वेषांतर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

हे दाटून आले नभ की,
ओघळले काजळ आहे..
वेषांतर करुन आले,
पण जुनेच वादळ आहे..

अश्रूंना समजावून तू,
जा परत धाड तू आता..
कधी न पाझरणारा,
असला तो कातळ आहे..

संकोच नको वचनांचा,
संकोच नको घटनांचा..
परत न येणे आता,
झरला जो ओघळ आहे..

प्रकार: 

पण अर्धवट वाटली.. - > हो अर्धवटच आहे ही... अधुरी एक कहाणी म्हणू यात Happy

बाकी धन्यवाद!