समाज

गणपती इलो रे...

Submitted by झुलेलाल on 1 September, 2013 - 14:38

पावसाची सणसणीत सर नुकतीच कोसळून गेलेली असते. गवत्या उन्हात तिळाची पिवळीधम्मक फुले पावसाचे थेंब पाकळ्यांवर घट्ट पकडून आणखीनच सोनेरीसोनेरी होऊन चमकत असतात. सगळ्या हिरवाईवर फुलांचा सुंदर साज चढलेला असतो आणि पोटरीला आलेल्या भाताच्या लोंब्यांचा धुंद सुगंध सगळ्या परिसरात घुमत असतो.. क्षणापूर्वी कोसळून गेलेल्या पावसानंतर आकाशातले ढगही पांगलेले असतात, आणि लांबवरच्या डोंगरकडय़ातून अधीरपणे जमिनीकडे झेपावत कोसळणाऱ्या धबधब्याच्या दुधाळ धारेचे वळसे स्पष्ट दिसू लागतात. पायथ्याच्या रानातला पक्ष्यांचा किलबिलाट घंटानादासारखा घुमत असतो.

माणसे पेरणारा माणूस.

Submitted by जीएस on 29 August, 2013 - 00:01

एक फेब्रुवारी १९४८ च्या उत्तररात्री नागपूर येथे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ श्रीगुरुजी यांना गांधीहत्येच्या कटाबद्दल कलम ३०२ खाली अटक झाली. लगेच चार फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली आणि कारागृहात गुरुजींना या बंदीबद्दल माहिती मिळताच त्यांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. एक स्वप्न भंगले होते. १९२५ साली संघस्थापना करतांना डॉ. हेडगेवारांनी एका फार वेगळ्या कार्याचे स्वप्न पाहिले होते आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यासाठी झिजून मोठ्या विश्वासाने त्याची धुरा गुरुजींवर सोपवून त्यांनी १९४० साली जगाचा निरोप घेतला होता.

विषय: 

विषय क्र. १ - 'आय टी'ची लॉटरी

Submitted by विद्या भुतकर on 28 August, 2013 - 06:51

एक १५-१६ वर्षापूर्वी, मी आणि माझी आई स्वयंपाकघरात बसलो होतो. तिचा स्वयंपाक आणि माझा गृहपाठ चालू होता. मध्येच आम्ही लॉटरीवरून गप्पा मारू लागलो. आपल्याला एका लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय काय करता येईल, विकत घेता येईल याचा विचार करत होतो. त्यात मग रंगीत टीव्ही, फोन, फ्रीज, इ गोष्टी होत्या. चार चाकी एखादी गाडी घ्यावी असं काही वाटलं नाही. ती आमच्या स्वप्नातही नव्हती. ती लॉटरी काही आम्हाला लागली नाही, पण थोड्या वर्षात एक वेगळीच लॉटरी लागली, ती म्हणजे I T ची. हो, त्याला लॉटरीच म्हणावी लागेल कारण बारावी नंतर केवळ डॉक्टर किंवा वकील नको व्हायला म्हणून मी इंजिनीयर झाले.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2013 - 07:56

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

दोषी कोण?

Submitted by विजय देशमुख on 27 August, 2013 - 06:56

अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्‍याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?

चीड चीड चीड

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 August, 2013 - 05:24

गेल्या काही दिवसात जे काही चाललंय ते बघून भयंकर चीड येतेय. वाईट ह्याचं वाटतं की फक्त चिडण्यापलीकडे काहीच करु शकत नाहीये. त्यामुळे स्वत:चाच राग राग येतोय.

इतका स्वार्थी बनलाय माणूस की स्वत:पलीकडे त्याला काहीच दिसू नये. फक्त स्वत:चा फायदा ….. !! आणि भूक तरी किती असावी…… पोटात राक्षस शिरल्यासारखी…… जी कधी संपतच नाही !! कित्येक लोकांच्या तोंडचा घास पळवून, तो खाऊन, पचवून ढेकरही देऊ शकतात हे लोक !! असली कसली भयंकर जमात तयार झालीये आजकाल !!

विषय: 
शब्दखुणा: 

भेट (साळगावकर आणि दाभोळकर)

Submitted by ज्ञानेश on 26 August, 2013 - 13:37

संपादीतः इतर संकेतस्थळावरचे लेख कृपया इथे कॉपी पेस्ट करू नये. लेखामधेय दुवा देऊन तुमचे मत लिहा. फक्त दुवा द्यायचा असेल तर kanokani.maayboli.com या सुविधेचा वापर करा.

-अ‍ॅडमीन

HELP - आणीबाणीच्या प्रसंगाकरता मोबाईल अ‍ॅपची संकल्पना

Submitted by मामी on 26 August, 2013 - 04:34

शक्ती मिलमधील घटनेच्या निमित्ताने ....

या आणि अशा घटना आता सर्रास कानावर येऊ लागल्या आहेत. लोकांची मानसिकता, सिनेमा-टिव्हीचा तरूण पिढीवर होणारा परिणाम, झटपट पैसे, सुख मिळवण्याची लालसा, त्याकरता कसलीही चाड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती अशा अनेक घटक याला कारणीभूत आहेत.

कधी तर वाटतं स्त्रिया बलात्काराला न घाबरता गुन्हा नोंदवत आहेत त्यामुळे हे असले गलिच्छ मनोवृत्तीचे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याऐवजी गुन्हा करून त्या स्त्रीला मारूनही टाकतील. भयंकर त्रास होतो हे सगळं सतत वाचून......

विषय क्रमाक २ = धवलक्रांतीचा वेडा जनक.. डॉ. वर्गीस कुरीयन

Submitted by जाई. on 24 August, 2013 - 15:48

वेडेपणा म्हणजे काय ? चारचौघासारख न वागता वेगळ वागण की दिलेल्या परिघाच्या बाहेर जाउन चौकटीबाहेर जाउन वागण ?? आणि या वेडेपणाचा समाजाला फ़ायदा झाला तर ?? मग तो वेडेपणा ठरतो का ?? का समाजाभिमुख काम वेडेपना अंगी असल्याशिवाय करता येत नाहीत ? स्वप्न ही वेडॆपणीच पाहायची असतात का ?? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न

पण सॅम पित्रोदाच्या शब्दात सांगायचे झाले तर किंचीत वेडेपणा अंगी बाणवल्याशिवाय गोष्टी घडवुन आणल्या जात नाहीत.घडवता येत नाही. कारण त्याशिवाय दुध उत्पादक शेतकर्याच्या सहकारी संस्थामार्फ़त आपल्या देशाला दुध उत्पादनात स्वयपुर्ण बनवण्याचे स्वप्न पाहणारे डॉ वर्गीस कुरीयन वेडे ठरले नसते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज