नातीगोती

तडका - आमचे संविधान

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मुंबई पुणे व्हाया लोणावळा

ती या ब्लॉग सीरिज मधला दूसरा ब्लॉग- मुंबई पुणे व्हाया लोणावळा

लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती.....

लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...

आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….

someone

तो द्विधा मनस्थितीत तासाचा प्रवास करुन त्या जागी आला."बऱ्याच दिवसांनी आलास" असा खोचक प्रश्न मरीन ड्राइव्हच्या खड़काने त्याला विचारला.दोन मिनिट अवाक् झाल्यावर जोरात आलेल्या लाटेने जणू कानफडात मारली आणि पुन्हा त्या प्रश्नाची आठवण करुन दिली!बाजुच कपल जरा जास्तच रसिक झालेल. तिथल्या वाऱ्याचं हे एक फार भारी असतं,स्वत: सगळयाशी एकटा भिड़तो पण तिथल्या जोडप्यांना एकमेकांशी अंतर्मुख भिडवतो!"काय रे इतक्या दिवसांनी आलास तरी माझ्याशी अजून काहीच बोलला नाहीस",खवळलेल्या समुद्राने शांत पणे विचारलं!

टॅहॅ

"वैनी, पोरगं रडतयं"
"आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी"
"आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं"
"तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन"
"बाला, खुलकुला दीव का तुला"
"ई~या, ई~या"
"मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय"

"मोठ्या आयं, बाळ रडतयं"
"हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं"
"च्तु च्तु च्तु, छौ छौ"
'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला? आरं हा~ड की"
'मुंगी बिंगी आसल तर बगावयं कुटं"
"काय बाई, ह्या बायांचं आजिबात ध्यान नसतयं गय"
"ई~या, ई~या"
"भया, आण्णा हायतं का बघ रं कुटं, त्येंच्याकडं गेल्यावर ऱ्हायलतरी"

तडका - घरची लक्ष्मी

घरची लक्ष्मी

मानवी जातीला घातक अशा
मानवी भावना ठरल्या आहेत
अन् मुलीचा हेवा करून इथे
कित्तेक स्रिया मारल्या आहेत

स्री जातीचा हेवा करणे
हि गोष्टच अवलक्षणी आहे
आई-आजी,बहिण-मुलगी
हिच घरची लक्ष्मी आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सहजीवनातील गोडवा

मे महिन्यातील एक टळटळीत दुपार. एका घरगुती कार्यक्रमासाठी पाहुण्यांकडे गेलो होतो तिथे माझी मावशी सुद्धा आलेली. घरी परतत असताना तिने तिच्याकडची एक पिशवी मला दिली आणि सांगितले की यात कैऱ्या आहेत आईला म्हणावे लोणचे घाल. मी पिशवी घेतली आणि उघडून पहिले तर आत गडद हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या कैऱ्या. त्यांच्या रंग-रूपावरून खूप आंबट वाटत होत्या. कदचित म्हणूनच त्या लोणच्यासाठी वापरायला सांगितल्या असे वाटून मी ती पिशवी तशीच गाडीच्या डिकीत ठेउन घरी आलो. घरी आल्यावर डिकीत कैऱ्यांची पिशवी आहे हे विसरून देखील गेलो. असेच दोन दिवस गेले आणि गाडीत बसल्यावर गोडसर वास येऊ लागला.

झोंबाड

आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला.

शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं.
"आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो.

सुटका

सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?

पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.

तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.