युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला २ गोष्टीत मदत हवी आहे, कुठे विचारू ते कळलं नाही म्हणून इथे विचारतेय.
स्वयंपाकघरात प्रचंड चिलटं झाली आहेत. वास्तुशांती अगोदर अजिबात नव्हती. त्या दिवशी खाण्याचे बरेच जिन्नस आणले होते. इडली, केळी इ. त्या दिवसापासून ती चिलटं ते पदार्थ घरातून गेले तरी अजून जात नाहियेत. काळं हिट आणून मारलं घरात, पण काहीही उपयोग झालेला नाहिये. प्लिज काहीतरी मार्ग सांगा. भयंकर विचित्र वाटतं ते.

आणि दुसरी मदत बहुतेक मंजुडी करू शकेल Happy मला मावेत भात करायचा आहे. त्याची कृती हवी आहे.

दक्षिणा, तुला शक्य आहे का माहीत नाही, पण काही दिवस घरातल्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतील. तसेच घरात कुठेही खाद्यपदार्थच नव्हे तर ओलही राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. बेसिन, सिंक बाथरुमची ड्रेनेजसही झाकून ठेवावी लागतील. मग चिलटे जातात.
तशीही काही दिवसांनी, जर खाद्य मिळाले नाही तर ती जातीलच.

भात, मावेमधेच का करायचा आहे. प्रेशर कूकर हाच सर्वात सोपा मार्ग आहे. हवे तर जरा पातळ खिचडी करून (जास्त प्रमाणात, त्यात मेथी, दाणे, लाल मिरची वगैरे घालून) फ्रिजमधे ठेव. आणि रोज जेवताना लागेल तेवढी, मावेत गरम करुन घे.

दक्षिणा,स्वयपाक्घरातल्या सिंक वर,बटाटेकांदे ठेवतो तिथे,भांड्यांच्या रॅक मधे तसेच अजुन जिथे ओलसर जागा असेल बाथरुम वगेरे तिथे ओडोनिल ची वडी [जस्मिन/लव्हेन्डर चा वास ही छान आहे] थोडेसे रॅपर उघडुन खोक्यासकट दोरीने टांगुन ठेव..चिलटे,झुरळ्,किडे अजिबात होणार नाही..तसेच ओली भांडी नेहमी कोरडी करुनच रॅक मधे जमवावी.हॉल्,बेडरुम मधे ही स्विच बोर्ड वर ओडोनिल थोडेसे उघडुन ठेवले तर उबट/फर्निचर /बंद खोलीत असलेला चा वास येत नाही..

अ‍ॅक्चूली माझ्याकडे ६ लिटरचा फ्युचुराचा प्रेशर कुकर आहे, तो तापायला खूप वेळ लागतो Sad ते वाट पाहणं नको वाटतं. शिवाय लक्ष देणं सुद्धा. त्यातून कमीत कमी भात लावला तरिही मला एकटीला तो दोन दिवस खावा लागतो. Sad म्हणून मावेत भात करायचं म्हणत होते. पण एकूणात ते काही फार उपयुक्त आहे असं वाटत नाही. विचार सोडून दिलेला बरा. Happy दिनेश तुम्ही म्हणता तशी खिचडी करायला हरकत नाही, पण रोज रोज तीच खिचडी खायची का हो? Sad त्यापेक्षा भात करून ठेवला तर? Uhoh तो जरा कोरडा होतो पण.

असो, चिलटांसाठी खिडक्या दारं उघडं ठेवण्याचा ऑप्शन सध्या तरी शक्य नाही. कारण बिल्डींगमध्ये आजुबाजूला अजून बांधकाम सुरू आहे, आणि सतत सिमेंट वाळूचे लोट घरी येतायत. Sad त्यातल्या त्यात सुलेखाने सांगितलेला उपाय करून पाहिन.

दक्षे मी करते अमवेत भात. तांदुळ २०-३० मिनीट भिजवुन ठेवायचे. पाणी दुप्पटीपेक्षा थोडे कमी. पण वेळ किती सेट करायचा ते सांगता येणार नाही. नेहमी प्रमाणाबरोबर लागणारा वेळ बदलतो. पण हा भात गरम असताना अप्रतिम लागतो. कुकरच्या भातापेक्षा चांगला. पण थंड झाल्यावर थोडा ड्राय होतो. तु सुरुवात कर २-३ वेळा केल्यावर तुला अंदाज येइल Happy

भाताला पर्याय म्हणून तांदळाची उकड करता येते. ताकात तांदळाचे पिठ भिजवून फोडणीला दिले कि झाले. पटकन होतो हा प्रकार.
खिचडी, म्हणजे डाळीची. वरणभाताला पर्याय. मला रोज चालते.
दहीभात पण बराच करुन फ्रिजमधे ठेवता येतो. त्यात भरपूर दाणे, काकडी, कैरी, कोथिंबीर, सांडगे मिरची घालायची. उन्हाळ्यात चांगला लागतो. शिवाय गरम करायला लागत नाही.
हॉकिन्सचा दिड लिटरचा पण मिळतो कूकर. भात, भाज्यांना चांगला आहे तो.

दक्षिणा, मग प्रेशर कूकरमध्ये करण्यापेक्षा गॅसवर जाड बुडाच्या भांड्यात कर भात, कितीही कमीत कमी असला तरी करता येईल.

वर्षा मिनिमम किती वेळ ते तरी सांग, का सारखा काढून पहायचा? Uhoh

दिनेश, उकड मला करता येत नाही पण आता हळूहळू सगळे प्रयोग करीन म्हणतेय Happy बाकी तुम्ही सांगितलेला दहीभात तोंपासुच. Happy

दक्षिणा, एक लिटरचा बेबी कूकर घे. त्यामधे भात कर. सुनिधीसाठी मऊ गुरगुटा भात त्यातच करते. तांदूळ आणि डाळ एकदमच शिजवून घेते. शिवाय बटाटे उकडणे, भाज्या वाफवणे वगैरे कामाना पण बरा पडतो.

दिनेश, उकड मला करता येत नाही पण आता हळूहळू सगळे प्रयोग करीन म्हणतेय >>>> अग मी पाठवलेले सत्व करुन पाहिलेस का? ते जमले असेल तर उकड त्याहुन सोपी आहे.

तांदूळ आणि डाळ एकदमच शिजवून घेते. शिवाय बटाटे उकडणे, भाज्या वाफवणे वगैरे कामाना पण बरा पडतो.>>>> +१ १० मि. मधे भात / भाज्या तयार.

सध्या मी एकटीच आहे तर छोटा कुकर घेतलाय मी. डाळ-तांदूळ वेगवेगळे शिजवायपेक्षा मी एकदम खिचडीचेच वेगवेगळे प्रकार करते. १० मि. पण लागत नाहीत. अनावश्यक गॅस खर्ची पडत नाही.

दक्षिणा, बासमती वापरत असशील तर कूकरबाहेर बरोबर दहा मिनिटात तो शिजतो. नेमके दुप्पट पाणी घालायचे (भिजवून ठेवायचा नाही.) आधी मोठ्या गॅसवर उकळायचा. मग ७ मिनिटांनी आच मंद करुन झाकण ठेवायचे. १० व्या मिनिटाला बंद करुन. ३ मिनिटानी झाकण काढायचे.
बाकिचे तांदूळ आकाराने बारीक असले तरी जरा जास्त वेळ घेतात.

(बिनीवाल्यांनी आसाममधल्या कोमल चावल चा उल्लेख केला होता. तो तांदूळ शिजवावाच लागत नाही. थोडा वेळ भिजवला कि झाले. हा भात मुळशी भागात पण होऊ शकतो, असे त्यांनीच लिहिले आहे. !!!)

कुठल्याही भांड्यात भात ठेवलास तरी चालेल, भातातलं पाणी आटत आलं की आचेवर तवा ठेवायचा तव्यावर भांडं ठेवायचं भांड्यावर झाकण ठेवायचं.

आता हे तिसर्‍या बाफ वर नंदिनी अगदी अगदी Happy

बारका कुकर का नाही घेत. इलेक्ट्रिक कुकर घे नाहीतर एक लिटरचा म्हणजे शिट्ट्या नाही मोजाव्या लागणार. मोठ्या कुकरच्या एक्स्चेंज मध्ये घे म्हंजे पैस वाचनार. प्रेशर पॅन म्हणून एक असते ते घेतलेस तर तुझे जाड बुडाचे भांडे व प्रेशर कुकर असे दोनी काम होईल. मी तशीच खिचडी भात इत्यादी लावते प्रेशर पॅन मध्ये. दोन वेळचे एकाच वेळी लावते. असेल त्या भाज्या घालते. गरम गरम मस्त लागते. तू कामावरून थकून येत असणार. सकाळी तयार होताना लावून जा. मग रात्री आल्यावर मावेत गरम करून घे एक चमचा तूप घालून.

दक्षिणा १ कप तांदूळ धुवून अर्धा तास भिजवून दोन कप पाण्यात १२ मिनिटे मायक्रोवेव्ह करायचा. त्यासाठी पुरेसा मोठा कॅसरोल घेतला तर उतू जात नाही. झाकण थोडी फट राहील असं लावायचं. मधे ६ मिनिटे झाल्यावर तांदूळ एकदा ढवळायचे.
दहा मिनिटे स्टँडिंग टाइम द्यायचा (भांडे मायक्रोवेव्ह बंद करून तसेच आत राहू द्यायचे).
मस्त मऊ मोकळा भात होतो.
मऊ भात हवा असेल तर पाव कप पाणी वाढवायचं आणि २ मिनिटे जास्त लावायची.
(मायक्रोची वेळ मायक्रोचे वय, कपॅसिटी यानुरूप थोडीशी बदलते)

भरत, म्हणजे ३० + १२ +१० अशी ५२ मिनिटे लागतात की, त्यापेक्षा कूकरमधे कमी वेळ लागतो.

त्याचं कायै, खुप वर्षे वापरुन झाल्यावर आता मला मावेचा कंटाळा आला. आधी तर दाणे भाजायला, चहा करायला, लिंबाचा रस काढायला, पेढे गरम करायला, पापड भाजायला... सगळ्याला तोच वापरायचो.

@ दक्षिणा, चिलटं घालवण्यासाठी घरात कोरफडीचे एक रोप आणुन ठेव. किंवा मुळासकट कोरफड आणुन ती किचनमधे लटकवुन ठेव.

मावे मधे भात करण्यासाठी इथे मावे राईस कुकर मिळतो. मी पूर्वी वापरायचे. पण आता मला गॅसवर डायरेक्ट पातेल्यात केलेलाच भात आवडतो. माझी आई आणि आता ताई या राईसकुकर मधे साबुदाण्याची खिचडी पण करतात. मस्त लुसलुशीत होते Happy

माझा भात मा.वे. मधे २०-२२ मिनीटात होतो.
१ वाटी तांदुळ असेल तर २ & १/४ वाटी पाणी २० मि. साठी मा.वे. करते.

मधे एखादे वेळेस (१५-१६ मिनीटानी) काढुन बघायचा, वाटल्यास थोड पाणी वाढवायच. (शक्यतो लागत नाही.) भात तयार.

सुट्टीच्या दिवशी प्रयोग म्हणून करायला मावेतला भात ठिक आहे, रोज घरी गेल्यावर कोण भूक लागलेली असते. त्यातून ३० मि भिजवून ठेवायचा म्हणजे मला बहुतेक रात्री १० लाच जेवावं लागेल. Sad

Pages