Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16
खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.
मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.
असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.
काय मग, आज व्यायाम केला का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा तुम्ही स्वतःवर का ओढवून
बुवा
तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतलंय कळलं नाही ? चांगल्या वैद्याला दाखवा बुवा येळेवर. शुभेच्छा आपल्याला.
@सुरमयी :- सायकलिंग चांगला
@सुरमयी :- सायकलिंग चांगला व्यायाम आहे, पण ८०००-१०००० इन्वेस्ट करुन घेणे जरा पटायला अवघड जात आहे. पण खरं साम्गू का, व्यायाम-प्रकार असा असावा की त्याची आवड असावी. मला बाहेर रस्त्यावर (खरं तर इथे फुटपाथवर) सायकल चालवायला खुप आवडते आणि मी सुमारे २५ वर्ष सायकल चालवतोय, पण जीममध्ये ती स्टॅटिक (का स्टेशनरी) सायकलकडे ढुंकुनही पहात नाही. त्याऐवजी ट्रेडमीलवर १ तासहि मला आवडेल... त्यामुळे आधी आवड महत्वाची. माझ्या मते एक महिना जीम लावुन बघा, तुम्हाला जो व्यायामप्रकार आवडेल, ते उपकरण घ्या. काय म्हणता ?
आणि लाज वाटणे वगैरे सोडा हो. माझ्याच कॉलनीत एक काका निवृत्त झाले आणि नंतर सायकल शिकले. आणि काकू भरतनाट्यम... आता बोला.
किरणके :- अगदी बरोबर... व्यायामाचा आनंद महत्वाचा... वजन आपोआप कमी/जास्त होईलच.
अति तेथे माती
@ शाहिर, तुम्हाला पावभाजी
@ शाहिर, तुम्हाला पावभाजी विथ लेस गिल्ट अशी खाता येईल-- १. पा.भा. खायच्या आधी भरपूर सॅलड खा. २. पावाचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी करून भाजीचं वाढवा. ३. भाजीत ज्यादाचं बटर घेऊ नका वा पूर्वीपेक्षा कमी घ्या.
अजून काही--
१. वडापाव-- दोन्ही मधे कार्ब्स. म्हणून नुसता वडा खा.
२. मसाला दोसा च्या ऐवजी साधा दोसा.
३. पंजाबी पदार्थ खाताना नान वगैरे मैद्याचे पदार्थां ऐवजी रोटी खावी. तेलातील लोणची टाळावी. कांदा भरपूर खावा
४. घरी लोणची करताना, थोड्या प्रमाणात करून टिकण्यासाठी ती रेफ्रीजरेटरमधे ठेवावीत. टिकण्यासाठी घातले जाणारे तेल व ज्यादाचे मीठ होता होईल तो टाळावे.
५. चहातील साखरेचं प्रमाण आठवड्याला अर्धी चिमुट या रेटनी कमी कमी करत आणावे.
६. जेवणात पोळी/भाकरी आणि भात या दोन्हींपैकी एका वेळी एकच असावे.
वरील टिप्स ह्या माझ्या अनुभवातुन आलेल्या आहेत. विविध पुस्तकांमधून कुठे कुठे आल्या असतीलच.
@ विजय देशमुख .. हो बरोबरच
@ विजय देशमुख ..
हो बरोबरच आहे.. नक्की प्रयत्न करेन...
@ मंजुडी महिन्याला १ ते १.५
@ मंजुडी
महिन्याला १ ते १.५ किलो या रेटने वजन उतरवलं तर काही होत नाही.
>>>
ते बाकी सगळं ठीक आहे, पण तो प्रतिसाद मला उद्देशून का लिहिलाय ते समजलं नाही.
मंजूडी आज सकाळी योगा..
मंजूडी
आज सकाळी योगा.. १८ सुन आणि मग शांतपणे शांतीपाठाचा जप केला.
शुगोल थांकु..
शुगोल
थांकु..
काय मग, आज व्यायाम केला का
काय मग, आज व्यायाम केला का ?>>>>>मायबोलीवर येऊन हे वाचले की व्यायाम
केल्यासारखा वाटतो.
दोन दिवसांच्या दांडी नंतर
दोन दिवसांच्या दांडी नंतर परगावी असूनही निग्रहाने ५ कि मी चाललो. खूप छान वाटते . माबो ला बरेच श्रेय आहे
आज नाही केला. काय मग, आज
आज नाही केला.
काय मग, आज व्यायाम केला का ?>>>>>मायबोलीवर येऊन हे वाचले की व्यायाम
केल्यासारखा वाटतो.>> हे वाचल्यावर लगेच वजन पण चेक करता का?
वजन काय चेक करणार! ते बढता
वजन काय चेक करणार! ते बढता बच्चा सारखे वाढतच आहे.असो हातपाय फिरते आहेत. ते काय कमी आहे?
व्यायाम केला. बुवा त्यांनी
व्यायाम केला.
बुवा त्यांनी बॅडमिंटन ला हिंसक म्हटलेलं नसावं तर सकाळी चालणं, मग संध्याकाळे १ तास बॅ. मिं. मग परत जिम या सगळ्याला रोजच्या रोज केल्यामुळे एकत्रितपणे हिंसक व्यायाम ही टर्म वापरली असावी.
शूम्पी धन्यवाद. एक गोष्ट साफ
शूम्पी धन्यवाद.
एक गोष्ट साफ विसरून गेलो. त्या पोस्टमधली मतं डॉ ह. वि. सरदेसाई यांची आहेत. त्यांनी वेळोवेळी लेखन ही केलेलं आहे याबाबत. इथं एक गोष्ट आणखी नमूद करणं आवश्यक ठरेल, व्यायाम आपल्या जीवनशैलीला अनुसरून असावा. नाहीतर व्यायाम सुटल्यावर झपाट्याने वजन वाढतं. कारण बहुतेकांमध्ये आहार तेव्हढाच राहतो. ज्यांचा व्यायाम चालू आहे त्यांनी नाउमेद व्हावं हा या पोस्टचा उद्देश नाही.
हिंसक व्यायाम म्हणजे वयोमानानुसार झीज भरून निघणं कमी होत असतानाही शरीराची जास्तीत जास्त झीज होईल असा व्यायाम. ज्यात अंतर्गत दुखापती होण्याचा संभव असतो. होईलच असं नाही. सचिन तेंडूलकरलाही टेनीस एल्बोच्या दुखापतीचा सामना करावा लागलाय. पस्तिशीत बॅडमिंटन यासाठीच सोडलं. दगड फोडणा-या, शेतीत काम करणा-या माणसाशी आपली तुलना होऊ शकत नाही. त्यांचा दिवसभरात एका लयीत आणि थोडा थोडा व्यायाम होत असतो. आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपण दहा तास एकाच जागी बसणार आणि दोन तास जीम मधे अचानक शरीराला राबवणार. याबाबत सरदेसाईंसारख्या अनुभवी डॉक्टरांची मतं ध्यानात घेणं महत्वाचं वाटतं.
काल ५० मिनिटात ५.७ किमी ४५०
काल ५० मिनिटात ५.७ किमी ४५० कॅलर्या उडवल्या. नंतर उप्पर बॉडी.
सध्या body for life वाचतोय. त्यातील महत्त्वाचे मुद्दे इथे लिहायचा विचार आहे, पण कॉपीराईट्चा प्रश्न येईल का?
आज व्यायाम नाही. ब-याच
आज व्यायाम नाही. ब-याच दिवसांनी व्यायामाला परत सुरवात केल्याने कालपासुन पायाचे मसल्स ठणाणा बोंबा मारताहेत.
आज, काल, परवा अगदी थोडा
आज, काल, परवा अगदी थोडा व्यायाम केला - स्ट्रेचिंग, आसनं, श्वसनाचे प्रकार इतकंच. सद्ध्या अजून काही करणं शक्य नाहीये, पण इतकं तरी करावंच असं वाटलं या धाग्यामुळे! महिनाभर तरी एका दिवसाचाही खंड पडू द्यायचा नाही असा प्रयत्न आहे सद्ध्या.
आम्ही चालून आलो. पीवन पी टू
आम्ही चालून आलो. पीवन पी टू आणि पी थ्री सर्व लेव्हलस वरील कामां चा आढावा घेतला.
आता कुत्र्यांना
गरम तूप पोळी आणि मला गरम चहा बिस्किट. सच गुड लाइफ
आज केला.
आज केला.
कालपासून सुरवात केलीये. काल
कालपासून सुरवात केलीये. काल आणि आज १ तास चालले.
कोई शक?
कोई शक?
आता कुत्र्यांना गरम तूप पोळी
आता कुत्र्यांना गरम तूप पोळी
मामी, अगदीच बोटं कंट्रोल केली.
लोटा घेऊन खुप दूर गेलो आणि
लोटा घेऊन खुप दूर गेलो आणि वापस आलो !
केला....
केला....
धम्यवाद एक छान धाग
धम्यवाद एक छान धाग मिळाला,....व्यायामाची मनापासून आवड असल्यामुले फार जड गेले नाही सुरुवात करायला.....आता तर माजा वाटते.....
आज सुट्टी उद्याचही नक्की
आज सुट्टी
उद्याचही नक्की नाही...
आज केला.... ४० मिनिटात ५ किमी
आज केला.... ४० मिनिटात ५ किमी brisk चालण.
काल योगा, आज थोडे स्ट्रेचिंग.
काल योगा, आज थोडे स्ट्रेचिंग.
रस्त्यावर चालणार असाल तर
रस्त्यावर चालणार असाल तर
https://play.google.com/store/apps/details?id=com.fitnesskeeper.runkeepe.....
हे अॅप चांगले आहे ..कॅलरीस किती बर्न झाल्या ते सुध्द्दा सांगते
केला
केला
हा एक छान धागा आहे. इतर काही
हा एक छान धागा आहे. इतर काही वाचायच्या आधी हे पहिल्यांदा वाचते.
Pages