Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज काळा मसाला घालून चिकन
आज काळा मसाला घालून चिकन बनवणार शमिका...
रात्रीसाठी फर्मास बेत... 
कोण शमिका?
कोण शमिका?
दक्षे, अगदी खरे सांगायचे तर
दक्षे, अगदी खरे सांगायचे तर आयते मिळत असताना, मी हे करायच्या भानगडीत
पडत नाही. आणखी एक कानमंत्र, हा मसाला भाजताना, कूटताना खमंग वास सूटतो खरा, पण का कुणास ठाऊक, मग तो मसाला घातलेला पदार्थ खायला नकोसाच वाटतो.
(प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव असेलच असे नाही.)
तो मसाला घातलेला पदार्थ खायला
तो मसाला घातलेला पदार्थ खायला नकोसाच वाटतो>>अगदी
दक्षे, शमिका म्हणजे
दक्षे, शमिका म्हणजे सेनापत्नी.
तो मसाला घातलेला पदार्थ खायला
तो मसाला घातलेला पदार्थ खायला नकोसाच वाटतो>>अगदी
अगदी... तो मसाला फक्त गूळ घातलेल्या आमटीत चांगला वाटतो. बाकी कशात नाही. ( सेनापती, चिकनचं पानिपत होईल.. दुसरं काहीतरी घाला.)
अगदी... तो मसाला फक्त गूळ
अगदी... तो मसाला फक्त गूळ घातलेल्या आमटीत चांगला वाटतो. बाकी कशात नाही. >> अरे वा म्हणजे मी केलेल्या कोणत्याही पदार्थात खपेल की
दिनेश, उद्याच घेते विकत.
ह्या जुन्या मायबोलीत मूडीने
ह्या जुन्या मायबोलीत मूडीने दिलेल्या काळा / गोडा मसाल्याच्या रेस्प्या.
मला वाटते नलिनी आणि अल्पना यांनी पण त्यांच्या रेसिपीमधेच या मसाल्याची कृती / प्रमाण लिहिले आहे
--------------------------------------------
गोडा / काळा मसाला.
साहित्य : २ वाटी धणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी सुके खोबरे कीस, प्रत्येकी १ मोठा चमचा लवंग, काळी मिरी, वेलदोडे, ८ ते १० मसाला वेलच्या, २ चमचे दालचिनी तुकडे, ५ ते ६ तमालपत्रे, १ चमचा दगडफूल, अर्धा चमचा नागकेशर, अर्धे जायफळ, अर्धा चमचा जायपत्री, हिंग, २ चमचे हरबरा डाळ, २ चमचे खसखस, २ चमचे जीरे, तेल.
कृती : थोड्या तेलावर हिंग टाकुन सर्व मसाले परतुन बाजुला काढुन ठेवावे. शेवटी खसखस, खोबरे अन तीळ भाजुन परतुन मग सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करावे.
शोनु वाटल्यास याच्यात तीळ अन खोबरे, जायपत्री नाही घातले तरी चालेल, कारण नंतर या मसाल्याला तेल सुटु शकते.
अन तिखट अंदाजाने हवे तेवढ्यात मिसळुन हलवुन घे. ओला हात लागु द्यायचा नाही.
अजुन कृती देतेच.
Moodi
Monday, May 22, 2006 - 9:00 am: Edit Post Delete Post Print Post Link to this message
ही दुसरी कृती.
साहित्य : ४०० ग्रॅम धणे, ३०० ग्रॅम तीळ, अर्धा किलो सुके खोबरे, १०० ग्रॅम जीरे, ५० ग्रॅम काळी मिरी, २५ ग्रॅम सुकी लाल मिर्ची, ५ ग्रॅम लवंग, ५ ग्रॅम, दालचिनी, २ हळकुंडे.
कृती : सर्व साहित्य थोड्या तेलात एकेक करुन भाजुन घ्यावे. सुके खोबरे कोरडे भाजले तरी चालेल. अन सर्व मसाले गार झाले की मग एकत्र करुन मिक्सरम्धुन काढावे. चांगले चाळुन हवाबंद डब्यात भरावे.
शोनु दालचिनी, मिरे, जीरे हे अंदाजाने घेतलेस तरी चालेल.
मेधा थँक्यू सो मच
मेधा थँक्यू सो मच
महिन्याभराची साय साठवलेली
महिन्याभराची साय साठवलेली आहे, डब्बा फ्रिजमध्येच होता, आता काढला बाहेर तर कडेने वरती पिवळसर थर आलाय, आतला भाग शुभ्र आहे, नासल्यासारखा वास येत नाहिय तर तुप काढण्यासाठी ही साय वापरु का वरचा थर काढुन?
