मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान

इंद्रधनुष्य

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तुला कुणी सांगितलं होतं रे,
अंधार रेखाटायला...?
आणि इतर सगळ्यांना दिसला,
तसा..तुला तो काळाकुट्ट का नव्हता दिसला?
की सगळे रंग तुझ्या नजरेतच आले होते वस्तीला..?
तसंच असणार..
सगळं जगच रंगीत दिसत असणार मग तुला..
आणि तू स्वत: ?
तुझा रंग कोणता दिसला होता तुला?
आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला,
तू एकटाच असशील.. हो ना?

प्रकार: 

नाव नाही.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सहर का टूटा हुआ तारा लगे
अब तो ये दिल और बेचारा लगे..

जिंदगी हैरान है ये सोचकर
क्यूं किसीको मौत भी आसां लगे

रात कि तनहाईमे जब शाम डूबी
'सुबह होगी', ये भी इक वादा लगे

भीड से घेरा हुआ हर शक्स है
फिर भी हर कोई यहा तनहां लगे

ठोकरे खाता फिरे वो दर बदर
जिंदगी के बोझ का मारा लगे..

----------------------

न रुठ हमसे इतना भी साकी...
के जिंदगी लगे, जैसे सजा कोई बाकी

प्रकार: 

बहाने..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मेहफिल के हुए ना..ना तुम्हारे हुए,
औरों के क्या हो? ना हम हमारे हुए ..

सपना ही होगा..सपना ही था वो
कुछ पल साथ हमने गुजारे हुए ..

गैरोंसे क्यूं हम शिकायत करे
अपनों के भी हम ना प्यारे हुए

के तुफां से रिश्ता गहरा है इतना
बडे दूर हमसे किनारे हुए ..

वो समझे ना हमको.. गहराइओंको..
छोडो भी, ये बस बहाने हुए ..

प्रकार: 

पाऊस

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(सगळ्या कविता लिहीणार्‍यांनी आणि न लिहीणार्‍यांनी पण पाऊस पडायला लागला की एखादी तरी कविता पावसावर लिहीलीच पाहीजे असा एक नियम आहे. नियमाच पालन झालच पायजे Happy )

पाऊस,
कधी सरकारी नोकर,
त्रयस्थपणे पाणी शिंपडून,
कर्तव्य बजावून जातो..

पाऊस,
कधी हळवा प्रियकर,
हळूवारपणे तासनतास,
रेंगाळत राहतो..

पाऊस,
कधी जिवलग मित्र,
संध्याकाळच्या हळव्या क्षणांना
सोबत करत राहतो, मुकपणे..

प्रकार: 

ती आणि तो..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

त्याचं नदीशी नातं खूप जुनं. म्हणजे अगदी रोज नाही, तरी नियमितपणे तो इथे नदीकिनारी येऊन तासनतास रेंगाळायचा. आपली सुख दु:ख हक्कानी या नदीशी बोलायचा. धीरगंभीरपणे नदी सगळं पहायची ऐकुन घ्यायची. कधी एखाद्या खळाळत्या लाटेनी कोपरखळी मारुन त्याला हसवायची देखील. नदीची आठवण त्याला छळायची. खूप दिवसात नाही यायला मिळालं किनार्‍यावर की बेचैन व्हायचा तो.

प्रकार: 

तू आणि मी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा रुजेन मी
मातीतून तरारणारा
कोंब होऊन बहरेन मी

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा फुलेन मी
तुझ्या डोळ्यात पाहता पाहता
तुझ्याआत उतरेन मी

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा हसेन मी
हसता हसता कुशीत शिरुन
तुच होऊन जाईन मी

प्रकार: 

वेषांतर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे दाटून आले नभ की,
ओघळले काजळ आहे..
वेषांतर करुन आले,
पण जुनेच वादळ आहे..

अश्रूंना समजावून तू,
जा परत धाड तू आता..
कधी न पाझरणारा,
असला तो कातळ आहे..

संकोच नको वचनांचा,
संकोच नको घटनांचा..
परत न येणे आता,
झरला जो ओघळ आहे..

प्रकार: 

असंच काही

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तो भेटून जातो..पेरुन जातो मनात माझ्या काहीबाही
कविताही अशी अचानक शून्यातून उगवत नाही...

प्रकार: 

स्फोट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तो आग ओकून गेला,
आणि आपण जळत राहीलो..
तो पश्चात्ताप करावा... की न करावा...
याचा विचार करत राहीला
जळणार्‍याला पर्याय नसतोच म्हणून,
आपण दु:ख करत राहीलो
अजूनही त्याचं नक्की ठरलं नाहीये,
त्यानं केलं ते चुक की बरोबर ते..
आपल्याला मात्र अजून कळत नाहीये
आपलं नक्की काय चुकलं..?

प्रकार: 

कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कधी तरी हळूच
मनात एक ओळ रुजते..
दुसरी मग आपसूक येऊन
ओठावर अलगद रुळते..
तिसरी मात्र हुषार..
ती येतानाच कागद पेन घेऊन येते
एक दोन तीन चार..
कितीतरी ओळी कागदावर झरतात
त्यालाच आपण कविता म्हणू यात
किंवा म्हणू यात काहीही
तसं त्याला आता फारसं महत्व नाही..

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान