समाज

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४

Submitted by स्वाती२ on 22 July, 2013 - 14:08

ए बी पी न्यूज- प्रधानमंत्री

Submitted by श्रीकांत on 21 July, 2013 - 12:12

नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.

जगातल्या लोकांच्या पसंतीचा आहार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 21 July, 2013 - 12:03

जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.

यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले.

विषय: 

जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 July, 2013 - 01:45

हा जुना धागा संपादित करुन वर आणतेय.

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.

मुलासाठी नाव सुचवा

Submitted by स_सा on 14 July, 2013 - 01:34

मुलासाठी नाव सुचवा
मुळाक्षरे त, द, न ही अक्षरे दिली आहेत. श्री गणेशाच्या नावांपैकी नाव बाळासाठी ठेवायचे आहे.

आपली मदत हवी आहे

धन्यवाद

शब्दखुणा: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास-३

Submitted by स्वाती२ on 12 July, 2013 - 11:39

आई, तुला काही कळत नाही...

Submitted by स्वाती२ on 8 July, 2013 - 07:53

लेक नुकताच हायस्कूलला गेला तेव्हा घडलेला हा किस्सा. त्याच्या मोठं होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा अधोरेखीत करणारा. साधारण ४ वर्षांपूर्वीचा. इतरत्र पूर्वप्रकाशित.

दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला.
"तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble."
"तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं.
"सगळं घेतलय मी."
"मग?"

विषय: 

डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 4 July, 2013 - 13:17

रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ?

शब्दखुणा: 

जातपंचायत

Submitted by धडाकेबाज on 4 July, 2013 - 08:08

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला मारून टाक किंवा तू आत्महत्या कर हा सल्ला तिच्या वडिलांना त्यांच्या जात पंचायतीने दिलाय हि घटना आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील.त्यातच नाशिकलाही आंतरजातीय विवाह केल्याने बापाने पोटच्या मुलीला मारून टाकले.

जाती धर्माची चिकटपट्टी समाजाच्या डोळ्यावर इतकी घट्ट बसली आहे कि त्यातून आपल्या समाजाची सुटका होणे हे कठीण काम दिसतेय. धर्म, प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल ह्यापायी नि पोकळ जातीधर्माच्या अहंकारापायी तरुण जीव हकनाक बळी जात आहेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज