Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कुणीतरी, इमेलने पांढर्या
मला कुणीतरी, इमेलने पांढर्या वाटाण्यांबद्दल विचारले होते, माझ्याकडून
चुकून ती इमेल डिलीट झाली. त्या व्यक्तीची क्षमा मागून, इथे उत्तर देतोय.
पांढरे वाटाणे डायरेक्ट कूकरमधेच (डब्यात नाही) शिजवले का ?
तसे लवकर शिजतील, शिट्या न मोजता वेळ मोजायची. प्रेशर आल्यानंतर आठ ते दहा मिनिटे शिजवावे लागतील. (शिट्या किती का होईनात )
तशी गरज नाही, पण एक चहाचा चमचा तेल टाकले तर चांगले. पाव किलो पांढर्या वाटाण्यांना, जास्तीची मूठभर चण्याची डाळ घ्यायची. त्याने उसळ मिळून येते.
-----------------
दक्षिणा, बीट उकडून वापरत असशील तर उकडुन फ्रिजमधे ३/४ दिवस ठेवता येईल.
गाजर आणि काकडी, न सोलता / किसता ऑफिसमधे न्यायची. आणि आयत्यावेळी
कापून खायची.
मोड काढलेले मूग, चणे जर खात असशील तर मोड आल्यानंतर १/२ दिवस फ्रिजमधे
राहतील.
(ऑफिसमधे फ्रिज नाही का ? एक भो.प्र.)
धन्यवाद दिनेशदा. संत्री अगदीच
धन्यवाद दिनेशदा. संत्री अगदीच आंबट आहेत..रस काढुन फ्रिझ केला तर लेमोनेड करता येईल अस विचार आहे. भरपुर संत्री असल्याने अजुन काय करता येईल का?
सोनपरी, तु दिनेशदांना
सोनपरी, तु दिनेशदांना विचारलेस पण मी सुचवले तर चालेल ना?....
पायनापल शिरा करशील त्यात संत्र्याचे तुकडे, रस वापर. सॅलेड मधे वापर्...सॅलेडची पाने+टोमॅटो+अक्रोड +द्राक्ष ...या बरोबर संत्र्याचे तुकडे छान लागतात.
धन्यवाद विद्याक अग ती
धन्यवाद विद्याक
अग ती संत्री म्हणजे पिवळे लिंबुच आहेत
सॅलड आणी शिरा करुन बघते पण एवढ्या आंबटपणाने शिरा दुधाएवजी दुध + पाणी घालुन करावा लागेल बहुतेक.
नुसत्या संत्र्याचा शिरा करु
नुसत्या संत्र्याचा शिरा करु नकोस. पायनापल बरोबर टाक. पायनापलच्या अर्धे संत्री घे. मी जेव्हा पायनापलचा शिरा करते तेव्हा दुध घालत नाही, फक्त पाणीच वापरते. याला साखर थोडी जास्त लागेल्. तू म्हणतेस कि संत्री म्हणजे पिवळी लिंबे आहेत तर अगदी थोडा शिरा करुन बघ.
त्याचा सुधारस ही छान होईल........ गोड लिंबाचे लोणचे करतात ,तसे करुन बघ.
सुधारस (सिरप) मस्त पर्याय
सुधारस (सिरप) मस्त पर्याय आहे..चला आता थोड्याच दिवसात मा बो वर 'माझे संत्र्याचे प्रयोग' म्हणुन एक ललित
वा! छान..... वाट पाहते तुझ्या
वा! छान..... वाट पाहते तुझ्या लेखाची.... संत्र्याचा अजुन एक उपयोग्.....लेखनासाठी...हाहाहा...
लेख लवकर येऊ द्या.
लेख लवकर येऊ द्या.
@ रीमा मला पण तसंच वाटलं.. मी
@ रीमा मला पण तसंच वाटलं.. मी किस अगदी ऐनवेळीच करते.
ऐनवेळी काही कापायचे म्हणजे सुरी बिरी घेऊन जावी लागेल ऑफिसात. मी काकडी/गाजर काप करून घेऊन जाते घरून. कोशिंबिर केली तर दही, कूट, साखर मिक्स करून मीठ फक्त ऐनवेळेला घालते.
@दिनेश - ऑफिसात फ्रिज नाहिये.
असं करण्याशिवाय इलाज नसतो माझ्याकडे
@सोनपरी - संत्र्यांचा भात अशी एक रेसिपी आहे रूचिरात... ती पाहून उद्या टाकते इथे हवं तर.. हवीये का?
मी किस अगदी ऐनवेळीच
मी किस अगदी ऐनवेळीच करते.>>>>>>>>>>>>>>
भान तु शास्त्रज्ञ का नै झालिस
भान तु शास्त्रज्ञ का नै झालिस
(शोध लावलास म्हणून म्हणलं.)
मी किस अगदी ऐनवेळीच
मी किस अगदी ऐनवेळीच करते.>>>>>>>

भान तु शास्त्रज्ञ का नै झालिस
भान तु शास्त्रज्ञ का नै झालिस (शोध लावलास म्हणून म्हणलं.)>>>>>>>>>>><
मी किस अगदी ऐनवेळीच
मी किस अगदी ऐनवेळीच करते>>>>>>>आसं कसं झालं
काकडी, गाजर वगैरे कापायचे
काकडी, गाजर वगैरे कापायचे नाही, आयत्यावेळी चावून खायचे.
