संगीत

स्वर माधुरी

११ जुलैला वेद शास्त्रोत्तेजक सभागृह येथे सांयकाळी ६ ते ९ ह्या वेळेत माझा काका.. श्री नरेंद्र कुलकर्णी ह्याच्या नवीन शास्त्रीय संगीताच्या सीडीचा प्रकाशन सोहळा तसेच गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. आणि ह्या सगळ्याचे निमित्त आहे... आजोबांचा म्हणजेच श्री. म.ना.कुलकर्णी (मनाकु१९३० ) ह्यांचा ८० वा वाढदिवस... तेव्हा ज्यांना शक्य असेल त्या सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण....

ठिकाण/पत्ता: 
वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, सणस क्रीडांगणा समोर, सारसबागेजवळ, पुणे ९.

पाऊस गाणी

0

पाऊस पडायला लागल्यावर आपल्या मनात रुंजी घालतात ती असंख्य पाऊस गाणी! अशीच नवी जुनी पाऊसगाणी मला माझ्या संग्रहासाठी हवी आहेत, त्यात अगदी संगितातल्या चीजा सुद्धा चालतील! कुणाला माहीती असल्यास इथे नक्की लिहा,
उमड धुमड गरजे बरसे री
आयी बदरीया सावन कारी
सखी जियरा थरथराये री |
निस अंधीयारी चमके बिजुरी
गरजन सुनी हो पपीहा बोले
और मुरवा शोर मचाये
उमड घुमड गरजे बरसे री ||

असा करुया आनंद साजरा!

0

समजा, आपल्याला एखादा समारंभ करायचा आहे, पण तो साजरा करण्यासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील याची मायबोलीवर चर्चा करण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे उत्सवमूर्तीसाठी काही विशेष, आमंत्रितांचे आदरातिथ्य, गिफ्ट्स इ विषयी कित्येकांच्या डोक्यात काही अभिनव कल्पना असतात, ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युलेही असतात, कधी थोडं पारंपारिक पण हटके असं मस्त मिश्रण जमून येतं मग हे अनुभव शेअर करण्याविषयी काय मत? स्मित

मुघल ए आझम

0
Average: 10 (1 vote)

मुघल ए आझम

08mughal2.jpg

नखशिखांत सौंदर्य !

कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!

राहत ही राहत...

२००६ सालापासून ज्या गाण्यानं मला वेड लावलंय आणि आजही दरवेळी ऐकताना नव्यानं ज्या गाण्याच्या मी प्रेमात पडते ते गाणं म्हणजे 'ओंकारा' मधलं 'नैनोंकी मत माणियो रे, नैना ठग लेंगे'!

पुन्हा एकदा प्रश्न

बरेच दिवस करीन करीन म्हणताना घरातल्या सीडी अन कॅसेट वरची गाणी डिजिटल कॉपी करायचं काम सुरु तरी केलंय आज. नेमकी सगळ्यात वरची सीडी विश्व विनायक ची निघाली त्यामुळे कसली विघ्नं न येता हे काम पुरं होईल अशी आशा आहे स्मित

त्या पाठोपाठ भूपाळी अन पहाटेची भक्तिगीते अशा दोन सीड्या निघाल्या. त्यातली गाणी फ्रीडीबी वर सापडली नाहीत म्हणून प्रत्येक गाण्याची पहिली ओळ ऐकून ट्रॅक्स ची नावं लिहित होते. सगळी गाणी सूर्य, राम , गणपती, कृष्ण, पांडुरंग यांना उद्देशून.

गाणे शिकवण्यासाठी गुरू हवाय

0

मला क्लासिकल गाणे शिकायचेय आणि त्यासाठी नव्या मुंबईत गुरूचा शोध चालु आहे. गांधर्व संगित महाविद्यालयातुन मी मध्यमा पर्यंत शिकलेली आहे, पण ते वर्षाला ८ राग, परिक्षा वगैरे प्रकार झेपले नाहीत. एक राग निवडुन तो मला थोडाफार कळेपर्यंत घोटायचाय आणि त्यासाठी योग्य तो गुरू पाहिजे.

बेलापुर, नेरुळ मध्ये राहणारे कोणी असेल तर बरेच झाले, पण इतरत्रही कोणी असेल तरी चालेल. मुंबईला मात्र येजा करणे मला शक्य नाही.

बोलगाणी - प्रवेशिका ४ (अगो)

0

बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !

नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.

http://www.youtube.com/watch?v=yhCMxgkWwYE