युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवा,दलिया कोरडाच गुलाबीसर भाजुन ठेवणे.>>>> हां हे करता येईल. फ्रीजम्धेच ठेवू का नाहीतर रवा/ दलिया भाजून झाल्यावर. रच्याकने आता मला भिती वाटतेय पोह्यात पण पोरकिडे होणार की काय?

तांदुळाला बोरिक पावडर लावणे,गहु जर ठेवणीचे घेतले असतील तर पारद च्या गोळ्या कापडात बांधुन ठेवणे.>>> गहु साठवणीचे नाहियेत. १० कि. पीठ आहे.

बोरीक पावडर पटेल मधे मिळते का?

पोरकिडे इ इ न होण्यासाठी सगळ्यात सेफ उपाय म्हणजे 'लवंग' .

रवा, दलिया, पोहे, तांदुळ सगळ्यात लवंगा घालुन ठेवायच्या.

सामान ठवलेल्या डब्यांचे/बरणीचे झाकण घट्ट आहे ना चेक करा. नविन सामान भरायच्या आधी ज्या कपाटात डब्बे ठेवणार ते कपाट डेटॉल किंवा कुठलाही डिसैन्फेक्टंट वापरुन स्वच्छ पुसुन घ्या. कपाट खाली वर्तमानपत्र किंवा ब्राऊनपेपर घालुन त्यावर मग डब्बे ठेवा.

हिंगाचे अख्खे खडे चालतात.
कापूर मांजरपाटाच्या कापडात गुंडाळून कपाटाच्या कोपर्‍यात ठेवा जिथे तांदूळाचे डबे ठेवतात. हिंग डब्यात टाका.

मी हल्ली रवा, पीठं - गहू, ज्वारी, बाजरी, भाजणी, बेसन - फ्रीजमध्ये ठेवते. खराब होत नाही. दोघच असल्यानं खूप वापर होत नाही. मग ठेवलं की हमखास आळ्या होतात. फ्रीजमध्ये जागेची मारामारी होते पण किमान गोष्टी खराब नाही होत.

रवा, दलिया, पोहे, तांदुळ सगळ्यात लवंगा घालुन ठेवायच्या. >>> काही प्रमाण आहे का? का साधारण एक लवन्ग पुरते ?

सध्यातरी माझा freezer "dumping ground" झालेला आहे रवा, दलिया, पोहे, साठी. अजून तरी तान्दूळ, कणकेचे दिवस भरलेले नाहित.

एक किलोला मी ४/५ लवंगा वापरतो. त्या फुकट जात नाहीत. वापरता येतात. ग्रोसरीचे दुकान जवळ असेल तर मोठ्या प्रमाणावर जिन्नस आणायची गरज नसते. (त्याच्याकडे साठवणुकीसाठी जागा असते, आपली जागा का द्या त्याला ?)

काल माझ्या ह्यांनी (कधि नव्हे ते) भाजी आणली. फ्लावर आणला तो मी रात्री बाहेरच ठेवला सकाळी करायचा म्हणुन, सकाळी बघते तर काय तो वर सगळा जांभळा झाला होता . अस का झालं असेल? मि. म्हणतात आणला तेव्हा चांगला दिसला.....
मी वापरला नाहिये , पण वापरला तर चालेल का?

जांभळा? Uhoh
साक्षी नको वापरू अजिबात.... उगाच जीवाशी खेळ नको.
फ्लॉवरवर कसली औषध फवारणी केली होती देव जाणे. Sad

ह्म्म्म्म्म्म्म्म भरत घन्स
पण तरीपण एक प्रश्न आहेच मी घरी आणला तेव्हा चांगला होता आणि रात्री आणला....
मे बी हिटमुळेपण असेल...
(टाकला पण मी )

गेल्या आठवड्यात ओलं खोबरं (तुकडे) डब्यात घालून खाली फ्रिजात ठेवले होते ते खराब झाले. Sad या आठवड्यात खोवून एका डब्यात भरून डिप फ्रिजर मध्ये ठेवलंय.. होप टिकेल. तसंच मला सुकं खोबरं सुद्धा किसून टिकवायचं असेल तर काय करू? किस करून हवाबंद डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवू की फ्रिजर मध्ये? की वरच ठेवू? वरच ठेवलं तर खवट वास येईल का? ते कोरडं पडेल का? कारण जनरली सुकं खोबरं किसून लगेच पदार्थात वगैरे घातलं तर त्याला किंचित तेल सुटतं.

