, हेही (रोज) लिही. लाजेखातर ते सगळे आळस बाजूला ठेवून आपल्याकडून केले जाते. Proud

खरेच, रोज आजपासुन सुरू म्हणतेय पण सुरू कहई होत नाही. ३० मार्चला शेवटचे चालले ५ किमि, त्यानंतर रोज अंतर कमी कमी होत आता व्यायामच पडलाय पुरता. Sad आज संध्याकाळी नक्की जाईनच. उद्या इथे अपडेट देईनच. Happy

गेला एक आठवडा सलग सायकलिंग करतेय.
३ किमी पासून सुरू करून दररोज १२-१४ किमी पर्यंत.
मजा येतेय.
पण कार्ब्ज क्रेविंग खूप होतंय सायकल चालवल्यावर.
ते ही कमी व्हायला हवं.
सध्या लेकाला सुट्टी असल्याने दररोज काही तरी स्पेशय खायला प्यायला असतं त्यातलंही खाल्लं जातय.

ओह असेही असते का, मला माहित नव्हते. मला चिवडा बघितला की लगेच्खावासा वाटतो. याला क्रेविंग नाही येणार म्हणता Happy

खूप दिवसात कोणीच व्यायाम केला नाही की काय?

मी पळायला सुरुवात केल्या दिवसांचा हा बाफ साक्षी आहे त्यामुळे आवर्जून इथे लिहितोय की माझ्या नोंदींप्रमाणे मी धावायला सुरुवात केल्यापासून (५ सप्टेंबर २०१३) मागच्या आठवड्यापर्यंत (५ जून २०१४ रोजी ) १००० किमीचा टप्पा पुर्ण केला.

अर्थात याचे सर्व श्रेय मी ज्यांच्याबरोबर पळतो त्या माझ्या गृपला आहे.

मी ज्या दिवशी हा टप्पा पार केला त्यादिवशी मी श्री. जुगल राठी यांच्या बरोबर डेक्कन जिमखाना येथे ८ फेर्‍या धावलो. त्यात विशेष गोष्ट ही आहे की त्या दिवशी श्री. राठी यांनी स्वतःच्या ६७व्या वाढदिवसाच्या निमित्ताने डेक्कन जिमखान्याच्या मैदानाला ६७ फेर्‍या मारल्या. त्यांनी सकाळी ५ वाजता सुरु करून ८ वाजायच्या आतच हे अंतर पुर्ण केले...

Pages