सुनील गावस्कर म्हणजेच क्रिकेट असं समजलं जायचं त्याला खूप दिवस नाही झाले. सुनीलवर नेहमी ताण असायचा. तो गेला कि डाव पत्त्यासारखा कोसळायचा. नेहमीच नाही पण ब-याचदा. दिलीप वेंगसरकर यांची माफी मागून हे लिहावं लागतय. कपिलदेव महान होता पण डावाची जबाबदारी घेत नव्हता. भरवशाचा बॅटसमन नव्हता तो. विश्वनाथ म्हणजे सेहवाग. सुनीलवर नेहमी दडपण असायचं. त्या दडपणाचा सामना करून त्याने विक्रम केले. तरीही त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. त्याआधी भारतीय क्रिकेटला सिरीयसली कुणीच घेत नव्हतं. ती ओळख सुनीलनेच दिली. कपिलने पण दिली . पण सुरूवात सुनीलनेच केली. ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडल्यानंतर क्रिकेटमधे बदल झाले.


