साहित्य

तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..

Submitted by श्रीगणेशा on 24 May, 2017 - 05:11

'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!

डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!

एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!

'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!

पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!

एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!

गणेश शिंदे दुसरबीडकर

भावनांक वाढवता येतो का? मुले आणि आपण ( भाग३ )

Submitted by द स्मिता on 23 May, 2017 - 08:48

भावनांक वाढवता येतो का ?

पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

परिस्थितीजन्य कोडे (मनातील कथा ओळखा)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 04:12

मायबोलीच्या मित्र मैत्रिणींना नमस्कार.
आज जरा एक हटके चॉलेंज घेऊन आलोय.

माझ्या ५० सुक्ष्मकथा या धाग्यावर मानव पृथ्वीकर सरांनी एक कल्पना मांडली होती. ते म्हणाले होते की Situation Puzzle वर कथेच्या दृष्टीकोनातून एक धागा काढा. तेव्हापासून ही कल्पना डोक्यात आहे. मधे जरा विसर पडला होता. परवादिवशी अक्षयने आठवण करून दिली अन एकदाचा हा धागा काढला.
परिस्थितीजन्य कोडं म्हणजे काय भानगड आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. सांगतो.

शब्दखुणा: 

पाऊस

Submitted by shuma on 21 May, 2017 - 12:53

आजचा पाऊस
फारा वर्षांनी
पुन्हा तुझा माझा
कोसळत राहिला
बाहेरही अन आतही
काचांवर अन खाचांतून
डोळ्यांच्या अविरत ...
सारे थेंब ओथंबलेले
सावरलेले आजवर
निसटले न जुमानता
माझ्याच नजरकैदेतून
ऐकूआली टपटप
तुलाही दूरवर
माझ्याही नकळत
ओघळलेल्या सरींची
सावरले परत क्षण सारे
आवरत पसारा थेंबांचा
त्यातील काही थेंबांवर मात्र
हक्क तुझाही होता

शमा

अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी

Submitted by आनन्दिनी on 16 May, 2017 - 21:14

ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं.

कथुकल्या ७

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 May, 2017 - 04:24

१ . मायावी

माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.

अंगाई.... चांदोमामा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2017 - 03:03

चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान

चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे

चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल

डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना

डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....

प्रवासी

Submitted by पुरंदरे शशांक on 9 May, 2017 - 06:45

प्रवासी

ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?

शब्दखुणा: 

कथुकल्या ६ ( गूढ, रहस्य विशेष)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 6 May, 2017 - 06:26

१. शेरलॉक अन फाशीचा दोर

टॉक... टॉक… टॉक… टॉक

काळ क्षणाक्षणाला पुढे सरकत होता, मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येत होता. सेकंदकाटा आपल्या काळजावर आघात करतोय असं शेरलॉकला वाटत होतं. अर्थात याची त्याला सवय होती. स्कॉटलंड यार्ड त्याला बऱ्याचदा उशीराच बोलवायची. कित्येक केसेस त्याने शेवटच्या काही क्षणांत सोडवल्या होत्या. आजही तसं होऊ शकलं असतं.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य