नववर्षाच्या शुभेच्छा !

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं. मग आम्ही गेल्या वर्षभरात तसेच आधी काढलेल्या फोटोंपैकी १२ बरे फोटो निवडले. तारखांची जमवाजमव केली आणि कॅलेंडर बनवून घेतली. आत्तापर्यंत ज्यांना दिली त्यांनी गोड मानून घेतली आहेत. ज्यांना अजून द्यायची आहेत, त्यांना ती आवडतील अशी अपेक्षा आहे. Happy
तर तुम्हासगळ्यांना आमच्या तर्फे नववर्षाच्या ह्या रंगीबेरंगी शुभेच्छा !! येणारे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !!

जानेवारी :
01 January.JPG

फेब्रुवारी :
02 February.JPG

मार्च :
03 March.jpg

एप्रिल :
04 April.JPG

मे :
05 May.JPG

जून :
06 june.JPG

जुलै :
07 July.jpg

ऑगस्ट :
08 August.jpg

सप्टेंबर :
09 September.JPG

ऑक्टोबर :
10 October.jpg

नोव्हेंबर :
11 November.jpg

डिसेंबर :
12 December.jpg

विषय: 

पराग, आयडिया, थीम आवडली. सगळे फोटोही आवडले एक ऑक्टोबरचा सोडून. तो खूप क्लिअर आल्यासारखा वाटत नाहीये आणि त्याहीपेक्षा सुंदर फोटो कॅलेंडरमध्ये असू शकला असता असं वाटलं.

अरे वा मस्त आहे कल्पना. मला कॅलेंडर मिळाले तर गोड मानून घेइन बर्का Proud

तुम्हा दोघांना सुद्धा नववर्षाच्या शुभेच्छा !!!

मस्तरे ! जूनचे चित्र ऑरेगनमधले आहे ना? कॅनन बीच?
तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा !

सायो.. अ‍ॅग्रीड.. Happy आम्ही काढलेला एकही फॉलचा फोटो आम्हांला आवडला नाही. .. Sad हा मी मोबाईलमधून काढला होता.. तो थोडा क्रॉप केला खालून .. अ‍ॅक्चुअल साईजमध्ये तो अपेक्षेपेक्षा चांगला दिसतो तो..

सिंडे.. धन्यवाद.. Happy अटलांटा ट्रिप कॅन्सल केली नसतीस तर........... Proud

नंद्या.. हो तो..कॅनन बीच.. कॅप्शन टाकलय बघ फोटोवर.. फार सुंदर आहे तो बीच.. !

सुनिधी, तो यलोस्टोन नॅशनल पार्क मधला लोअर फॉल्स आहे. आणि फोटो कॅनियनमधून काढला आहे.
बित्तू, धन्यवाद Happy

ऑगस्ट आणि नोव्हेंबर सर्वात जास्त आवडला. सही आहे 'आयडीया' ची कल्पना. नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.

भन्नाट थीम, पराग Happy
मला सगळ्याच महिन्यांचे फोटो आवडले Happy सुरेख कल्पना.

मला कॅलेंडर मिळाले तर गोड मानून घेइन बर्का>>>>>>मी पण Proud

नुतनवर्षाच्या तुला आणि तुझ्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा !

मस्तच कल्पना Happy सगळे फोटो आवडले.

कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. >>> लोकंसुध्दा बिझिनेसच्या काय काय आयडिया शोधून काढतात !!

सहीच. फोटोज मस्त आहेत. कप्स वगैरेंवर फोटो आता भारतात पण मिळतात पण स्पेशल डेज मार्क करायची आयडिया भन्नाटच. आणि नवर्षाच्या शुभेबर्का:)

नवीन वर्षाच्या शुभेच्छा! Happy छान कल्पना.
स्नॅपफिश इ. फोटो प्रिन्ट करुन देणार्‍या वेबसाईट्सही अशी कॅलेंडर, कार्ड्स इ. बनवून देतात. तिकडे अपलोड करायचे फोटो.
कॅलेन्डर आम्हाला मिळणार आहे का? Happy

सगळेच फोटोज फार सुंदर आहेत. ज्यांना मिळतील कॅलेंडर्स ते खूप खूश होतील ह्यात शंकाच नाही Happy

लालूला अनुमोदन. माझ्या बहिणीच्या पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीला तिला असेच त्या दोघांचे फोटो निवडून कॅलेंडर आणि दोन मग्ज पाठवले होते आम्ही. कोडॅकगॅलरीच्या साईटवरुन घेतले होते ते.

Pages