युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा धन्स, हो ते खराब नव्हते झाले पण तो हिरवा रंग बघुन माझी ती पेस्ट वापरायची ईच्छा नाही झाली

दक्षिणा मी २ लसुणाच्या गड्ड्याला जवळपास दिड बोट भर आल घेते (पण इथे लसुण आणि आलं दोन्ही आकारने खुप मोठठ मिळत आणि आपल्याकडे असते तशी चव नसते)

मला आलं फारसं आवडत नाही>> तस असेल तर आल्याची वेगळी आणी लसुणाची वेगळी पेस्ट कर ना सोप्प जाईल वापरायला ..ज्यात जस पाहिजे तर वापर हाकानाका Happy

मी तर नेहमीच कोरडे खोबरे किसुन घट्ट झाकणाच्या डब्यात (टपरवेअर) फ्रिज मध्ये ठेवते. डिप फ्रिज मध्ये नाही. तरी चांगले टिकते. खवट होत नाही. मी पुण्यात असते.

आल-लसणाची पेस्ट (एकत्र किंवा वेगवेगळी) टिकवण्यासाठी त्यात आणखी काही घालायचे असते का? मीठ, व्हीनेगर वगैरे.

मी पण नेहमी सुक, ओल दोन्ही किसुन वेगवेगळ्या लॉक अन लॉकच्या डब्ब्यात फ्रीजमध्ये ठेवते. ओल खबर तर अगदी ८-१० दिवसही चांगल राहत. प्रत्येक वेळी पाहिजे असेल तितके वाटीत काढ्नुन घेऊन बाकी डब्बा लगेज फ्रिजमध्ये ठेवायचा. मी वरवरच सफेद खोबर भाजी, वरणात वापरते व शेवटच तांबुस खोबर भाजुन वाटणात वापरते ते ही खुप टिकत.

माझा नविन प्रश्न...
मावेत स्टँडींग टाईम ही नक्की काय भानगड आहे? Uhoh
समजा पदार्थ गरम करून झालाय, टायमर ऑफ झालाय तरिही भांडं आतच ठेवणे म्हणजे स्टँडिंग टाईम का? त्यावेळेला मेन स्विच ऑफ ठेवायचा असतो की ऑन? Uhoh (प्रश्न मुर्खासारखा वाटत असेल तर प्लिज माफ करा :()

दक्षिणा, बरोबर! त्यालाच स्टँडिंग टाईम म्हणतात.
मावेमधे उच्चतापमानाला पदार्थावर प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्या पदार्थाचे तापमान कमी करण्यासाठी स्टँडींग टाईम द्यावा लागतो.
आता मेन स्विच ऑन ठेवायचा की ऑफ त्याचं उत्तर तुला आपोआप मिळेल.

मंजू अजून एक झटपट उत्तर दे, सुकं खोबरं, धणे, जिरे भाजून त्याचा मसाला करायचा आहे मला, तर ते सगळं मावेत भाजता येईल का? येत असेल तर किती पॉवर वर किती वेळ?
तसंच, रवा, शेंगदाणे भाजायचे असतील तर किती वेळ ठेवू?
मावेत चहा कसा बनवायचा?

आजकाल रात्री चहा प्यायचं व्यसन लागलंय मला Sad उठुन भांडं घासायचा कंटाळा येतो Sad त्यामुळे.

आल-लसणाची पेस्ट (एकत्र किंवा वेगवेगळी) टिकवण्यासाठी त्यात आणखी काही घालायचे असते का? मीठ, व्हीनेगर वगैरे>>>मीठ आणि तेल घालायचे वाटतानाच रंग आणि वास दोन्ही टिकुन राहते by the way साक्षी कशी आहेस...........??!!

