मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान

उघडीप

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

आज पुन्हा उघडीप आहे.. थोडी थोडी
उन्हाचीही तिरीप आहे.. थोडी थोडी
पुन्हा मळभ येण्याआधी
झुळूक दूर जाण्याआधी
चल, जमवून घेऊ मैफल .. थोडी थोडी

(सहज सुचलेल्या चार ओळी..)

प्रकार: 

उसवण

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

मी विणलेल्या नात्यांची वीण,
उसवत जाताना..
उसवत जातं.., माझ्या आतही काही..
तुटलेले काही धागे.. आणि जीर्ण काही..
भकासपणे त्यांच्याकडे पाहताना,
मी म्हणाले "आता थांबवायलाच हवंय वीणकाम,
आणि नको आटापिटा, ठीगळ लावण्याचाही.."

प्रकार: 

मी आणि कविता

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

मायबोलीवर मी यायला कारणीभूत झाला तो विभाग म्हणजे 'गुलमोहर' आणि त्यातही खरं म्हणजे 'कविता'. सहज गुगलवर शोधता शोधता मायबोलीचं कवितांचं पान सापडलं आणि तिथे येता येता मग हळू हळू सर्वत्र संचार सुरु झाला.

विषय: 
प्रकार: 

पहिल्या पानावर...

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

आज रंगीबेरंगीत एक तरी पान लिहावं, असा विचारच करत होते. शाळेत असताना नवी कोरी वही मिळाली की पहिल्या पानाचं कोण अप्रूप वाटायचं!

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान