आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

णमस्कार्स !!
तापामधून उठून पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे ..
२५ सु न केले ..स्ट्रेचिंग केले ..मग एरोबिक्स केले ..तसा वीकनेस आहे म्हणून वेट ट्रेनिंग टाळले ..
बादवे ," झुंबा डान्स फॉर फिटनेस " हा प्रकार कोणास ठाउक आहे का?

अमा, साधी चप्पल बेस्ट असते. आजिबात महागाचे शूज घ्यायच्या भानगडित पडू नका. <<< खरंच आहे, मलाही असाच अनुभव आला. मी तर चक्क स्लीपर्स घालून चालायचो. मग काही दिवसांनी स्पोर्ट्स शूज आणले चालण्यासाठी. पण चप्पल घालून खरे तर चांगले वाटते अधिक! असे का ते समजत नाही. Happy

सुन आणि योगा चालु आहे. अरोबिक्स करत होते पण गेल्या आठवड्यापासुन थोडे कमी केले. दोन्ही दिवशी कार्डिओ होतोय पण अ‍ॅरोबिक्समध्ये हल्ली खुप थकायला होतेय. त्याजागी जिममधले वेट ट्रैनिन्ग करायचा विचार करतेय आता.

व्यायाम केला.
सद्ध्या अय्यंगारांचं "Light on Pranayama" वाचते आहे. नुसतं प्राणायामासाठी कसं बसायचं यावर एक प्रकरण आहे त्यात! खूप बारकावे दिलेत. एकदा वाचून समजणं शक्य नाही. पारायणं करावी लागतील बहुतेक.

बादवे ," झुंबा डान्स फॉर फिटनेस " हा प्रकार कोणास ठाउक आहे का? >>>>> Latin आणि International music वर आधारित डान्स सारखा प्रकार .(workout)

या आठवड्यात माझा दर आठवड्यात ५ वेळा - रोज ४.५ किमी चा कोटा पूर्ण झाला. उद्या सुट्टी.
मजा येतेय. गेला आठवडा मात्र ४ चा होता.

मलाही नं ३ आणि नं ४ ची पोजिशन तितकीशी चांगली जमत नाही. अंगात लवचिकता थोडी आणखिन पाहिजे.नं ३ आणि नं ४ चि पोजिशन चांगली जमण्ञासाथि आधि हस्त् पादास्अन चा सराव केला तर सोपे जाइल.

थोडे पी टी एक्झरसाईज (वॉर्मिंग अप साठी) आणि १५ सूर्य नम.

वेगवेगळी आसने (वा सूर्य नम. तील काही स्थिती) ही तेव्हाच चांगली जमतात जेव्हा शरीर फार कडक/ताठर नसते. सकाळी उठल्या उठल्या शरीर चांगलेच ताठर असते - ते जरा लवचिक व्हावे म्हणून आंघोळ केल्यावर वॉर्मिंग अप करुन मगच ही आसने करावीत वा सूर्य नम. घालावेत किंवा संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर हे केले तरी चांगलाच फरक जाणवेल.
८-१० वर्षापासूनच जर मुलांना थोड्या आसन/ सूर्य नम्.ची सवय लावली तर मग पुढे हा शरीराचा लवचिकपणा टिकून रहातो - (व अर्थातच पुढेही थोडीफार आसने करीत राह्यल्यास हे जड जात नाही .. Happy )

गेला महिनाभर हा धागा बघत न चुकता व्यायाम सुद्धा होत गेला.
महिनाभर रोज काहीही झालं, तरी काही ठराविक आसनं तरी करायचीच असं ठरवलं होतं मनाशी. ती ठराविक आसनं इतकी सोपी आणि कमी वेळात होणारी होती, की रोज किमान एवढंच करायचं आहे याचं ओझं होऊ नये, फक्त रोज व्यायाम करायची सवय लागावी . हा झेन हॅबिट्स पासून घेतलेला धडा. त्याप्रमाणे करत गेले, आणि परवा महिना एक दिवसही व्यायाम न चुकवता पूर्ण झाला! मस्त वाटतंय.
रोज ठरवलेली किमान आसनं, आणि मग बोनस म्हणून वर हवा तो व्यायाम हा महिनाभरासाठीचा नेम शक्य तोवर तसाच पुढे चालू ठेवायचा विचार होता. पण गेले काही दिवस माबो वर यायला मिळत नव्हतं, आणि "आज व्यायाम केला?" हा प्रश्न रोज विचारणारं कुणी नव्हतं. काल वेळ असूनही आसनं केली नाहीत. चक्क विसरून गेले! आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. Sad

काल वेळ असूनही आसनं केली नाहीत. चक्क विसरून गेले! आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. >>> काहीही कारणाने (आजारी पडणे, परगावी जाणे, कंटाळा/आळस) २-५ दिवस व्यायाम नाही झाला तरी पुन्हा हा धागा आठवून अथवा आपणच आपल्याला ताकीद देऊन व्यायाम सुरु ठेवा - दररोज व्यायाम करणे खूप जरुरी आहे - दररोज व्यायाम केल्याचे फळ आठ्-पंधरा दिवसात किंवा महिन्या-दोन महिन्यातही मिळणार नाही पण आपण फ्रेश रहाणे, तंदुरुस्त राहणे हे केवळ व्यायामानेच शक्य आहे - त्यासाठी सर्वांना व्यायामासाठी मनापासून शुभेच्छा.

आज सकाळी काही वेळ पी टी एक्जरसाईज व १२ सू नम.

नुकताच हा धागा वाचला. मागे राहिलेला व्यायाम पुन्हा सुरु करावासा वाटला.
काल, ५ सुर्य नमस्कार, सर्वांगासन, स्ट्रेचिंग
आज, ७ सुर्य नमस्कार, सर्वांगासन, स्ट्रेचिंग
उद्या ????
ईथे नेहमी लिहिण्याचे ठरवले आहे म्हणजे नक्की व्यायाम केला जाईल. अजून थोडे लवकर उठावे लागेल.

१७ पासुन काहीच केले नाहीये Sad आता पुढचे १५ दिवसही काहीही न करताच जाणार Sad
प्रवासातवरुन परत आल्यावर १२ ऑगस्टपासुन सुरू करावे लागेल.

व्यायाम घरी साधारण बरा चालला आहे ..
जिम लावावी का ? अशा विचारात आहे ! ...तळवळकर चे १५,००० वार्षिक आणि १३,००० सहा महिन्यासाठी सांगितले आहेत ..

कोणास अनुभव आहे का ? लावावी की नाही अशा विचारांमध्ये आहे ?

इथे हा विषय योग्य नसेल तर विपु मधे कळवा..

रोज ४.५ किमी चालणे सूरु आहे. मागच्या आठवड्यात १ दिवस सुट्टी पडली मात्र या आठवड्यात ७ ही दिवस चालणार. मजा येतेय आणी फरक पण जाणवतोय. आज ५० दिवस झाले सुरवात करून.

१५,००० वार्षिक आणि १३,००० सहा महिन्यासाठी सांगितले >>> Lol
सॉलिड गणित आहे...

कमिटॅड असाल तर वार्षिक मेम्बर व्हा.
स्टीम, स्विमिन्ग ह्याची वेगळी फी आहे का ते नीट चौकशी करा.
ह्या फी मध्ये डायेट प्लॅण इन्क्ल्युड आहे का ते ही बघा.

Pages