आरोग्य

उपवासाचे ढोंग

Submitted by कुमार१ on 15 February, 2017 - 21:43

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.

विषय: 

मातीशी मैत्री

Submitted by अंबज्ञ on 13 February, 2017 - 01:50

वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.

अमेरिका प्रवासासाठी आरोग्य विमा - Visitor Insurance in US

Submitted by webmaster on 8 February, 2017 - 14:25

अमेरिकेत प्रवास करणार्‍यांसाठी लागणारा आरोग्य विमा
Visitor Insurance in US
या अगोदरची चर्चा इथे पाहता येईल.

http://www.maayboli.com/node/5874

http://www.maayboli.com/hitguj/messages/103388/1529.html?1210878246

शब्दखुणा: 

लांब केस ठेवावेत की सरळ टक्कल करावे????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 25 January, 2017 - 09:59

टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.

विषय: 

बुद्धीमत्ता ,सर्जनशीलता, latent inhibition आणि मानसिक रोग!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 10 January, 2017 - 08:15

माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड(पौर्वात्य)ऑस्ट्रेलॉईड्स(भारतीय),निगरॉईड्स(आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत ,तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत.बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत(creativity)खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.जर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त असेल तर बहुतांश शोध ,सर्ज

विषय: 

मन कशात लागत नाही

Submitted by सई केसकर on 5 January, 2017 - 10:56

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं.

विषय: 

माझे अनुवादित पुस्तक - ब्रेन रूल्स

Submitted by रेव्यु on 3 January, 2017 - 05:36

Brain Rules
4af031a4aa5a4bef8c9e33c0bbf8355d.jpg
Brain Rules हे जॉन मेडिना या मूळ इंग्रजी पुस्तकाचे माझे भाषांतर नुकतेच प्रकाशित झाले आहे.
प्रकाशक आहेत साकेत प्रकाशन. हे न्यू यॉर्क बेस्ट सेलर आहे.
हे पुस्तक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य वाचकांसाठी आहे, ( तुम्ही चेतापेशी शास्त्रज्ञ वा मानसोपचार तज्ञ नाहीत असे मी गृहित धरतो. सर्वसामान्यत: आपण वैद्यकीय वा मानसशास्त्रावरील पुस्तक विकत घेणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला जॉन मेडिनाचे हे आपल्या सारख्या वाचकांसाठी लिहिलेले पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.

प्रांत/गाव: 
विषय: 

संकल्पाची संकल्पना !

Submitted by किंकर on 27 December, 2016 - 13:45

संकल्पाची संकल्पना ! -

वर्ष संपत आले कि , यावर्षीच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या एक तारखेपासून मी .......
१. ......पहाटे उठून फिरावयास जाणार
२...... दररोज नियमित व्यायाम करणार
३..... या या विषयांचे संदर्भात वाचन करणार असे ,
आणि त्या पुढे आपल्या मनातले संकल्प मांडण्यास सुरवात करतो .

संकल्प सोडणे किंवा केलेला संकल्प मध्येच सोडून देणे हे आपण नेहमीच करतो. यावर्षी आपण असा संकल्प करू या की , मी जो संकल्प करेन तो मध्येच सोडणार नाही.

विषय: 

व्यायाम बघावा करून! -- भाग १

Submitted by सई केसकर on 27 December, 2016 - 05:02

जानेवारी जवळ आला की एक गोष्ट सगळेच ठरवतात. (३१ डिसेम्बरची पार्टी झाली की) १ जानेवारी पासून मी रोज व्यायाम सुरु करणार. आणि माझ्या माहितीतले काही लोक तर व्यायाम सुरु करायच्या आधी बूट, भारी ट्रॅक पॅन्ट, ब्रँडवाले टीशर्ट आणि मोठ्याला जिमची मेम्बरशीप अशा मोठ्या आर्थिक खड्ड्यातून हा प्रवास सुरु करतात. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत उत्साह संपतो आणि परिस्थिती जैसे थे. आर्थिक खड्ड्याच्या पलीकडे जाऊन या आरंभशूरपणाचा एक फार महत्वाचा तोटा आहे. नियमित व्यायामामुळे होणाऱ्या कितीतरी फायद्यांना आपण उगाच मुकतो.

विषय: 

रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा द्रवरूप आहार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 December, 2016 - 07:17

घरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.

Pages

Subscribe to RSS - आरोग्य