इंद्रधनुष्य

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तुला कुणी सांगितलं होतं रे,
अंधार रेखाटायला...?
आणि इतर सगळ्यांना दिसला,
तसा..तुला तो काळाकुट्ट का नव्हता दिसला?
की सगळे रंग तुझ्या नजरेतच आले होते वस्तीला..?
तसंच असणार..
सगळं जगच रंगीत दिसत असणार मग तुला..
आणि तू स्वत: ?
तुझा रंग कोणता दिसला होता तुला?
आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला,
तू एकटाच असशील.. हो ना?

प्रकार: 

सही Happy

वाह!!!
आवडलंच!!
u knw what, ह्या तुमच्या ओळी काय किंवा मुक्ताने लिहिलेलं काय, त्यांच्या चित्रावर आधारित असण्या / नसण्यामुळे त्यांचं अस्तित्त्व अजिबात उणावत नाही.. त्या चित्राशीही तितक्याच जुळलेल्या वाटतात आणि स्वतंत्रही तितक्याच भावतात..
अभिनंदन!
Happy

व्वा... ग्रेट..! भारीच...

आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला,
तू एकटाच असशील.. हो ना?>> माझं प्रोफाईल पिक्चर पहा... Lol