दक्षिणा, सुका मसाला भाजायला दोन मिनिटे मिडीयम वर पुरी होतात. पण तूझ्या मावेची पॉवर किती आहे, व मसाले कितपत दमट आहेत त्यावर ठरेल. असे भाजून झाले कि बाहेर काढायचे आणि जरा वेळाने एखादा धणा चावून बघायचा. तो खटकन तुटला पाहिजे, नाहीतर परत अर्धा मिनिट ठेवायचे.

रव्यालाही मिडीयमवर दोन मिनिटे पुरेत, पण दर अर्ध्या मिनिटाने, लाकडी चमच्याने ढवळ. दाणे दोन ते चार मिनिटे (आकार आणि किती भाजायचेत त्यावर ठरेल) दाणे लगेच तोंडात टाकू नकोस खुप गरम झालेले असतात. दाणे भाजताना वर रुमाल वा नॅपकिन ठेवणे आवश्यक आहेत. दाणे उडतात. डिशच्या कडेच्या दिशेने पण एकाच लेयरमधे ठेव.

चहाला (कपच्या आकारानुसार ) ४५ सेकंद पुरतील. पण चहात दूध घालू नकोस. बाहेर येईल. बाकिचे जिन्नसही उसळू शकतात. आधी पाणी व चहा गरम केलेस, आणि
बाहेर कप काढून साखर घातलीस तरी ते फसफसून वर येते. त्यामुळे जपून.
जाड व उंच काठाचा कप घेत जा.

साध्या चहापेक्षा, हर्बल टि, ग्रीन टी यांची सवय लावून घे. (आता आपल्याकडे मिळत असावेत. )

आलं-लसुण पेस्ट टिकवण्या साठी मी त्यात तेल टाकते वरुन..

मावेत चहा कसा बनवायचा?>> मी असा करते- एका फुल कप चहा पाहिजे असेल तर -- एका कपात ३/४ पाणी आणि टि bags घेउन मावे मधे उकळे पर्यंत ठेवायच (साधारण दिड मिनिटात उकळी येईल), मग बाहेर काढुन त्या मधे १/४ दुध घालायच परत मावे मधे ठेवुन थोडस गरम करायच (साधारण ३० सेकंद) (उकळायची गरज नाही आता). बाहेर काढुन त्यात लागेल तेवढी साखर घालायची. झाला २ मिनिटात चहा तयार!!
फ्लेवर्ड करायचा असेल तर पाणि उकळतांना आलं/दालचीनी/ विलायची (ह्या पैकी काहिपण) घालु शकतेस. ते नंतर सहज चमच्याते बाहेर काढु शकतो..
गाळायची गरज नाही आणि धुवायला फक्त एक कप Happy

दिनेशदा काय टायमिंग आहे Happy
साखर घातलीस तरी ते फसफसून वर येते>> हो म्हणुनच साखर सगळ्यात शेवटी आणि जपुन टाकायची

माधुरी आणि दिनेश. थँक्स करून पाहिन. खरंतर रात्री चहा प्यायची सवयच मोडायची आहे. असो.. काल प्यायले नाही. Happy

अजून एक प्रश्न विशेष करून दिनेश यांना - काळा मसाला म्हणजे नक्की काय? Uhoh तो घरी कसा करतात? किंवा विकत मिळतो का असा स्पेसिफिक? Uhoh समजा घरी केला तर किती प्रमाणात करायचा? वर ठेवायचा की फ्रिजमध्ये?
गोडा आणि गरम माहीत आहे. काळा माहीत नाही. Sad

दक्षे आमच्याकडे गोडा मसाला कधीच नसतो. फक्त काळा मसाला असतो. वर्षभराचा एकदम केलेला. त्यात कांदा , खोबरे पण असते. तुला हवे असेल तर मी साबांना विचारुन प्रमाण देइल Happy

