संवाद

पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!

संवाद : गुरू ठाकूर

'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.

एक मुलाकात--> संदीप कुलकर्णीशी

नोव्हेंबर महिन्यातील एक शुक्रवार, स्थळ- ग्रँड सिनेप्लेक्स दुबई. दुबईत प्रथमच एका मराठी चित्रपटाचा प्रिमियर शो होत होता. 'गैर' हे त्या चित्रपटाचे नाव. दुबईतल्या एका प्रतिष्ठीत मल्टीप्लेक्स मधे हिंदी आणि इंग्लिश चित्रपटाच्या बरोबरीने एक मराठी चित्रपट दिमाखाने झळकत होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलेल्या मराठी माणसाचे उर अभिमानाने भरुन येत होते आणि कारण हि तसेच होते की. ३ हॉल्समधे एकाच वेळी ह्या चित्रपटाचे स्क्रीनींग होत होते.

मी : निळू फुले - अंतिम भाग

मी : निळू फुले - पहिला भाग

याच काळात चित्रपट बघणं, विशेषत: बंगाली, इंग्रजी, आणि चित्रपटांबद्दल वाचणं याची चटक किंवा व्यसनच लागलं खरं म्हणजे. बंगाली चित्रपट आम्ही पाहिले अमीर शेखमुळे. कारण त्याच्या ऑफिसमध्ये एक बंगाली बाबू होता. तो इथे बंगाली फिल्म्स आणायचा. ती चटक तिथून लागली, अमीरमुळे. इंग्रजी सिनेमा तर आम्ही पूर्वीपासूनच पाहायचो.

मी : निळू फुले - पहिला भाग

१३ जुलै २००९... सकाळमध्ये निळू फुले यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मनापासून खूप वाईट वाटलं.
निळू फुले हा मराठी रंगभूमीवरचा आणि चित्रपटातला एक ताकदीचा, सशक्त अभिनेता गेल्याचं दुख: तर होतच पण त्याचबरोबरीनं ’अरेरे, निळूभाऊ गेले यार’ ही ओळखीचं कोणीतरी माणूस गेल्याची जाणीव जास्त क्लेशदायक होती. कारण माझ्या किंवा माझ्या बहिणीच्या आठवणीतले निळू फुले हे आधी - कायम काही ना काही पुस्तक वाचताना दिसणारे किंवा हातात खुरपं धरून बागकाम करणारे "निळूभाऊ’ होते....नंतर मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रातले एक आघाडीचे कलाकार निळू फुले !

संवाद - कृष्णा पाटील

जॉर्ज मॅलरीला कोणीसं विचारलं होतं, ''why do you want to climb Mt. Everest?" तो उत्तरला,"because it's there"..

संवाद : अतुल कुलकर्णी

संवाद: अतुल कुलकर्णी
दुबई, २ जानेवारी, २००९.
atulsnap1.jpg

महाराष्ट्राची महागायिका: वैशाली भैसने माडे

वैशाली चा संपर्क होण्या साठी झी मराठी ने केलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

वैशाली ने तिच्या अतिशय व्यस्त दिनक्रमात वेळ काढून दिलेल्या मुलखती साठी तिचे ही आभार आणि शुभेच्छा !
..........................................................................................