Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी १किलो वोमेन horlicks
घरी १किलो वोमेन horlicks पडलयं काय करु ?
थली पिठात घतले , त्याच्या शंकर पाळ्या केल्या तरी संपत नाहीत
प्रीती ह्यात त्यात घालून का
प्रीती ह्यात त्यात घालून का संपवतेयस? दुधात घालून पी ना.
दुधात घालून छान नाही वाटत ना
दुधात घालून छान नाही वाटत ना म्हणुन
काल मी लोणी कढवायाला ठेवलं तर
काल मी लोणी कढवायाला ठेवलं तर किती वेळ ते विरघळल नाही, नंतर बघते तर जास्त चोथा होता तूप खूप कमी निघाल आणि बेरी जास्त...
अस का बर झालं असावं? साय नीट विरजली नाही का? डोक्याला शॉट झाला साला..
पावडरचं दूध मिळालं असेल तर
पावडरचं दूध मिळालं असेल तर चोथा जास्त होतो.
अमुल ताजा दुध, आणि मागच्या
अमुल ताजा दुध, आणि मागच्या वेळि तुप नीट झाल होत, याच वेळि काहितरि बिनसल
अवाकाडो कापला आणि कुस्करला कि
अवाकाडो कापला आणि कुस्करला कि थोड्या वेळाने काळा पडतो. सहसा आपण त्यात लिंबू पिळतो. पण काल इथल्या स्थानिक पुस्तकात वाचले कि, अवाकाडोची बी जर त्या मिश्रणताच ठेवली, तर गर काळा पडत नाही. फक्त आयत्यावेळी काढून टाकायची.
संक्रातीचा हलवा खूप राहिलाय.
संक्रातीचा हलवा खूप राहिलाय. काय करता येईल त्याचं?
साय नीट विरजली नाही का?>>>
साय नीट विरजली नाही का?>>> हो. लोणी काढताना दही नीट घुसळले गेले नसल्याने सायीचे तुकडे तसेच राहिले असतील.
लोणी कढवायच्या आधी धुवून घेतले नव्हते का? लोणी धुवून घेतल्याने बरेचसे सायीचे तुकडे निघून जातात आणि बेरी कमी निघते.
संक्रातीचा हलवा खूप राहिलाय.
संक्रातीचा हलवा खूप राहिलाय. काय करता येईल त्याचं?>>> मिक्सरमधून पावडर करा आणि साखरेऐवजी सगळीकडे वापरा.
लोकहो, मला मदत करा please.
लोकहो, मला मदत करा please. माझ्याकडे विकतच्या तळणीच्या मिरच्या ( वाळवून भरलेल्या असतात त्या) आहेत. पण त्यातील मसाला सगळा गळून डब्यात खाली पडला आहे. नुसत्याच पोकळ मिरच्या उरल्या आहेत
तर आता मला तो मसाला कशात वापरता येइल का ? कि मिरच्या आणि मसाला सगळेच टाकुन द्यावे लागणार ?
अयाया, काऽही टाकून देऊ नका
अयाया, काऽही टाकून देऊ नका त्या मिरच्या आणि मसाल्यातलं. मसाला फोडणीच्या वरणात घालता येतो. (तेलात घातला की लागलीच डाळ ओतायची.), दहीभाताच्या फोडणीत पोकळ मिर्च्या आणि नुस्ता मसाला असं फोडणीत घालून ते तेल ओतता येईल. बटाट्याच्या रस्साभाजीत, भेंडीच्या भाजीत, पीठ पेरून सिमला मिर्चीच्या भाजीत मसाला भन्नाट लागतो.
धन्यवाद मृण्मयी. टाकुन
धन्यवाद मृण्मयी. टाकुन द्यायचे नकोच वाटत होते. भेंडि आणि सिमला मिर्ची माझ्या मुलाला अतिषय आवडते. आता मसाला घालुन बघेन.
धन्स राजसी.. मला वाट्ले यात
धन्स राजसी.. मला वाट्ले यात तीळ असतात नाहितर चहात साखरेऐवजी घालायचे असा विचार होता.
हिरकणी, त्या मिरच्या किडल्या
हिरकणी, त्या मिरच्या किडल्या नाहीत ना याची खात्री करा. तो चुरा तसाही फोडणीला टाकता येतो. मग बाकिचे फोडणीचे जिन्नस नाही वापरले तरी चालतात.
मला वाट्ले यात तीळ असतात
मला वाट्ले यात तीळ असतात नाहितर चहात साखरेऐवजी घालायचे असा विचार होता.>>> तीळ असतात, चहा गाळायच्या आधी पावडर टाकून मग गाळायचा ....... उपासाच्या पदार्थाला ही साखर वापरू नये, तीळ उपासाला चालत नाहीत. बाकी काही problem येउ नये. शक्यतोवर चहा-कोफी, रोजचे जेवण इ.साठी वापरावे.
ओक्के राजसी...
ओक्के राजसी...
पेठा आलाय घरी एका
पेठा आलाय घरी एका मित्रांकडून.पहिल्यांदाच खातोय आम्ही,फारसा आवडत नाहिये.त्यापासून काही बनवता येइल का?प्लीज सुचवा.
इकडे पाठवुन दे
इकडे पाठवुन दे
लाजो
लाजो
>>पेठा<< खीरीत टाका वाटून.
>>पेठा<<
खीरीत टाका वाटून. छान लागेल. कोहळ्याची खीर खातील बहुतेक.
कुल्फीत/आईसक्रींम मध्ये ते थंड चंक छान लागतात.
ओह! धन्यवाद झंपी!!
ओह! धन्यवाद झंपी!!
शिल्पा ,पेठा किसुन त्यात
शिल्पा ,पेठा किसुन त्यात समप्रमाणात पनीर किसुन घालायचे .हलक्या हाताने मिक्स करायचे .थोडी काजु भरड भरुन रोल्/लाडु वळायचे.दुसरे असे कि सम्प्रमाणात मावा,खवा भाजुन किसलेल्या पेठ्यात मिक्स करुन त्याचे लाडु वळायचे..छान कमी /बेतशीर गोडाचे होतात.
मस्तच सुलेखाताई,फारच आवडले
मस्तच सुलेखाताई,फारच आवडले तुम्ही सुचवलेले पदार्थ!!!नक्कीच करून बघेन.धन्यवाद.!!!
हल्ली ज्यात त्यात पोरकिडे
हल्ली ज्यात त्यात पोरकिडे होतायत कणीक, तांदुळ, दलिया. काय उपाय?
अंजली,रवा,दलिया कोरडाच
अंजली,रवा,दलिया कोरडाच गुलाबीसर भाजुन ठेवणे.तांदुळाला बोरिक पावडर लावणे,गहु जर ठेवणीचे घेतले असतील तर पारद च्या गोळ्या कापडात बांधुन ठेवणे..ज्या पिंपात ठेवणार असाल त्याच्या तळाशी व सगळ्यात वर २ पेपर व पॉलिथीन शीट घालावी म्हणजे ओल /नमी येणार नाही.सर्व डाळी,कडधान्ये,रवा ,मैदा यात २-२ पारद च्या गोळ्या कापडाच्या चिंधीत बांधुन ठेवाव्या.पोरकिडे,अळ्या होणारच नाहीत.. औषधाच्या दुकानात "पारद" ची डबी मिळेल..
'
या गोळ्यांऐवजी तिरफळे तांदळात
या गोळ्यांऐवजी तिरफळे तांदळात / गव्हात ठेवली तरी चालते.
तांदुळात पण पारद च्या गोळ्या
तांदुळात पण पारद च्या गोळ्या बांधुन ठेवल्या तर उपयोग होईल का? बोरिक पावडर वापरायला नको वाटते.
घरी केलेला ओरेन्ज ज्युस कसा
घरी केलेला ओरेन्ज ज्युस कसा टीकवावा ?
रावी, पार्याची प्रत्य्क
रावी, पार्याची प्रत्य्क गोळी, मच्छरदाणीसारख्या कापडात बांधून तांदळात टाकायची. निवडताना काढून टाकणे सोपे जाते.
प्रिती, किती आहे रस ? बर्फाच्या ट्रे मधे क्यूब्ज करुन ठेवता येतील. जास्त असेल तर आणि काढताना पाण्याचा हात अजिबात लागलेला नसेल तर, पाकात घालून टिकाऊ सरबत करता येईल. तसा रस १/२ दिवस फ्रिजमधे टिकतो पण तो नंतर कडवट होत जातो.
Pages