वास येत नसेल तर तूप करता
वास येत नसेल तर तूप करता येईल. वरचा थर मात्र काढायचा.
पाणीपुरीचे तिखट पाणी भरपुर
पाणीपुरीचे तिखट पाणी भरपुर उरल आहे, त्याच काय करता येइल??
आमटीत घाल.
आमटीत घाल.
थोडया आंबट-गोड चवीचे करुन
थोडया आंबट-गोड चवीचे करुन अॅपिटायझर म्हणुन प्यायचे.
सुलेखा, प्यायल्याने पित्त
सुलेखा, प्यायल्याने पित्त वाढणार नाही ना?
मातीचं भांड फ्रीजमध्ये ठेवलं
मातीचं भांड फ्रीजमध्ये ठेवलं तर चालत का ?
रावी, मातीचे भांडे म्हणजेच
रावी, मातीचे भांडे म्हणजेच नैसर्गिक फ्रिज असते. पण ते कंटेनर म्हणून वापरायचे असेल (दही, कुल्फी) तर अर्थातच फ्रिजमधे ठेवले तर चालते.
हो दिनेशदा. दह्यासाठीच
हो दिनेशदा. दह्यासाठीच वापरायचे आहे.
मग बाहेर त्या भांड्यात दही
मग बाहेर त्या भांड्यात दही लावून, बाहेरच चांगले विरजले कि फ्रिजमधे ठेवायचे.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
कॉस्ट्कोतुन संत्री आणली
कॉस्ट्कोतुन संत्री आणली आहेत..अगदीच आंबट आहेत. पेपर बॅगमधे ठेवुन थोडी अजुन पिकली तर गोड होतील का जरा? नाहीतर एवढ्या आंबटढाण संत्र्याचे काय करु??
घरी ओले काजु पडले आहेत . काय
घरी ओले काजु पडले आहेत . काय करता येइल ? receipe मिळेल का ?
घरी ओले काजु पडले आहेत . काय
घरी ओले काजु पडले आहेत . काय करता येइल ?>> ओल्या काजु ची उसळ छान लागते.
सोनपरी, संत्री पिकून क्वचितच
सोनपरी, संत्री पिकून क्वचितच गोड होतात. तरीपण एक दोन दिवस ठेवून बघावीत.
नाहीतर टिकाऊ सरबत, मार्मलेड वगैरे प्रकार करता येतील. अर्थात साखर भरपूर लागेल.
संत्री आंबट असली तरी स्वादाला चांगली असतील अशी अपेक्षा आहे.
स्वस्ति, ओले काजू कुठल्याही मसाला भाजीत / आमटीत (भरली वांगी, मसूर ) घालता येतील. मी दिलेला गावरान रस्सा करता येईल. ओल्या काजूच्या उसळीचे,
दोन तीन प्रकार आहेत इथे.
ओले काजु, थोड्या मिठाच्या
ओले काजु, थोड्या मिठाच्या पाण्यात वाफवुन वरतुन हवे तर लाल तिखट भुर्भुरवुन खायचे.... यम्मी लागतात. चाट मसाला ही ट्राय करु शकता
ओल्या काजूची उसळ चांगली होते.
ओल्या काजूची उसळ चांगली होते.
ओल्या काजु ची उसळ छान
ओल्या काजु ची उसळ छान लागते..........................
swasti > मागे मी
swasti >
मागे मी (http://www.maayboli.com/node/13348) ही काळ्या वाटाण्याच्या उसळिची रेसेपी दिलेली. तशिच ओल्या काजुची उसळ पण छान लागते. त्यात बाटाटा घालायचा असतो. पक्त वाटाणे शिजवुन घ्यायची स्टेप कट. डायरेक्ट काजु बाटाटा घालुन पहील चांगल शिजवुन मग वाटप घालायच. टॉमॅटो एवजी सोल वापर.
मी डब्यातून रोज कसलीतरी
मी डब्यातून रोज कसलीतरी कोशिंबिर आणते. समजा एखाद्या दिवशीच म्हणजे मोस्टली रविवारी गाजर्/बीट्/काकडी यांचा किस करून हवाबंद डब्यात घालून फ्रिजात ठेवला तर आठवडाभर आलटून पालटून वापरता येईल का?
नको द्क्षीणा. कोशिंबिरी
नको द्क्षीणा. कोशिंबिरी फ्रेशच खाव्यात.
Pages