मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान

सूर्य

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सकाळ होता.. जागला सूर्य
पानोपानी.. गोठला सूर्य
नदीतून.. वाहीला सूर्य
चुलीतून.. चेतला सूर्य
भाकरी.. भाजू लागला, सूर्य
निरांजनी.. तेवला सूर्य
दिवस सरता.. थकला सूर्य
थकला भागला.. विझला सूर्य

प्रकार: 

डायरी..तीची-३

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तिसरीत आल्यापासून मी आणि मोरे शाळेत बरोबर जातो. मोरे माझ्याच वर्गात आहे, जवळच राहते. मोरेचं घर पण एका खोलीचं आहे पण ती वेगळीच आहे. ती खूप हसते. दंगा करते. आज शाळा सुटल्यावर मी आणि मोरे येत होतो. तर एक माणूस गाडीवर लाल रंगाची फळं विकत होता.
कोकऽऽम..!
कोकम? म्हणजे काय ..? मी विचारलं
अगं मस्त फळ आहे, तू खाल्लं नाहीस कधी? मी गाडीकडे बघतबघत 'नाही' अशी मान डोलावली
पुढे आल्यावर "नीलम" च्या दुकानाशी मोरे एकदम खूप हसायला लागली ती नेहमीच अशी खूपच हसते. मी पहातच राहीले
काय झालं? का हसतेस उगीच?
तीनी तीचा हात माझ्यासमोर धरला हातातला रुमाल उलगडला आणि त्यात कोकऽऽऽम..

विषय: 
प्रकार: 

यंत्र

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या आसपास आहेत माणसं..
छे! ही चालतीबोलती यंत्र
हसणारी, चालणारी, धावणारी, बसलेली..
स्वतःच्या प्रेमात स्वतःच फसलेली..
गल्लत करु नका..
फार फार वर्षापूर्वी याच ग्रहावर माणसं होती
अगदी, अगदी.. याच यंत्रांसारखी दिसणारी
चिडणारी, बोलणारी, लढणारी, जाणणारी..
पण ही यंत्र..नीट पहा या यंत्रांकडे..
वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरलेली
जगण्याचं कारणच विसरलेली
प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली
पण हुशार आहेत...
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध समर्थन देण्याचं.
यांनाच जमलंय तंत्र
माझ्या आसपास आहेत माणसं..

विषय: 
प्रकार: 

१०२४ सदाशिव..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अशीच एक ऑफीसमधली मिटींग चालली आहे. मला ना एक अतिशय वाईट सवय आहे, हाताला सतत चाळा लागतो. कुणीतरी जे बोलतंय, ते ऐकता ऐकता मी हातातल्या डायरीमधे काहीतरी उगीच रेघोट्या मारतेय.

प्रकार: 

सहज

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

एकाच मातीतून उगवणार्‍या दोन अंकुरांच एकमेकांशी नातं काय? त्यांच्यात सुद्धा असतील का नाती.. भाऊ, बहीण अशासारखी. पण मग ते जितके आनंदी दिसतात तितकेच दिसले असते का?

विषय: 
प्रकार: 

भयकथा - STY

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चाफ्याने गडावर काल एका भयकथा STY ची सुरुवात करुन दिली होती... गडकर्‍यांनी आपापल्या पोस्टचा रतीब घालून आज दिवसअखेर इथपर्यंत कथा आली आहे. ... आता वाहून जायला नको म्हणून इकडे लिहू यात..

कथेचं नाव - काळरात्र.. Happy
_____________________________________

विषय: 
प्रकार: 

या उसळणार्‍या रक्ताच्या..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

या उसळणार्‍या रक्ताच्या नानाची टांग..
कळत कसं नाही याला 'इतकं' सुद्धा सांग?

तुरुंग सोडून शिबू, पप्पू बाहेर हे येणारच.
नव्यांसाठी तुरुंगात जागाही होणारच.
साला शिंपल लॉजिक, यात अवघड काय सांग?
या उसळणार्‍या रक्ताच्या..

प्रकार: 

एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आजची सकाळ म्हणजे तसं पाहिलं तर अगदी नेहेमीसारखीच सकाळ. सिद्धार्थला शाळेत पाठवायचंय, आवरुन काकांकडे पूजेला जायचंय या विचारात उठून आवरायला सुरुवात केली.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान