समाज

सोडा ना... आपल्याला काय करायचंय?

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 08:08

सोडा ना... आपल्याला काय करायचंय?

तसा वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध फक्त मुंबई मध्ये जमिनीचे भाव काय झाले हे जाणून घेण्याइतकाच. बाकी असतेच काय? २-३ बलात्कार, ५-१० चोऱ्या, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, एखादा घोटाळा जनतेसमोर आणि बाकीच्या जाहिराती. पण त्या दिवशी दाभोळकरांच्या घटनेची बातमी वाचली. खरे सांगू, तर मलाही माहित नव्हते की ते नक्की होते कोण. नंतर थोडे वाचले, तेव्हा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. अजूनही मला पूर्ण माहिती नाहीच पण म्हणून काय झाले? मला अंधश्रद्धा म्हणजे काय ते माहिती आहे. कारण तो माझ्या तुमच्या जीवनाचा एक भाग बनलाय.

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

Submitted by नरेंद्र गोळे on 12 September, 2013 - 00:22

अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥

कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला ।
मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥
न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥

मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे ।
कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥
न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥

प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया ।
धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥
नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

नोकरी शोधात होणारी फसवणूक

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:25

आत्ताच थोरल्याचा फोन आला की एक व्हीपीपी आली आहे, ५०० रुपये भरुन सोडवुन घ्यायला सांगत आहे, कुणा SSS Industrial Job Services कडून आली आहे, मी आत्ता पोस्टमनला परत पाठविले आहे, तुम्ही नेटवरुन माहिती काढाल का?
माहिती काढल्यावर त्या नावाच्या एक दोन साईट्स सोडता, बनावट कॉल लेटर्स/गार्बेजची व्हीपीपी पाठवुन होणार्‍या फसवणूकीच्या तक्रारींनी भरलेले गुगलचे पान नजरेस पडले. तत्काळ मुलास फोन करुन सांगितले की ती व्हीपीपी तू घेऊ नकोस, घेतलीस तर फुकाचा फसशील. जी गोष्ट "विकतची" म्हणून तू मागवलेलीच नाहीस, त्याकरता पैसे का भरतोस?
याच संदर्भात पुढील बातमी देखिल पहा

पुलिस को भी पता नही चला सर......

Submitted by विजय दिनकर पाटील on 6 September, 2013 - 01:05

"काँग्रॅच्युलेशन्स सर, जॉय के पापा को और पुलिस दोनों को पता नही चला की ये सुसाईड नही, मर्डर था"

"यहाँ जो प्रेशर आता है उसको मेजर करने के लिए कोई मीटर क्यूं नही बना सर"

-

-

-

-

नाशिकमधली सर्व वृत्तपत्रे गेले चार दिवस जो विषय ढवळून काढत आहेत तो म्हणजे भारतातल्या एका बड्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट ग्रूपच्या नाशिक कारखान्यात एका १९ वर्षाच्या टर्नरपदावर प्रशिक्षणार्थी असलेल्या आणि सुवर्णपदकविजेत्या हुशार मुलीची दोन्ही हातांच्या नसा कापून घेऊन नंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या.

कारण काय? सहकार्‍यांमधील दहाजणांकडून सततचा मानसिक त्रास, टोमणे इ.इ.

आमचे असतील लाडके........

Submitted by जे.पी.मॉर्गन on 3 September, 2013 - 01:46

फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

जराशी गंमत

Submitted by अंड्या on 2 September, 2013 - 12:22

मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्‍या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..

गणपती इलो रे...

Submitted by झुलेलाल on 1 September, 2013 - 14:38

पावसाची सणसणीत सर नुकतीच कोसळून गेलेली असते. गवत्या उन्हात तिळाची पिवळीधम्मक फुले पावसाचे थेंब पाकळ्यांवर घट्ट पकडून आणखीनच सोनेरीसोनेरी होऊन चमकत असतात. सगळ्या हिरवाईवर फुलांचा सुंदर साज चढलेला असतो आणि पोटरीला आलेल्या भाताच्या लोंब्यांचा धुंद सुगंध सगळ्या परिसरात घुमत असतो.. क्षणापूर्वी कोसळून गेलेल्या पावसानंतर आकाशातले ढगही पांगलेले असतात, आणि लांबवरच्या डोंगरकडय़ातून अधीरपणे जमिनीकडे झेपावत कोसळणाऱ्या धबधब्याच्या दुधाळ धारेचे वळसे स्पष्ट दिसू लागतात. पायथ्याच्या रानातला पक्ष्यांचा किलबिलाट घंटानादासारखा घुमत असतो.

माणसे पेरणारा माणूस.

Submitted by जीएस on 29 August, 2013 - 00:01

एक फेब्रुवारी १९४८ च्या उत्तररात्री नागपूर येथे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ श्रीगुरुजी यांना गांधीहत्येच्या कटाबद्दल कलम ३०२ खाली अटक झाली. लगेच चार फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली आणि कारागृहात गुरुजींना या बंदीबद्दल माहिती मिळताच त्यांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. एक स्वप्न भंगले होते. १९२५ साली संघस्थापना करतांना डॉ. हेडगेवारांनी एका फार वेगळ्या कार्याचे स्वप्न पाहिले होते आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यासाठी झिजून मोठ्या विश्वासाने त्याची धुरा गुरुजींवर सोपवून त्यांनी १९४० साली जगाचा निरोप घेतला होता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज