युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण सायोने लिहिलेले उपायच लिहिणार होतो.
तूमच्याकडे लोड शेडींग असते का ? बराच वेळ लाईट गेली, तर फ्रिजमधले पिठही
जास्त आंबते. त्यावेळी, त्यात भर म्हणून भाज्या, तांदळाचे पिठ वगैरे वापर.
याच पिठाचे दहिवडे पण चांगले होतात !

मी भिजवलेलं पीठ बिल्कूल फसफसलेलं नव्हतं... पण डोसे जरा जाड झालेले तरिही चविला चांगले आणि हलके लागले.

सायो आणि दिनेश.. थँक्यू सो मच Happy

दिनेश लोड शेडींग नसतं... म्हणजे नविन घरी तरी सुट्टीच्या दिवशी अनुभवलंय की लाईट गेली तरिही २ मिन्टात परत येते. आणि खूप वेळासाठी म्हणजे आत्तापर्यंत अर्धातास गेली होती. पण उन्हाळ्यात जास्ती कळेल.

मला या पदार्थांसाठी, तयार मिक्सेस आवडतात. एका पाकिटाच्या मिश्रणात चार
डोसे / उत्तप्पा होतात. आणि आपण हवे तर एकावेळी दोन डोश्यांचे पिठ पण भिजवू
शकतो. फारशी कटकट नाही, भिजत घाला / वाटा / मिक्सर धूवा नाही. आणि डोसे
हमखास जमतातच.

मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजताना मावे ची पॉवर किती ठेवायची? तो कोणत्या मोडवर ठेवायचा? आणि किती वेळ ठेवायचा? Uhoh
मला मिळालेल्या मॅन्यूअल मध्ये डिटेल्ड माहीती नाहिये. Sad
तसंच रवा मावेत कसा भाजायचा ते पण सांगा.

माझा १६ वर्षे जुना आहे मावे , त्यामुळे त्याची पावर वगैरे मला आता आठवत नाही. पण मी एका काचेच्या बोलमधे ५० ते ६० सेकंद एकावेळी, मग नीट मिसळून परत मावे मधे असे चार वेळा भाजते . एका वेळी दीड ते दोन मेझरिंग कप इतपत रवा मी भाजलाय . एकदा वाटीभर रवा तीस तीस सेकंद ठेवून पहा म्हणजे तुलाच अंदाज येईल .

दक्षः
एक परातीसारखे भांडे मिळते ते नाहीतर काचेचे पसरट भांडे घेउन त्यात दाणे ठेऊन १मि. ४० से. असे
ब्रेक देत देत चार नाहीतर पाच वेळा करायचे. दर वेळी चेक करायचे व सारखे हलवून मग ठेवायचे म्हणजे इव्हनली भाजले जातील.

रवा भाजायला पण काचेचे पसरट भांडे घेऊन त्यात रवा ठेवून भाज. इथे १.४ सेटिन्ग आजिबात वापरू नको.रवा करपू शकेल. ३० से. च वापर.

दक्षिणा, मायक्रोवेव मोडवर हाय पॉवरवर एका पसरट काचेच्या भांड्यातच रवा/शेंगदाणे भाजायचे. तीस सेकंदांसाठी ठेवायचे, खाली काढून लाकडी चमच्याने ढवळून पुन्हा मायक्रो मोड-हाय पॉवर- तीस सेकंद असे रव्यासाठी तीन ते चार वेळा आणि शेंगदाण्यांसाठी साताठ वेळा करावे लागेल.
जास्त वेळासाठी ठेवले तर वरचे वरचे शेंगदाणे भाजले जातात, खालचे तसेच राहतात. शिवाय एकदम जळून जाण्याचीही शक्यता असते.

शेंगदाणे भाजताना पसरट प्लेट मधे एकाच लेयर अधे ठेवायचे आणि वरतुन एक किचन पेपर ठेवयचा आणि मग ३० सेंकंदांच्या बर्स्ट मधे भाजायचे.

रुतु | 12 April, 2012 - 09:07
पार्टी मधे ग्रीन सॅलड सर्व करण्याच्या काही आयडिया सांगा ना..
म्हण्जे.. काय होतं ना.. कि सगळं लवकर मिक्स करुन ठेवलं तर मग खाणं सुरुवात करे पर्यन्त त्यातला पालक, चार्ड, लेट्युस अश्या हिरव्या भाज्या मऊ पडतात..करकरीत पणा जातो..
सॅलड ड्रेसिंग कधी घालवे?..कोणत्या टाईप ची भांडी वापरावीत (मी इथे सगळी कडे वूडन utensils च बघितली आहेत सॅलड सर्व करताना)?..
कोशिंबीरीची सजावट आणि मांडणी जमते.. सॅलड स्वतः पुरते करायचे असेल तर काही नाही वाटत..
पण असं छान पैकी सर्व करताना काहीतरी चुकल्या सारखं वाटतं