वर्षा, प्रमाण देईलच.
माझ्याकडे मुंबईत मिळणारी, मसाल्याची पाकिटे असतात. इथल्या हवेत ती टिकतात.
मुंबईत मात्र फ्रिजमधेच ठेवतात.
माझी स्वत:ची पद्धत म्हणजे, माझ्याकडे मसाल्याचे सर्व जिन्नस कायम संग्रहात असतात, आणि आयत्यावेळी ते भाजून पूड करतो. हि फारतर दोन वेळा वापरता येईल, एवढ्याच प्रमाणात. अशा आयत्यावेळी केलेल्या मसाल्याची चव अप्रतिम लागते.
(आणि दरवेळी वेगवेगळी पण. )

दक्षे, चहा मावे मधे करणार असशिल तर तो करायला मायक्रोव्हेवेबल काचेचा जग/ पायरेक्सचा मेजरींग जग किंवा मोठा मग वापर आणि तयार चहा नेहमीच्या कपात ओत. डायरेक्ट तुझा कप मावेत ठवलास तर कप तापण्याची शक्यता आहे. मोठा जग असेल तर चहाची पावडर घालुन सुद्धा उकळलेला चहा करता येइल.

माझ्याकडे मसाल्याचे सर्व जिन्नस कायम संग्रहात असतात, >> दिनेश, म्हणजे नक्की कोणते? Uhoh
काळ्या मसाल्यात स्पेसिफिक काय काय घालावे?
तुम्ही पण सांगा वर्षा पण सांगेल. दोन्ही करून पाहिन.
सोप्पं सांगा बै, जास्ती जिकिरिची रेस्पी नको. Proud

मिरी, वेलची, दालचिनी, जिरे, शहाजिरे, मोहरी, खडा हिंग, धणे, तीळ, जायफळ - हे नेहमी लागतात.

तामलपत्र, जायपत्री, मसाला वेलची, खसखस, तिरफळे, नाकेश्वर, केशर, दगडफूल हे खास पदार्थांना लागतात.

काळा मसाला / संडे मसाला बाजारात तयार मिळतो. चांगला असतो तो.
(घरी करायला प्रमाण बघावे लागेल !)

दिनेश
काळ्या मसाल्यात तुम्ही वर सांगितलय ते सगळं घालायचं का? Uhoh
माझ्याकडे रूचिरा चे २ भाग आहेत अजून वर वरच चाळलेत. त्यामुळे त्यात काळ्या मसाल्याची रेसिपी आहे का ते आज पाहते.

दक्षिणा, स्वाती आंबोळेची गोडा मसाल्याची कृती आहे बघ. छान होतो मसाला. मला इथे मिळत नाही म्हणून मी करून ठेवला आहे.

तसंच, काळा मसाला तुला आरामात विकत मिळेल. पुण्यात तर मिळेलच मिळेल.

नाही दक्षिणा, ते वेगवेगळे वापरायचे. मला सरसकट एकच मसाला सगळ्या भाज्यांत नाही आवडत. म्हणून इकडे/तिकडे करुन वेगवेगळी चव आणायचा प्रयत्न करतो.

संत्र्याचा जॅम, मुरंबा, मार्मलेड, बर्फी, भात असे बरेच प्रकार करता येतील. (बहुतेक
प्रकार आहेत इथे.)

अहो दिनेश मग एखाद्या प्रकारच्या काळ्या मसाल्यात काय काय घालू ते सांगा ना.. या वीकेन्डला करून पहायचा प्रयत्न करणार आहे.

दक्षे, कुण्णी कुण्णी नाही सांगितलं तर जवळचे मसाले भाजभाजून काळे कर आणि मिक्सरमधून काढ Proud Light 1
अगं दिनेशदा म्हणाले ना संडे मसाला म्हणजे काळा मसाला ! जा वाण्याकडे आणि घेऊन ये. हाकानाका.

अगं अस्वे विकत आणायला हरकत नै ग, पण मला करून पहायचा आहे.
(याला म्हणतात दांडगी हौस :फिदी:)
दिवे वगैरे नकोत मला छेछे Blush

Pages