युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांदूळ भिजत ठेवायचा नसेल तर कुकिंग टाइम आणि पाणी वाढवायचे.
दक्षिणा, तुम्ही एक कपपेक्षा कमी तांदळाचा भात करत असाल तर वेळ कमी लागेल.
प्रमाण अर्धे केले तर वेळ २/३ पट.

दिनेशदा, Thanks! मी करुन बघते.... पण उड्दाच्या पिठाच्या भाकर्‍या? घावण केले तरीही चालेल नाहि का?

मी नेहमी मावेत भात करते. तान्दुळ (. कसा लिहायचा?) धूउन..... पाणी काढून कमीत कमी १० मि. ठेव. (साबुदाणे भिजवतो तसे... चमचाभर पाणी ठेवतो तसे).... भात करताना जसा भात हवा तसे पाणी ठेव... मला मऊ भात आवड्तो म्हणुन मी दुप्पट पेक्शा जास्त पाणी ठेवते. बाउल मोठे घेते. Plastic Film ने cover करते. १५.मि. भात होतो... मधे काहि बघावा लागत नाहि... तु office ला जायच्या आधी तान्दुळ धूउन ठेवले तरि चालेल. मी नेहमी बासमती तान्दुळ वापरते. कधी जास्त तान्दुळ झाले तर धुतलेला तान्दुळ फ्रीज मधे ठेउन दुसर्‍या दिवशी हि वापरते.

२-४ मुठी तांदुळ पातेल्यातसुध्दा जास्त भानगड न करता हातपायधुवून कपडे बदलेस्तोर रटरट गॅसवर शिजव की पोरी. Happy वर लिवल्याप्रमाणे झाकण दडपू नकोस, कलतं ठेव. अन वरनाचा गोळा ठुतीस का फ्रिजात? का नुस्ता गुरगुट्टा भात? Happy पेक्षा एक चिमुकला कुकर घेऊन टाक. मीबी प्रेस्टिज चिमखडा गेली ५ वर्ष विविध कामांसाठी वापरते.

राजेळी केळी म्हणजे प्लांटेन. ती शिजवूनच खावी लागतात. त्यानुसार ती बेक करुन किंवा तळून खाता येतात.
त्याचा हलवा, उंबरे, पोळ्या असे प्रकार करता येतात.
त्यातल्या त्यात हलवा करायला सोपा. सोलून चकत्या करुन तूपात परतायच्या. त्याच वेलची, साखर घालायची. जास्तीचे म्हणजे त्यात ओले खोबरे किंवा लाल टोमॅटो घालायचा.

१००० पोस्टी झाल्या !!!

दक्षिणा, हि केळी थोडी आंबट असतात. नुसतीच गोड नसतात. केरळी काचर्‍या याच्याच करतात. (कच्च्या केळ्याच्या) साखर आवडीप्रमाणे घालायची.

ही केळी, पांढरा मूळा, हिरवे वाटाणे, टोमॅटो अशी भाजी पण करतात. छान लागते.

अग सोने, भ्रली केळी, (जशी भ्रली वांगी)म्हटल मी - गोड पक्वान्न ग. Happy केळी भरून ती अलगद परतावीत.

अग सोने, भ्रली केळी, (जशी भ्रली वांगी)म्हटल मी - गोड पक्वान्न ग. केळी भरून ती अलगद परतावीत>> अरे वाह, पण त्यात भराव काय? Uhoh
जरा डिटेल द्याकी.

केळ्याचा हलवा

भरल्या केळ्यांसाठी केळी न कुस्करता तुकडे करायचे आणि त्यात खोबरे-साखर-खवा/पेढ्याचे मिश्रण भरायचे आणि तुपावर परतायचे.

हा...तिच ती मोठ्ठी केळी. त्याचा हलवा पण बराचसा चिवट होतो ना? चिप्स आणि भरल्या केळ्याचा ऑप्शन इंट्रेस्टींग आहे. धन्यवाद अनघा, मंजूडी, दिनेशदा आणि दक्षिणा Happy दोन्ही प्रकार आधी केलेले नाहीत. करुन बघेनच.

अनघा_मीरा, हौस आहेच मग वेळ आता काढायलाच पाहिजे. सारण भरल्यावर शिजवायची कशी? तुपात परतायची की वाफवायचीत?

परतावीत . वाफवल्यास चांग्लई लागणार नाहीत शिवाय मेण होतील ते वेगळच :काल ५ डिग्री आजही किती थांद म्हणून कुडाकुडत टाएपणरी बावली:

परतावीत . वाफवल्यास चांग्लई लागणार नाहीत शिवाय मेण होतील ते वेगळच :काल ५ डिग्री आजही किती थांद म्हणून कुडाकुडत टाएपणरी बावली:

जागोमोहनप्यारे, हे ऑलरेडी क्यु मधे आहे. पण ह्याला आपली नेहमिची केळी लगतील्.बनवल्यावर पाठवून देण्यात येईल Happy

आभार अनघा!

साबुदाण्याची खीर/ दही साबुदाणा हे प्रकार पण करता येतील. उष्ण प्रदेशात असाल आणि शक्य असेल तर पापड्या, चकल्या करू शकता. किंवा बेस्ट म्हणजे साबुदाण्याचं पीठ करून ठेवा.

बासुंदी चे दूध आठवताना, पसरट भांड्यात मोठ्या आचेवर भरभर ढवळत आटवायचे. रंग पांढरा राहतो आणि लवकर आटते. (मंद आचेवर आटवले तर रंग गुलबट होतो.)

दूधाचे दही व चक्का करता येईल. चक्का फ्रिजमधे टिकतो. श्रीखंडासाठीच नव्हे तर कोशिंबीरीत पण वापरता येतो.

हसरी, कस्टर्ड करता येईल. नुसते दही जरी लावून ठेवलेस तर दही फेटून कढी करता येईल. पनीरही करता येईल.

Pages