कॉलेज

स्वाभिमानाचे नव-किरण

0

स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्‍या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्‍या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्‍या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...

१०/१२ वी नंतर काय?

0

मंडळी,

१०/१२ वी नंतर च्या वेगवेगळ्या वाटांच्या चर्चेसाठी हा बीबी.

इथे अशा वाटा, त्यांचे उपयोग वगैरे ची चर्चा अपेक्षीत आहे.

आपल्या आजूबाजूला किंवा नात्यात बरीच हुशार मुले असतात. पण परिस्थितीमुळे त्यांना फार उच्च शिक्षण घेता येत नाही. ते short course करून लवकरात लवकर घरच्यांना हातभार लावायचा विचार करतात. असे काही courses इथे discuss केले तर अशा मुलांना काही मार्गदर्शन करता येईल असे वाटले म्हणून हा बीबी.

माझ्या शिक्षकांच्या लकबी

0

आपल्या शिक्षकांच्या गमतीशीर लकबी, सवयी लिहिण्यासाठी हा धागा.

जुन्या मायबोलीवर तो इथे होता. http://www.maayboli.com/hitguj/messages/644/90465.html?1127323309

अ‍ॅडमिनटीम - कृपया या गप्पांच्या पानाचे धाग्यात रुपांतर करावे ही विनंती. या ग्रूपात धागा उघडण्याची सोय मला दिसत नाहीय.
( पण आधी काही धागे उघडलेले दिसताहेत.)

नॅशनल स्टुडंट लिडरशिप कॉन्फरन्स बद्दल माहिती हवी आहे.

0

काल माझ्या मुलाच्या नावाने नॅशनल स्टुडंट लिडरशिप कॉन्फरन्सचे पत्रक आले. मी या संबंधी माहिती शोधतेय. त्यांची साईट, फेसबुक वगैरे पाहिले. त्याच्या शाळेतही विचारणार आहे. कुणा मायबोलीकरांच्या पाल्याने हा समर प्रोग्रॅम केला होता का?/या वर्षी करणार आहेत का? १५ मार्चच्या आत फॉर्म्स पाठवायचेत. तेव्हा कुणाला माहिती असेल तर कृपया मदत करा.

The Young Collegiate Woman - श्रुती एकतारे (महिला दिन २०१०)

0

mahila_1.jpg

श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented? स्मित थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!

बारावीनंतर....

0

बारावी, शास्त्र (Science) घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्यासाठी भारतामध्ये कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ह्या विषयावर इथे ठाऊक असलेली माहिती लिहायची माबोकरांना विनंती आहे. ठराविक पर्याय, जसे की मेडीकल, इंजिनिअरींग हे तर झालेच. त्यातही नवीन काही पर्याय निघाले असतील, काही माहिती असेल तर लिहावी. हे सर्व पर्याय एकत्र केलेले पुस्तक वगैरे उपलब्ध आहे का, की जेणेकरुन सर्व माहिती एकत्र स्वरुपात सापडू शकेल?

कर्मवीर जयंती!

anna.jpg
(जन्म २२ सप्टेंबर १८८७)

पाखीफुट्या पाखरांसी पवित्रसा वटवृक्ष लावीला!
जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला!!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहचवणारे कर्मवीर पद्मविभुषण डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील अर्थात कर्मवीर अण्णा ह्यांची आज जयंती.

रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली विसावलेल्या जगभरातील तमाम रयतेला हार्दिक शुभेच्छा!!! स्मित

http://www.rayatshikshan.edu/

जय कर्मवीर!

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=50373&boxid=1191515&pgno=4

संप, संप, संप...!

हमारी मांगे पुरी करो, वरना कुर्सी खाली करो.....!!! स्मित

आज आमच्या विद्यापीठात संप चालु आहे. वेतनवाढ तसेच काही इतर मागण्यांसाठी संप आहे. शिक्षक लोक आलेले नाहीत. विद्यार्थी भटकतायेत कॅम्पस मध्ये! मेन गेट ला एक गट संपाबद्द्ल पोस्टर घेउन उभे होते. येणार्या जाणार्‍याला माहितीपत्रके देत होते.

samp_1.pdf (55.78 KB)
samp_2.pdf (90.99 KB)

पण मी कामावर आलो आहे अरेरे