@ रुतु

ग्रीन सॅलड साठी -
सॅलड ड्रेसिंग अगदी शेवटी सर्व्ह करताना घालायचे.
सॅलड ची पान, पालक इ इ एकत्र करुन मोठ्या प्लॅस्टिक बॅग मधे/सेल्फ सिलींग बॅग मधे घालुन फ्रिज मधे ठेवायचे. आयत्यावेळेस मोठ्या बोल मधे (लाकडी / काचेचा / स्टीलचा) सॅलड काढायचे आणि त्यावर ड्रेसिंग ओतायचे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे. खुप मोठ्या क्वांटिटीवर करायचे असेल तर ड्रेसिंग पिच मधे घालुन ठेबलवर ठेवायचे आणि सॅलड वेगळे ठेवायचे. ज्याला हवे तसे, हवे तेव्हढे ड्रेसिंग घालुन घेता येते आणि शिवाय सॅलड उरलेच तर पचपचित होऊन वाया जात नाही. ड्रेसिंग उरले तर परत वापरता येते. सॅलड मधे टॉमेटो घालायचे असतिल तर शक्यतो चेरी/ग्रेप टॉमेटो न चिरता घालावेत. मोठ्या फोडी घालायच्या अस्तिल तर त्या शेवटी घालाव्या. कॅप्सिकम चे तउकडे आशी घातले तरी हरकत नाही पण काकडीच्या चकत्या/ तुकदे देखिल शक्यतो आयत्यावेळेसच घालावेत.

कधीकधी तयार सॅलड्स्चे बोल्स (प्रॉन्स, क्रॅब मीट इ इ असलेली सॅलद्स) बर्फाच्या लादीवर ठेवतात किंवा मोठ्या बोल मधे बर्फाचा चुरा + मिठ घालुन त्यात सॅलडचा बोल ठेवतात.

लाजोच्या सूचनेत माझी किंचीत भर. लेट्यूसची मोठी पाने असतील तर कधीच ती कापायची नाहीत. तिचे हातानेच तूकडे करायचे.
काकडीला पाणी सूटणे हे नेहमीचेच पण खास करुन भूमध्य समुद्राच्या परीसरात काकडीला मीठ लावून त्याला सूटलेले पाणी निथळून घेतात. पण ते लोक काकडी किसत नाहीत, शक्यतो चकत्याच करतात.
तसेच काही वेळा ग्रीक सलाद मधे कांद्याचा वास सगळ्या भाज्यांना लागून सगळे सलाद एकसूरी लागते. त्यावेळी लाल कांद्याच्या उभ्या कापा, बर्फाच्या पाण्यात थोडा
वेळ ठेवून वापरतात.
सलादमधे उकडलेले बटाटे, चणे, बीन्स, शिंगाडे वगैरे पिठूळ पदार्थ वापरायचे
असतील तर ते ड्रेसिंगमधे थोडावेळ मुरू दिले, तर चांगले.

आज माझा पहिलाच प्रयत्न आहे इथे प्रश्न विचारण्याचा. आत्ता पर्यंत फक्त वाचक होते मी इथे. तुम्ही सगळे जण फार उपयुक्त माहिती देता म्हणून थोडी आशा वाटते आहे.

मागच्याच रविवारची गोष्ट प्रिझ मधले (Ready to bake dinner rolls) काढून बाहेर ठेवले आणि मग चार तासांनी त्यांना ओवेन मध्ये ठेवण्य साठी गेले बघते तर काय सगळे एकमेकांना चिकटले होते. हात लावला तर ते वेगळ व्ह्यायचं नावच घेईनात.

मग नवऱ्याला हाक मारली तर तो हा सगळा प्रकार बघून लाबुनच पळून गेला. नेहमी मला किचन मध्ये त्याचा आणि आईचा दोघांचाच आधार असतो आज तोच पळून गेला बाहेर पक्षी बघयला. मग पुढचे तीन तास घालून कसंतरी करून अजून कणिक घालून तेल लावून कसं तरी केल बाई सगळ्यांना वेगळ आणि ठेवले एकदांचे त्या बेकिंग Tray मध्ये.

एकाच वेळेस लहान मोठे असे वेगवेगळ्या आकाराचे तब्बल चाळीस रोल्स तयार झाले आहेत. अजून हि तेच खातो आहोत रोज थोडे थोडे. आज तर ठरवलं आहे की घरी गेल्यावर उरलेले टाकून देईन पण टाकायला थोडं वाईट वाटत........अन्न असं फेकून देताना. शेवटचा प्रयत्न म्हणून मायबोली वर आहारशास्त्र मध्ये विचारते आहे....... ह्या रोल्सचं काही करता येईल का म्हणून?

लाजो म्हणते तसे ड्रेसिंग वेगळे ठेव. ते २-३ प्रकारचे असु देत. सॅलेड मधे द्राक्ष, सफरचंद्,संत्री चांगले लागते. अक्रोड, ड्राय क्रॅनबेरि पण चांगले लागते.

लाजो, दिनेशदा, विद्याक.. छान आहेत सूचना..
माझी आई काकडी किसुन झाली कि एकदा पाणी काढते..आणि मग त्याला थोडसं तुप चोळते..म्हणजे मग पाणी नाही सुटत.
सध्या २ ड्रेसिंग आहेत घरी.. अजुन १-२ चांगले ड्रेसिंग घ्यायचे आहेत..
पण हेल्थि ड्रेसिंग का छान टेस्टी ड्रेसिंग ह्या मधे नेहमी वाद होतात आमचे.. Sad

अनन्या, ते रोल्स छोट्या झिपलॉक बॅगांमधे घालून फ्रीज करा. फ्रीजरमधे कुठल्याही ब्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स (उदा: ब्रेड, बन्स, पिझ्झ बेस वगैरे) २-३ महिने उत्तम टिकतात. हवे तेव्हा बाहेर काढून १०-१५ मिनिटं खोलीच्या तापमानाला ठेवायचे. हवं तर २-३ मिनिटं ओव्हनात २५० डिग्री फॅ, ला गरम कराय्चे. अगदी लुसलुशीत मऊ होतात.

धन्यवाद अरुंधतीदि तुम्ही दिलेली लिंक मी नीट पहिली. खरच उपयुक्त आहेत Leftover रोल्स च्या रेसिपी. मला थोडी भीती वाटते कारण त्यातील काही पाककृतींसाठी माझ बेकिंगच कसब पणाला लागणार आहे. माझा बेकिंग चा आत्ता पर्यंतचा अनुभव फारच वाईट आहे.
काहीतरी अजून सोप्पी पाककृती असेल का? थोडीशी तिखट.....

मृण्मयीदि उपाय सोप्पा आहे एकदम. बघते विचारून खातील का नंतर....नाहीतर मला एकटीलाच खायला लावतील.

तुम्हा दोघींचे मनापासून आभार.

माझ्याकडे टोस्टरअवन+कन्वेक्क्ष्न+ब्रोइलर असे कोम्बो आहे. कन्वेक्षन अवन वापरुन पूरणपोळीचे पूरण करता येईल का? मी मायक्रोमध्ये करायचे - तो मी काढून टाकल्यामुळे आता फक्त वर सांगितलेला अवन आहे. कोणी केले आहे का पूरण मायक्रोमध्ये? मी अमेरिकेत आहे.

अमी

ब्राउन शुगर च मोठ पॅक आणल गेल आहे, री रोजच्या साखरेसारखी वापरुन संपवता येते का? त्या वर केक वैगरे साठी वापरा अस लिहल आहे. आणि १-२ दा केक करुन संपणार नाहिये अजून काय करता येईल?

गूळा ऐवजी वापरणे सोपे आहे. रोज भाजी, आमटीत गुळ वापरला जातो.
वेका, दुधा बरोबर वापरु नये का ब्राउन शुगर?
दोघींना पण धन्यवाद... Happy

अग मला ब्राउन शुगर थोडा गुळाचा इफेक्ट सारखी वाट्ते म्हणुन तस म्हट्ल मी आणी वापरून पाहिलैस तर कदाचित चव आवड्णार नाही

साधी पांढरी साखर/गुळ जिथे चालेल तिथे तिथे ब्राउन शुगर चालायला हवी. उलट पांढर्‍या साखरेपेक्षा (त्यातल्या त्यात) चांगला पर्याय आहे. चवीत किंचीत बदल वाटेल पण सवय झाली की झाले

नारळ पासुन काय काय बनवता येईल... त्याला खवण्यासाठी माझ्याकडे साधण नाही ...... भाजीत वापरुन संपवु शकत नाही एवढा आहे...
क्रुपया मदत करा

किंचीत मीठाचे बोट लावून फ्रिजमधे किंवा उन असेल तर उन्हात वाळवता येईल, मग करवंटी सुटून येते मग किसणीने किसता येतो किंवा चाकून कापता येतो.
पण नारळ आहे म्हणून तो एकाचवेळी वापरू नका, त्यातले मेद जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपायकारक ठरतील.

Pages