दक्षिणा, तेल असलेला कुठलाही पदार्थ कालांतराने खवट होत जातो.
ओले खोबरे फ्रिझरमधे ठेवले ते नक्कीच टिकेल, पण वापरण्याआधी बराचे वेळ बाहेर काढून ठेवावे लागते. ( पण त्याला ताज्याची चव येत नाही, असे आईचे म्हणणे.)

सुक्या खोबर्‍याच्या वाट्या, तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवल्या तर जास्त टिकतात. आयत्यावेळी हवे तेवढे किसून घ्यायचे. आता तयार खोबर्‍याचा किस मिळतो, तो फ्रिजमधे टिकतो. तसा तो बाहेरही नीट टिकतो. पण वर सांगितल्याप्रमाणे, तेल असलेले पदार्थ खवट होत जातातच. त्यामूळे लवकरात लवकर संपवणे, चांगले.

दक्षिणा, दोन्हीसाठी हो (सुकं खोबरं पण फ्रिजरमध्ये). फक्त वापरताना संपूर्ण कोरड्या हाताने लागेल तेवढंच काढून घेऊन बाकीचं खोबरं ताबडतोब डीप फ्रिजात ठेवत जा. इकडे मुंबईच्या दमट हवेतसुद्धा खोबरं असं चांगलं टिकतं, पुण्यात तर नक्कीच टिकेल.

-

दिनेश ऐनवेळी खोबरं किसत बसायला कंटाळा येतो. Sad काल रात्री सिरियल पाहता पाहता २-४ वाट्या किसून काढल्या...
मंजूडी सुकं खोबरं आज किसून टाकून पाहते फ्रिजर मध्ये. Happy
धन्यवाद.

पौर्णिमा.. अरे वा.. हे ही छान, हाताबरोबर भाजून ठेविन मावेत भाजता येईल का? Uhoh सेटींग कसं ठेऊ?

(त्याच्याकडे साठवणुकीसाठी जागा असते, आपली जागा का द्या त्याला ?)
मस्तच.
पण आम्ही जिथे राहातोतिथे काही गोष्टी सठी-सहामाशीच मिळतात त्यामुळे उगाच घेऊन स्टोअर कराव्या लागतात.

दक्षे, कधी कधी काही रस्सा भाज्यात, सुक्या खोबर्‍याचा तूकडा, कांदा वगैरे थेट गॅसवर भाजून वाटणात घ्यायचे (अंड्याची आमटी / हरभरे / सुरण / बटाटा ) त्याने छान चव येते. खोबर्‍याचा तूकडा पटकन पेटतो. तो पेटू द्यायचा आणि मग विझवायचा. कधी कधी लसणाची मोठी पाकळी पण अशी भाजून घेता येते.

( या रविवारी करु का, हा उद्योग ?)

पण त्याला ताज्याची चव येत नाही, असे आईचे म्हणणे.>>> हो, शिवाय ते खोबरे वाटले की वाटण तेलकट निघते. मिक्सरची पातीही खराब होतात लवकर. Happy

पूनमने काय एडिटले?

दक्षिणा, सुके खोबरे खमंग भाजून हवाबंद डब्यात घालून ठेवले तर फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही. Happy

मी जनरली आलं-लसुन पेस्ट करुन फ्रिज मधे ठेवत असते ती ७-८ दिवस आरामात छान टिकते.
पण ह्या वेळेस ती एका दिवसानंतर चक्क हिरवी पडली, का बरं कळेल का?? Sad

वास नव्हता येत पण रिस्क नको म्हणुन मी ती सगळी फेकुन दिली

Pages