सध्या ब-याच संस्थळांवर बरेच जण बरंच काही लिहीत आहेत. बरेच हा शब्द मागे पडून बहुतेक हा शब्द देखील मागे पडतोय आणि जवळजवळ सर्वच असा नवाच शब्दप्रयोग रूढ होऊ पाहतोय. पूर्वी कसं मोजकेच लोक लिहायचे. इतरांना त्यांचं अप्रूप असायचं. ते देवलोकातून आले असावेत असं लोकांना वाटायचं. काही जण तर त्यांना हात लावून पहात असत. आता मात्र सगळेच लिहू लागल्याने लिहीणे म्हणजे विशेष काय ते असं वाटू लागलं आहे. उलट जे कुणी लिहीत नाहीत त्यांच्याबद्दल हल्ली अप्रूप वाटतं. न लिहीता हा मनुष्य कसा काय राहू शकतो असं वाटून लोक त्यांना हात लावून पाहताना दिसतात.

), म्हणून ही 'विकिपीडियाची रिक्षा'.