धन्यवाद दक्षिणा, मा बो वर
धन्यवाद दक्षिणा, मा बो वर 'संत्र्याचा भात' शोधुन बघितले पण रेसिपी दिसली नाही कदाचित नाव वेगळे असेल. गुगल करुन हि रेसिपी मिळाली, छान वाटतेय http://www.tarladalal.com/Cool-cool-santra-bhaat-31830r
सोनपरी, संत्राच्या भाताला गोड
सोनपरी, संत्राच्या भाताला गोड संत्री हवीत. सुधारस चांगला पर्याय आहे. पण आंबट
संत्री संपवायला, साखर बरीच लागेल.
कोणाला दुधी चे कोफ्ते कसे
कोणाला दुधी चे कोफ्ते कसे करायचे माहीत आहे का?
रविवारी रात्री पनीर आणलेल
रविवारी रात्री पनीर आणलेल आहे, फ्रीजमध्येच आहे, नंतर विसरलेच. ४-५ दिवसांपुर्वीच पनीर आज वापरले तर चालेल का??
sanzu, या पानाच्या उजव्या
sanzu, या पानाच्या उजव्या हाताला वर 'आहारशास्त्र आणि पाककृती' लिहिलंय त्यावर क्लिक करा. मग उघडणार्या पानावरील 'विषयवार' यादीवर क्लिक करा. मग 'करी' वर क्लिक करा, आणि उघडणारी यादी वाचा, 'दुधी कोफ्ता करी' सापडेल.
सगळ्यात सोपं म्हणजे या उजव्या बाजूला 'मायबोली शीर्षकगीत प्रकाशन' याच्याखाली 'शोध'च्या खाली पट्टी दिसतेय त्यात 'दुधी' एवढेच लिहून सर्च केलंत तरी तुम्हाला माहिती मिळेल.
धन्स मंजुडी.. माझ्या लक्षातच
धन्स मंजुडी..
माझ्या लक्षातच आले नव्ह्त.
पिवळ्या द्राक्षचं काय करु
पिवळ्या द्राक्षचं काय करु शकतो? हंगाम सुरु आहे.
दिनेशदा, माझ्या भावाने मित्राच्या लग्नात द्राक्षाची बासुंदी खाल्ली. ति कशी करतात?
हसरी, बहुतेक अंगुरी बासुंदी
हसरी, बहुतेक अंगुरी बासुंदी असणार ती. त्यात द्राक्ष नसतात तर छोटे छोटे रसगुल्ले
असतात.
पिवळी म्हणजे हिरवी ना. ती नुसतीच खावीत. खरं तर आता बियावाली द्राक्ष मिळत
नाहीत. त्यातल्या बियासकट ती खाणे चांगले.
धन्यवाद दिनेशदा.
धन्यवाद दिनेशदा.
साक्षीमी, पनीर पिवळे पडलेय का
साक्षीमी, पनीर पिवळे पडलेय का ? वाईट वास येतोय का ?
सहसा दूधाचे पदार्थ, त्याच दिवशी संपवावे. (चीजसारखे पॅकबंद आणि टिकाऊ
पदार्थ, हा अपवाद.)
नाही दिनेशदा, वास, रंग आहे
नाही दिनेशदा, वास, रंग आहे तसाच आहे?? डीप फ्रिजर मध्येच आहे अजुन, शिवाय पॅक प्लास्टीक कव्हर मध्येच आहे. वापरु का आज??
हो मग आज वापरुन टाकले तर बरे.
हो मग आज वापरुन टाकले तर बरे.
धन्स दिनेशदा. तुम्ही
धन्स दिनेशदा. तुम्ही सांगितलात की एक बिनधास्तपणा येतो आपसुकच.
मी रविवारी डोसा/उत्तापाचे
मी रविवारी डोसा/उत्तापाचे तयार पीठ (कोरडं) आणले होते. त्या बाईंनी सांगितल्या प्रमाणे भिजवले... आणि बंद मावेत ठेवले.. आंबवण्यासाठी... माझे प्रश्न खालिलप्रमाणे
फ्रिजात ठेवलं तर २र्या फेरीत केलेले डोसे/उत्तापे चांगले होतात का? 
असं भिजवलेलं पीठ नीट आंबलं आहे की नाही हे कसं ओळखायचं?
डोसा उत्तपा बनवताना पीठाची कन्सिस्टन्सी कशी हवी? दोन्हीसाठी एकच की वेगवेगळी?
समजा पीठ आंबवलं ते जास्त असेल आणि २-३ दिवसांनी पुन्हा डोसे करू म्हणलं तर ते आंबलेलं पीठ फ्रिजात ठेवावं, की वरच?
>>असं भिजवलेलं पीठ नीट आंबलं
>>असं भिजवलेलं पीठ नीट आंबलं आहे की नाही हे कसं ओळखायचं?>>
फसफसून वर आलं असेल तर आंबलंय हे ओळखता येतं. तसंच पीठाला जाळी पडल्यासारखी दिसतेय का?
>>डोसा उत्तपा बनवताना पीठाची कन्सिस्टन्सी कशी हवी? दोन्हीसाठी एकच की वेगवेगळी?>>
मी तरी एकसारखीच ठेवते. मिडियम अशी.
>>समजा पीठ आंबवलं ते जास्त असेल आणि २-३ दिवसांनी पुन्हा डोसे करू म्हणलं तर ते आंबलेलं पीठ फ्रिजात ठेवावं, की वरच?>> फ्रिजमध्ये ठेव. बाहेर नको. बाहेर उकाड्याने आणखीन आंबेल आणि आंबूस वाटेल चवीला.
फ्रिजमध्ये ठेवूनही २ र्या फेरीतल्या डोसे, उत्तप्प्यांवर काही फरक पडत नाही.
Pages